नगरदेवळ्यात “अल-खिदमत फाउंडेशन”तर्फे 2 नोव्हेंबर रोजी भव्य इज्तेमाई निकाह सोहळा
फाउंडेशनच्या प्रतिनिधींकडून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉं. महेश्वर रेड्डी यांना विशेष आमंत्रण
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा येथे येत्या 2 नोव्हेंबर 2025 रोजी “अल-खिदमत फाउंडेशन” या सामाजिक संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच भव्य इज्तेमाई निकाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे आमंत्रण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉं. महेश्वर रेड्डी यांना प्रत्यक्ष भेट देऊन दिले. यावेळी सैय्यद अय्याज अली, फरीद खान, सुफियान शेख, अनिस बागवान, दानिश सय्यद, अबरार खान आदी उपस्थित होते.
* धर्म, समाज आणि ऐक्याचा संगम :- “अल-खिदमत फाउंडेशन” ही सामाजिक संस्था समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध सेवा उपक्रम राबवते. आगामी इज्तेमाई निकाह कार्यक्रम हा सामाजिक एकात्मता, साधेपणा आणि मानवी मूल्ये यांचे प्रतिक ठरणार आहे. या कार्यक्रमात एकाच मंचावर अनेक जोडप्यांचे विवाह इस्लामी रीतीने संपन्न होतील.
* सामाजिक जबाबदारीची नवी व्याख्या :- फाउंडेशनचे पदाधिकारी म्हणाले की, आम्ही विवाहासारख्या महत्त्वाच्या सोहळ्याला साधेपणाने साजरा करण्याचा संदेश देत आहोत. समाजातील गरजू तरुण-तरुणींना आर्थिक सहाय्य आणि सामाजिक सन्मान मिळावा, हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाद्वारे अल-खिदमत फाउंडेशन विवाहातील खर्च, सामाजिक दिखावा आणि अनावश्यक औपचारिकता कमी करून समाजात “साधेपणा आणि सौहार्द” वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे.
या कार्यक्रमासाठी भडगाव-पाचोरा आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब मनोहर पाटील, जळगांव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉं. महेश्वर रेड्डी, नगरदेवळा सरपंच प्रतिक्षा किरण काटकर, हिंदुस्तान गॅस एजन्सी संचालक (पाचोरा) हाजी अबुलेस हाजी अल्लाऊदिन शेख, अल-हाज जाकीर अल. लतीफ (मालेगांव), सैय्यद अयाज अली नियाज अली (जळगांव) आदी उपस्थित राहणार आहेत.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home