खोपोली नगर परिषदेच्या रणसंग्रामात प्रभाग क्रमांक 10 मधून आनंद अरविंद नायडू सज्ज!
यशवंतनगरचे जनप्रिय सामाजिक कार्यकर्ते
समस्यांची जाणीव, अनुभवाची जोड आणि विकासासाठी ठाम भूमिका घेणारे नेतृत्व
खोपोली नगर परिषद निवडणूक 2025
खोपोली / मानसी कांबळे :- आगामी खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये इच्छुकांची चर्चा सुरू असताना, प्रभाग क्रमांक 10 (यशवंतनगर परिसर) मधून सामाजिक कार्यकर्ते आणि अनुभवी नेते आनंद अरविंद नायडू यांनी आपली इच्छुकता जाहीर केली आहे. त्यामुळे या प्रभागात नव्या नेतृत्वाची चर्चा रंगू लागली आहे.
आनंद नायडू हे यशवंतनगर परिसरातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते असून, त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या समस्या, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता या विषयांवर सतत काम केले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नागरिकांचे मत स्पष्ट आहे की, आनंदभाऊ म्हणजे नेहमी उपलब्ध राहणारा, लोकांचा खरा माणूस.
राजकारणातील दीर्घ अनुभवामुळे आनंद नायडू यांना स्थानिक प्रशासनातील प्रक्रिया, निधीचा वापर आणि विकास आराखडे यांची सखोल माहिती आहे. ते नेहमीच “फक्त तक्रार नाही, तर उपाय हवेत” या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. नायडू म्हणतात की, लोकांच्या छोट्या-मोठ्या समस्या या आपल्या कामाची खरी परीक्षा आहेत. मी फक्त निवडणुकीत नाही, तर नेहमीच लोकांसाठी मैदानात असतो.
गेल्या काही वर्षांत आनंद नायडू यांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे, स्वच्छता उपक्रम आणि युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन कार्यक्रम राबवले आहेत. त्यांच्या या जनसंपर्कामुळे यशवंतनगर तसेच प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण आहे.
प्रभागातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी मी माझे संपूर्ण अनुभव आणि शक्ती लोकसेवेसाठी अर्पण करणार आहे. माझा हेतू सत्तेसाठी नव्हे, तर सेवेसाठी आहे, असे नायडू म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर स्थानिक युवक आणि सामाजिक घटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यशवंतनगर परिसरातील रहिवासी आणि व्यापारी वर्ग त्यांच्या पाठिशी उभा राहिला आहे. नागरिक म्हणतात की, आमच्या प्रभागातील समस्या फक्त ऐकून घेण्याऐवजी सोडवणारा नेता हवा आणि आनंद नायडू यांच्यात ती क्षमता आहे.
खोपोली नगर परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांसोबतच अनुभवी आणि जमिनीवर काम करणारे नेतृत्व शोधले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आनंद अरविंद नायडू यांचे नाव पुढे आले आहे. त्यांचा दीर्घ अनुभव, स्थानिक प्रश्नांची समज आणि जनतेशी असलेला भावनिक संवाद
यामुळे प्रभाग क्रमांक 10 मध्ये त्यांची उमेदवारी गंभीर स्पर्धा निर्माण करणारी ठरण्याची शक्यता आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home