महाराष्ट्र सरकारकडून मराठा समाजाच्या बहुसंख्य मागण्या मान्य.
सकल मराठा समाजातर्फे आंदोलनात मदत करणाऱ्या खालापूर तालुका मराठ्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक.
खालापुर /सुधीर देशमुख :- गेले पाच दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर चाललेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी उपोषणातील जवळपास सर्वच मागण्या महाराष्ट्र राज्य सरकारने आज मान्य केल्याने आजच्या गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी गणरायाने आशीर्वाद रुपी मागण्या मान्य झालेला GR काढल्याने मराठ्यांना गणराय पावन झाले.ह्या बाबतीत शंका नाही.दरम्यान सरकारने मागण्या मान्य करून ताबडतोब GR काढल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडलं आहे.
मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आंदोलन सुरू केलं होत आज आंदोलनाचा पाचवा दिवस होता या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखोच्या संख्येने मराठा आंदोलन मुंबईमध्ये एकत्रित आंदोलनात सहभागी झाले होते कोकणातील मराठा समाज हा बहुतेक गणपती उत्सवात असल्या कारणाने जमेल तसे या आंदोलनात सहभागी होऊन मदत करत होता आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील मराठा बांधवांचे झालेली उपासमारी व पिण्याचे पाणी व शौचालय या मूलभूत सुविधा सरकारने न दिल्यामुळे रायगड,वाशी,पनवेल,उरण, ठाणा,पालघर,जवळील सर्व मराठा बांधवांनी खाण्यापिण्याचे पॅकेट ,फरसाण ,ब्लँकेट, रेनकोट ,फळे अशा मूलभूत सुविधा युक्त सर्व सामान गाड्या भरून मुंबईच्या दिशेने पाठवण्यात सुरू केले.कर्जत खालापूर ह्या भागातून बहुसंख्य मराठा बांधवांनी गणपती सणांमध्ये आपल्या मराठा बांधवांना मदतीचा एक हात पुढे केला व धीर दिला.सरकारला याची जाणीव झाली जर का गणपती विसर्जनानंतर कोकण,रायगड मधला मराठा बांधव मुंबईच्या दिशेने धावला तर मुंबई व महाराष्ट्र सरकारच काही खर नाही.
राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानले आहेत उपोषण सोडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की माझ्या मराठा समाजाचं कल्याण झालं महाराष्ट्रात मराठ्यांचा विजय झाला आहे.आज मराठा समाजाचा सोन्याचा दिवस आहे. अस म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले.
हैदराबाद गॅझेट ची अंमलबजावणी,आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबियांना वारसा ना नोकरी,मराठा आंदोलनावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मान्य,मराठ्यांच्या 58 लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायतीत लावणार, वंशावळ समिती गठित करणे,सगेसोयरे छाननी करण्याचा मुद्दा,मराठा कुणबी एक असल्याचा GR दोन महिन्यात काढण्यात येणार,सातारा औध गॅझेट बाबत 15 दिवसात लागू करण्याचा आश्वासन अशा मागण्या महाराष्ट्र राज्य सरकारने मान्य केल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे.मराठा आंदोलकांनी मागण्या मान्य झाल्यानंतर एकच जल्लोष केला आझाद मैदान व परिसरात दिवाळीच साजरी केली फटाक्यांची अतिश बाजी करत घोषणा बाजी देत परिसर दणाणून सोडला.दरम्यान सर्व आंदोलक हे माघारी आपल्या गावोगावी आनंदात जाण्यासाठी निघाले आहेत.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home