नायगाव ते शेळगाव छत्री रस्ता खड्डेमय — हजारो विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात
नागरिकांकडून मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना तातडीने कारवाईची मागणी, अन्यथा मतदानावर बहिष्काराचा इशारा
नांदेड/ जावेद अहमद : - नायगाव ते शेळगाव छत्री हा मुख्य मार्ग सध्याखड्डेमय झाल्यामुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व नोकरदार वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे. दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने शाळा आणि महाविद्यालयात जातात. रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून जनजीवन धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता जनतेचा संयम संपत चालला आहे.”
शेळगाव छत्री येथील नागरिक अविनाश विठ्ठलराव अनेराये यांनी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना ई-मेलद्वारेअर्ज पाठवून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. त्यांनी अर्जात नमूद केले आहे की, जर रस्त्याचे काम लवकर हाती घेण्यात आले नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिक मतदानावर बहिष्कार टाकतील.या विषयावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home