कर्जत नगरपरिषदेला नवीन शववाहिनी प्रदान – आरोग्य सेवेत मोठी भर
"आपत्कालीन सेवेत नवा टप्पा… जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर – ॲड. संकेत भासे"
खालापुर/सुधीर देशमुख:- आज दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता, महाराष्ट्र शासन रायगड जिल्हा परिषद, अलिबाग आरोग्य विभागाच्या वतीने कर्जत नगरपरिषदेला MH-12-XM-3462 क्रमांकाची सुसज्ज शववाहिनी प्रदान करण्यात आली. हा वाहन हस्तांतरण सोहळा कर्जत नगरपरिषद मुख्यालयात पार पडला.
या कार्यक्रमास कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. तानाजी चव्हाण, डॉ. विजय म्हसकर, डॉ. माने तसेच मा. नगरसेवक ॲड. संकेत भासे प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी मुख्याधिकारी श्री. तानाजी चव्हाण यांनी शववाहिनी उपलब्ध झाल्यामुळे आरोग्य सेवेची गुणवत्ता आणि उपलब्धता वाढवण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल असे मत मांडले
या प्रसंगी ॲड संकेत भासे यांनी शववाहिनी उपलब्ध झाल्यामुळे कर्जत परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची व सुलभ वाहतूक सुविधा मिळणार आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य सेवेत सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख दिनेश कडू, शहर संपर्क प्रमुख सुदेश देवघरे, शिवसेना कर्जत शहर समन्वयक पंकज पवार,उपशहर प्रमुख प्रदीप वायकर, युवासेना उपशहर प्रमुख हर्षल मोरे, युवासेना दहिवली विभाग प्रमुख केतन बामणे, विभाग प्रमुख मुद्रे राकेश दळवी, सौरभ केदारी, विशाल बैलमारे, आदी मान्यवर उपस्थित होते.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home