फेरीवाल्यांच्या गाडीवर सिडकोची अंधाधुंद कारवाई
फक्त आंदोलन नाही तर सिडकोला थेट कोर्टात खेचणार :- नासिर भाई
नवी मुंबई/प्रतिनिधी -फेरीवाल्यांच्या गाडीवर सिडकोने अंधाधुंद कारवाई केल्याने नवी मुंबईत गरिबों का मसीहा म्हणून प्रसिद्ध असलेले नासिरभाई यांनी सिडकोच्या विरोधात आंदोलन करून सिडकोला थेट कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे.
गरीब लोकांवर सध्या सिडकोची दादागिरी भलतीच वाढली आहे... त्यामुळे सिडकोच्या नादान कारभाराला वठणीवर आणण्यासाठी नवी मुंबईतील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते नासिरभाई यांनी दंड थोपटले आहेत ....
त्याचे झाले असे ....नवी मुंबई शहराच्या जवळील उलवेनोड येथील बामण डोंगरी स्टेशन समोर फेरीवाल्यांची गाडी पार्किंग मध्ये उभी होती ...असे असताना सिडकोच्या नादान अधिकाऱ्यांनी त्या गाडीची तोडफोड केली. गाड्यांचे तुकडे तुकडे केले.... त्यामुळे गरिबांचे मसीहा म्हणून परिसरात प्रसिद्ध असलेले नासिरभाई या प्रकाराने कमालीचे संतापले.... त्यांनी रात्री तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.... आणि सिडकोच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला .... तसेच पत्रकारांना बोलावून सिडकोची गरिबां विरोधातील दादागिरी दाखवून दिली.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home