Friday, October 17, 2025

माजी पोस्ट मास्टर मोहम्मद शफियोद्दीन यांचे निधन

 


देगलूर /जावेद अहमद :- देगलूर शहरातील ज्येष्ठ नागरिक व माजी पोस्ट मास्टर मोहम्मद शफियोद्दीन मोहम्मद अमिनोद्दीन यांचे प्रदीर्घ आजाराने काल सायंकाळी 5 वाजता निधन झाले आणि अंत्यविधी रात्री 11 वाजता झाले. त्यांच्या निधनाने शहरात शोककळा पसरली आहे. आपल्या सेवाकाळात त्यांनी प्रामाणिकपणे आणि मनमिळाऊ स्वभावाने कार्य करून समाजात आदर्श निर्माण केला होता. सेवानिवृत्तीनंतरही ते धार्मिक व सामाजिक कार्यात सक्रिय होते. त्यामुळे ते सर्वांच्या मनात प्रिय झाले होते. त्यांच्या नमाज-ए-जनाजा ची नमाज नतु सय्यद इम्तियाज अली यांनी अदा केली. 

या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक व मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये मा. बालाजी टेकाळे, अविनाश नीलमवर, बालाजी रोयलावर, विवेक केरूरकर, असिफ पटेल, मोगलाजी अण्णा शिरसेटवार, प्रा. भिमराव माळगे, मुफ्ती रफाई जियीयोद्दीन, अयुब सेठ अमोदी राजेश चुनावले, भगवान पाटील सोमूरकर यांचा विशेष सहभाग होता आणि मुस्लिम व हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. मोहम्मद शफियोद्दीन यांच्या निधनाने देगलूर शहरातील सामाजिक व शासकीय वर्तुळात शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home