विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळ ( नियोजित ) म्हाडा वसाहत शिरढोण आधारस्तंभ व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा पशू प्रेमी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा...
ठाणे/प्रतिनिधी :- ठाणे जिल्ह्यातील व कल्याण तालुक्यातील मौजे शिरढोण येथे सामाजिक बांधिलकी जपणारा विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळाचे आधारस्तंभ यांचा वाढदिवस म्हाडा वसाहत शिरढोण परिसरातील “ आधारस्तंभ ” म्हणून परिचित असलेले सुबोध सावंत यांनी यंदाचा आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत साधेपणाने आणि जनसेवेच्या माध्यमातून 43 वा साजरा केला. शुभदिनी (ता. 25 ) त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये युवा पिढीसाठी क्रिकेट च संपूर्ण साहित्य देण्यात आले. तसेच उद्घाटन म्हाडा वसाहत येथे पार पडले. नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
तसेच वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याच्या हेतूने ठिकाणी सेवा उपक्रम राबविण्यात आले. त्यात या प्रसंगी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक भगवान पोपळे कार्याध्यक्ष गणेश यावलकर खजिनदार गणेश महाजन सचिव गणेश पारेकर संतोष किर्ते बाळू यावलकर गणेश वटे दिनेश नागणे अक्षय चालखोर संदीप कदम अमोल कुळवेकर रांजणे प्रज्वल पाटील भितेश पवार अमोल टोपे शिवाजी चव्हाण नाना रोकडे अजिंक्य टोपे रोहित कारभारी कृष्णा फरकटे दत्ता जामकर दत्तात्रय बोर्डे सुशांत दरेकर सुशांत जाधव दिनेश पवार उमेश खराडे चेतन कदम आधारस्तंभ व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा पशु प्रेमी सुबोध सावंत यांनी वाढदिवस साजरा करण्याऐवजी समाजसेवेला प्राधान्य देत एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हा सामाजिक जाणिवेचा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home