मुद्रे खुर्द येथे आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या विकास निधीतुन व्यायामशाळेचे लोकार्पण..
"तरुणाईच्या उर्जेला नवे बळ – आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकास निधीतून मुद्रे खुर्दला आधुनिक व्यायामशाळा" ... ॲड संकेत भासे
कर्जत / नरेश जाधव :- कर्जत तालुक्यातील मुद्रे खुर्द येथे तरुणांच्या मागणी नुसार उभारण्यात आलेल्या सुसज्ज व्यायामशाळेचे लोकार्पण शुक्रवार, दिनांक ०८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन मा. नगरसेवक ॲड. संकेत भासे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना ॲड. संकेत भासे यांनी सांगितले की, "मुद्रे खुर्द येथील तरुणांची दीर्घकाळाची मागणी आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. या व्यायाम शाळेमुळे तरुणांना खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या संधी वाढतील. शिवसेना कर्जत शहर संघटनेने यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली असुन, गावातील सर्व तरुण आणि नागरिकांनी या व्यायामशाळेचा लाभ घ्यावा," असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रसंगी शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, शहर प्रमुख संजय मोहिते, उपशहर प्रमुख दिनेश कडू, शहर संपर्क प्रमुख सुदेश देवघरे, सल्लागार अशोक मोरे, प्रदीप वायकर, विभाग प्रमुख राजेश दळवी, शिवसेना शहर संघटक नदीम खान, दर्शन वायकर, युवासेना शहर संपर्क प्रमुख मिथिलेश म्हणूनकर, युवासेना शाखा अधिकारी शेखर मुकु, पत्रकार प्रथमेश कुडेकर, युवासेना विभाग प्रमुख सौरभ केदारी, संदेश मोरे, हर्षद जाधव, नितीन मोरे, किशोर कदम, जयदीप शिंदे, ग्रामस्थ मंडळ मुद्रे खुर्द आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामस्थ आणि शिवसेना पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home