आमदार प्रशांत ठाकुर यांचा वाढदिवस खोपोली भाजप शहराच्या वतीने समाजकार्यातून साजरा.
खालापुर/सुधीर देशमुख :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी कुठलेही शुभेच्छा जाहिरात न करता बॅनर न लावता मोठे कार्यक्रम न घेता प्रत्येक मंडलात फक्त रक्तदान शिबिर आयोजीत करून साजरा करावा असा आदेश पक्ष 'संघटनेने दिले होते. आपल्या नेत्याचे अनुकरण करत भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब यांनी देखील आपला वाढदिवस ५ ऑगस्ट रोजी यंदा समाजसेवेतून साजरा करण्याचे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले होते.
प्रशांत दादांच्या आव्हानाला प्रतिसाद देत भाजप खोपोली शहर मंडलाच्या वतीने ५ ऑगस्ट २०२५ रोजी रोजी सकाळी *९:००* वाजता *विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचे* वाटप हिंदी विद्यालय, 'मोगलवाडी, *१०:००* वाजता *वृक्षारोपण* कार्यक्रम धाकटी पांढरी, विठ्ठल मंदिर साजगाव, *११:३०* वाजता *रुग्णांना फळ वाटप* डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय खोपोली येथे या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमा प्रसंगी लोक नेते रामशेठ ठाकुर यांचा सामाजिक व राजकीय वारसा गोर गरीब विद्यार्थ्यांना कशी शैक्षणिक मदत करू प्रशांत दादा कशा पद्धतीने लोकसेवेतून पुढे चालवित आहेत याची माहिती महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील दिली.
आपला वाढदिवस सामाजिक सेवेतून कसा साजरा करायला सांगितले त्याची माहिती भाजप खोपोली शहर मंडल अध्यक्ष राहुल जाधव यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी विकास नाईक, अजय इंगुळकर, माजी शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर, रामभाऊ पवार, निकेत पाटील,कृष्णा पाटील, माजी नगरसेवक अविनाश तावडे, सूर्यकांत देशमुख, इंदरमल खंडेलवाल, विक्रम साबळे, अनिल कर्णूक, सचिन मोरे, किर्ती ओसवाल, प्रमोद वाघ, संतोष नारखेडे, सुभाष सावंत, हिम्मतराव मोरे, संतोष लोहार, हेमंत नांदे, सुनील नांदे, जितू शाह, राजेश धोत्रे, प्रल्हाद अत्रे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष अश्विनी अत्रे, माजी नगरसेविका अनिता शाह, अपर्णा मोरे, अपर्णा साठे, सुप्रिया नांदे, सुजाता मोहिते, सुमिता महर्षी, स्नेहल सावंत, रसिका शेट्ये, भारती शाह, विभावरी पाठक व असंख्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home