नांदेड मुख्य डाक कार्यालयात दिवाळी फराळ परदेशात पाठवण्यासाठी विशेष सेवा उपलब्ध......
नांदेड/जावेद अहमद :- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नांदेड मुख्य डाक कार्यालयाने परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना घरगुती फराळ पाठवण्यासाठी विशेष सेवा सुरू केली आहे. भारतीय पोस्ट खात्याने यासाठी पूर्ण सज्जता केली असून, सुरक्षित पॅकेजिंगसह विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत.
दिवाळीचा फराळ हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. तो दूरदेशी असलेल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवणे हा एक भावनिक आणि आनंददायी अनुभव ठरतो. यासाठी नांदेड मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये फराळ पाठवण्यासाठी लागणाऱ्या बॉक्स पॅकिंगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सेवेमुळे नागरिकांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पॅकिंग करून 150 हून अधिक देशांमध्ये फराळ पाठवता येणार आहे. विशेष बुकिंग काउंटरद्वारे ही सेवा सुलभ करण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठवून सणाच्या आनंदात सहभागी करावे, असे आवाहन नांदेड विभागाचे डाक अधीक्षक सतीश रघुनाथराव पाठक यांनी केले आहे


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home