Friday, October 10, 2025

खोपोली नगर परिषद निवडणूक : मुस्कान सय्यद यांनी स्पष्ट केली भूमिका

 


मी सध्या इच्छुक नाही, पण वेळ आली तर अपक्ष म्हणून मैदानात उतरेन!

 पटेल नगर, प्रभाग 9 मधील माय-माऊलींच्या आग्रहानंतर चर्चेला उधाण

 मुस्कान सय्यद यांचे निवेदन ठरले चर्चेचा विषय!

खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय समीकरणांना वेग आला असताना, पटेल नगर – प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरल्या आहेत, युवा नेत्या...महिलांचा आवाज मुस्कान सय्यद.

गेल्या काही दिवसांपासून मुस्कान सय्यद या प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी दाखल करणार असल्याच्या चर्चेला ऊत आला होता. स्थानिक महिलांमध्ये, विशेषतः “माय-माऊलींमध्ये” त्यांच्या नावाबद्दल उत्सुकता आणि अपेक्षा वाढत होत्या. मात्र, स्वतः मुस्कान सय्यद यांनी आज सार्वजनिकरित्या आपल्या भूमिकेचं स्पष्टीकरण देत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

 मी इच्छुक नाही, पण वेळ आली तर अपक्ष म्हणून मैदानात उतरेन - मुस्कान सय्यद :- आपल्या निवेदनात मुस्कान सय्यद म्हणाल्या की, पटेल नगर आणि शिळफाटा परिसरातील प्रत्येक माय-माऊली माझ्याबद्दल दाखविणाऱ्या प्रेमाबद्दल मी मनापासून आभारी आहे.

अनेकांनी मला प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी घ्यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र मी स्पष्ट सांगू इच्छिते की, सध्या माझी निवडणूक लढवण्याची कोणतीही इच्छा नाही. कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नये की मी फॉर्म भरणार आहे. पण, जर वेळ आली, परिस्थिती अशी निर्माण झाली की जनतेचा आग्रह झाला, तर मी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्यास तयार आहे.

या निवेदनामुळे खोपोलीतील राजकीय वर्तुळात हलचल निर्माण झाली असून प्रभाग 9 मध्ये आगामी निवडणुकीचा रंग अधिकच गडद झाला आहे.

 प्रभाग क्रमांक 9 : आरक्षण आणि राजकीय समीकरणे :- प्रभाग क्रमांक 9 मध्ये यंदाच्या निवडणुकीत एसटी पुरुष आणि सर्वसाधारण महिला आरक्षण लागू आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नवीन आणि जुन्या चेहऱ्यांच्या चर्चेला वेग आला आहे. मुस्कान सय्यद यांनी मागील काही वर्षांत विविध राजकीय पक्षांसोबत काम केल्याचा अनुभव घेतला असून त्यांचा संपर्क परिसरातील नागरिक, महिला आणि युवक वर्गात मजबूत आहे. त्यांनी सामाजिक कार्य आणि महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.

त्यामुळे स्थानिक महिलांमध्ये त्यांच्याबद्दल “आपल्या सारखी मुलगी पुढे यावी” अशी भावना निर्माण झाली आहे.


स्थानिकांचा प्रतिसाद - मुस्कान आमच्या परिसराची ताकद :- पटेल नगर व शिळफाटा परिसरातील महिलांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मुस्कान सय्यद ही आमच्यासारखीच सामान्य घरातील पण समाजासाठी झटणारी कार्यकर्ती आहे. तिची लोकप्रियता परिसरात वाढत आहे. आम्ही तिच्या निर्णयाचा आदर करतो, पण भविष्यात ती अपक्ष म्हणून उभी राहिली तर आमचा पाठिंबा तिच्यासोबत असेल.


 विविध पक्षांचा अनुभव, पण लोकांचा विश्वास सर्वांत मोठा :- मुस्कान सय्यद यांनी गेल्या काही वर्षांत विविध राजकीय पक्षांमध्ये कार्यरत राहून महिला, युवक आणि सामाजिक विकासाच्या मुद्द्यांवर काम केलं आहे.

त्यांच्या संघटनात्मक कामगिरीमुळे त्या प्रभागातील महिलांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. जरी त्यांनी सध्या निवडणूक लढवण्यास नकार दिला असला, तरी

राजकीय विश्लेषकांच्या मते- त्यांच्या वक्तव्यामुळे प्रभाग क्रमांक 9 मध्ये नवीन राजकीय समीकरणे आकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 सेवा माझं ध्येय, सत्ता नाही - मुस्कान सय्यद यांची ठाम भूमिका :- माझं राजकारण सत्तेसाठी नाही, समाजासाठी आहे. प्रभागातील महिलांचे, युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव उपलब्ध राहीन. जर लोकांनी पुकारा दिला, तर मी अपक्ष म्हणून उभं राहणं हे त्यांच्यावरील विश्वासाचं उत्तर असेल.


 खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत मुस्कान सय्यद यांच्या भूमिकेने निर्माण केला नवा चर्चेचा सूर :- राजकीय पक्षांच्या नेत्यांपासून स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत मुस्कान सय्यद यांच्या भूमिकेची चर्चा जोरात सुरू आहे. त्यांचं स्पष्ट, ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण निवेदन हे राजकारणातील “प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेचं उदाहरण” ठरत आहे.

लोकांचा विश्वास, समाजाची साथ आणि सेवाभावाचा मार्ग - हाच मुस्कान सय्यद यांचा खरा राजकारणाचा अर्थ होय.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home