खोपोली नगराध्यक्षपदासाठी डॉं. सुनील पाटील यांचा झंझावात
* राष्ट्रवादीतून दमदार एन्ट्री, कार्यालय उद्घाटनाने निवडणुकीचा ज्वर चढला!
* शिंदे गटातून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर डॉं. पाटील झाले ‘गेमचेंजर’
* ताकई येथे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
खोपोली / मानसी कांबळे :- आगामी खोपोली नगर परिषद निवडणुकीच्या रणशिंगावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील यांचे नाव जोरदार चर्चेत आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासूनच डॉं. सुनील पाटील यांनी खोपोलीच्या राजकारणात नवा ‘पॉलिटिकल झंझावात’ निर्माण केला आहे.
त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ताकई येथे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले.
या उद्घाटन सोहळ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून
नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आता डॉं. पाटील हे ‘हॉट फेव्हरेट’ बनले आहेत.
* राष्ट्रवादीत नवसंजीवनी :- अलीकडेच शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताच डॉं. सुनील पाटील यांना प्रदेश उपाध्यक्षपद देऊन पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांचा खोपोली शहरात दांडगा जनसंपर्क, उत्तम संघटनशैली आणि सर्वसामान्यांशी जवळीक यामुळे ते पक्षासाठी ‘विकासाचा चेहरा’ ठरत आहेत. जनतेसाठी राजकारण आणि विकासासाठी सत्ता, हाच आमचा मंत्र आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉं. सुनील पाटील म्हणाले.
* जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन :- ताकई येथील कार्यालय उद्घाटन सोहळा हा राजकीय शक्तीप्रदर्शनाचा उत्सवच ठरला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे,
रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, महिला नेत्या अश्विनी पाटील, युवा नेते मनेष यादव, रमेश जाधव, निलेश औटी, भूषण पाटील, संदीप पाटील, राहुल जाधव, सुरेखा खेडकर, वैशाली जाधव, जैबुनिसा शेख, अल्पेश थरकुडे आणि असंख्य कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.
* खोपोली नगरपरिषदेत ‘राजकीय गणित’ बदलणार :- खोपोली नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या आरक्षणाचे आराखडे जाहीर झाले आहेत.
निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता असताना
सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डॉं. सुनील पाटील यांच्या प्रवेशानंतर स्थानिक राजकारणातील सत्तासमीकरणेच बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरातील व्यापार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले पाटील नगराध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार ठरत आहेत.
* पुन्हा विकासाचे दिवस परत येणार :- जनतेमध्ये एक भावना स्पष्टपणे दिसत आहे की, डॉं. पाटील नगराध्यक्ष झाले तर खोपोलीचा चेहरा मोहरा बदलेल. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या पायाभूत विकासकामांची आठवण आजही नागरिक काढतात. नव्या जनसंपर्क कार्यालयातून ते पुन्हा 'विकासाच्या राजकारणा’ची नवी पायाभरणी करीत असल्याचे दिसून येत आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home