हाळखुर्द गावातील 120 वर्ष जुनी उर्दू शाळेचे नूतनीकरण — आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न
76 लाख 20 हजार रुपयांच्या निधीतून नव्या इमारतीचा गावाला मिळाला शैक्षणिक नवा अध्याय!
खालापुर कर्जत/सुधीर देशमुख :- खालापूर तालुक्यातील हाळखुर्द गावात 120 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते शनिवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाले. आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत ७६ लाख २० हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे या ऐतिहासिक शाळेला नवसंजीवनी लाभली आहे.
मुंबई–पुणे जुन्या महामार्गालगत असलेल्या हाळखुर्द गावातील जुनी शाळा जीर्ण अवस्थेत असल्याने तिच्या नूतनीकरणाची गरज तीव्र होती. सामाजिक कार्यकर्ते हुसेन खान, ग्रामपंचायत उपसरपंच अजीम मांडलेकर आणि ग्रामस्थांनी या शाळेच्या पुनर्बांधणीसाठी आमदार थोरवे यांच्याकडे मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे ही मागणी प्रत्यक्षात उतरली आणि आज गावातील मुलांना नव्या, प्रशस्त आणि सुसज्ज इमारतीत शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
शाळेच्या नव्या दुमजली इमारतीत एकूण ६ वर्गखोल्या आणि इतर शैक्षणिक सुविधा अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. लोकार्पणाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता, तर शाळकरी विद्यार्थिनींनी आमदार थोरवे यांचे फुलांच्या वर्षावातून स्वागत केले.
या प्रसंगी बोलताना मतदारसंघातील सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन शाश्वत विकासाची वाटचाल सुरू आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्ण केली असून, दुसऱ्या टप्प्यात प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याचा मानस आहे. हाळखुर्द येथील शाळेचे नूतनीकरण हे केवळ एक बांधकाम नाही, तर भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. नव्या इमारतीतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे सुसज्ज वातावरणात घेता येणार आहेत, हीच खरी आनंदाची बाब आहे.”तसेच शाळेच्या बांधकामासाठी आपली मालकी हक्कातील जागा दान करणारे मरहूम हसनमिया शेख इद्रीस करंजीकर यांचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख श्री. संदेश पाटील, युवासेना विधानसभा अधिकारी श्री. रोहित विचारे, माजी उपनगराध्यक्ष श्री. कुलदीपक शेंडे, माजी नगरसेवक श्री. मोहन अवसरमल, श्री. दिनेश थोरवे, श्री. हुसेन खान, श्री. हमीद अन्सारी, श्री. नदीम खान, श्री. रफिक जळगावकर, श्री. फैय्याज दुदुके, श्री. चंदन भारती, श्री. विष्णू ठोंबरे, श्री. महेश आगिवले, श्री. अतुल देशमुख, श्री. नरेश रसाळ, श्री. राकेश सुखदरे, श्री. सुलेमान खान, सरपंच सौ. शबनम मुल्ला, उपसरपंच श्री. अजीम मांडलेकर, सदस्य श्री. आसिफ बेडेकर, सदस्य सौ. कमली वाघमारे, सदस्य श्री. प्रभास क्षीरसागर, श्री. हनीफ मुल्ला, श्री. हुसेन जळगावकर, श्री. अकबर जळगावकर, श्री. अल्ताफ जळगावकर, माजी सरपंच सौ. शैला क्षीरसागर, श्री. चंदर वाघमारे, श्री. मंगेश क्षीरसागर, श्री. सचिन क्षीरसागर, श्री. रवी पवार, श्री. प्रशांत जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home