नेरळच्या परिसरातील विकासाचा नवा अध्याय!
नेरळ परिसरातील १३७ कोटींच्या रस्ते विकास कामांचे आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न.....
खालापुर कर्जत/ सुधीर देशमुख :- नेरळ शहरातील नागरिकांसाठी आजचा दिवस विकासाचा नवा टप्पा घेऊन आला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांना अखेर गती मिळाली असून, तब्बल १३७ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचे भूमिपूजन आज शनिवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते साई मंदिर नेरळ परिसरात उत्साहात पार पडले.
या कामांमध्ये दामत गेट ते आंबिवली पेशवाई मार्ग रस्त्याचे काँक्रिटीकरण, साई मंदिर ते सुगवे रस्त्याचे काँक्रिटीकरण, तसेच माथेरान स्वागत कमानी नेरळ ते पोहीगाव रस्त्याचे काँक्रिटीकरण या तीन प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. या कामांच्या पूर्णत्वामुळे नेरळ शहरातील वाहतूक कोंडी कायमची संपुष्टात येणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याप्रसंगी बोलताना “कर्जतचा शाश्वत विकास हाच आमचा ध्यास आहे. पर्यटन दृष्टीने वाढणारे इन्फ्रास्ट्रक्चर, स्थानिकांना रोजगाराच्या संधी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. ज्यांना काही काम शिल्लक नाही ते केवळ टीका करण्यात वेळ घालवत आहेत, पण आम्ही मात्र जनतेच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहोत.” तसेच नेरळ रेल्वे गेट परिसरातील वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी तोडगा म्हणून येथे उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन सुरू असून, त्यासाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले. नेरळ बसस्थानकावर प्रवाशांसाठी ई-टॉयलेट सुविधा उभारण्याचे नियोजन देखील करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या भूमिपूजन सोहळ्यात माजी पंचायत समिती सभापती तथा युवासेना तालुका प्रमुख अमर मिसाळ व कोल्हारे सरपंच महेश विरले यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेशदादा टोकरे, तालुकाप्रमुख सुदामदादा पवाळी, युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद दादा थोरवे, तालुका संघटक शिवराम बदे, उपतालुकाप्रमुख शरद ठाणगे, उपतालुकाप्रमुख भरतजी डोंगरे, विभाग प्रमुख रत्नाकर बडेकर, विलासदादा हजारे, द्यानेश्वर दादा भगत, उपसरपंच सौ. सविता कोळंबे, सौ. ज्योत्स्ना महेश विरले, सदस्य श्री. रोशन म्हसकर, सौ. अस्मिता विरले, सौ. साक्षी विरले, सौ. नूतन पेरणे, सौ. गीता गणेश मोरे, श्री. उत्तम शेळके, उपतालुकाप्रमुख अंकुश दाभणे, श्री. मयूर पेरणे, श्री. सोमनाथ विरले, श्री. जयवंत साळुंखे, श्री. कैलास विरले, श्री. नरेश कालेकर, श्री. परेश कोळंबे, श्री. प्रशांत झांजे, शाखाप्रमुख श्री. महेश हजारे, श्री. भावेश बोंबे, श्री. दीपक घाटे, श्री. सोपान ठाणगे, श्री. नितीन आहीर श्री मनोहर ठाणगे श्री नारायण पिरकर श्री नरेंद्र गोमारे तसेच असंख्य शिवसैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी या विकास कामांबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की, “आता नेरळ शहरातील रस्ते खड्डेमुक्त होतील आणि वाहतूक सुरळीतपणे चालेल,” असा विश्वास व्यक्त केला.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home