खोपोलीचे मुख्याधिकारी यांना बडतर्फ करा : आम आदमी पार्टी तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
शाळेसमोरील मैदान प्रकरणी आप’ने घेतला आहे आक्रमक पवित्रा
खोपोली /प्रतिनिधी :- खोपोली नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा येथील एका शाळेच्या समोरील मैदानावर नगर परिषदेमार्फत अनाधिकृत क्रिकेटचे टर्फ बनवण्यात आले आहे. सदर मैदानातून टाटा पॉवर व मध्य रेल्वेची एक लाख दहा हजार व्होल्ट ची उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात आहे. इतक्या उच्च दाबाखाली टर्फ बनवल्यास विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकते म्हणून टर्फ चे बांधकाम न करता मैदानावर फक्त लॉन टाकण्यात यावे ज्यामुळे मैदान सर्व खेळांसाठी उपयुक्त होईल अशी मागणी आम आदमी पार्टीने नगर परिषदेला केली होती व त्याकरिता नगर परिषदेसमोर तीन दिवसीय धरणे आंदोलन केले होते, परंतु नगरपरिषदेमार्फत सदर मैदानाचे 70 टक्के काम पूर्ण झाले असून आता काम थांबवणे अशक्य असे उत्तर देऊन डावलण्यात आले होते.
मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार आहोत व गरज पडल्यास आझाद मैदानावर उपोषण करणार आहोत असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी सांगितले.
सदर आंदोलनाकरिता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड जयसिंग शेरे,रायगड जिल्हा संघटन सचिव चिमाजी शिंदे, अलिबाग तालुका अध्यक्ष ऍड अजय उपाध्ये, पक्षाचे वरिष्ठ नेते मनोज घरत, खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान, खालापूर तालुका उपाध्यक्ष कस्तुरचंद राठोड, खोपोली शहर उपाध्यक्ष परमेश्वर कट्टीमनी, किशोर पाटील आदी उपस्थित होते.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home