Thursday, August 7, 2025

मुख्याधिकारी समस्या सोडविण्यासाठी खालापूरात रहा. खालापूर नागरिकांचे मुख्याधिकारीना निवेदन


खालापूर /दिपक जगताप :- नगरपंचायत हद्दीतील समस्या खालापूर नागरिकांची पाठ सोडण्यास तयार नसून नव्याने नगरपंचायत मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारलेल्या कोमल कराळे यांनी खालापुरात राहण्याचा अनुभव घेत समस्या मार्गी लावा असे निवेदन देण्यात आले आहे. नगरपंचायत खालापुरची पेयजल योजनेचे काम रखडलेल आहे.यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा अद्याप उतरलेला नाही. पाताळगंगा नदीचे दूषित आणि चिखल युक्त पाणी नागरिकांना वापरावे लागत आहे. करोडो चा निधी खर्च केल्याचे दाखवत असताना मूलभूत सुविधांची वाणवा आहे. तालुक्याच्या ठिकाणी वाहन तळ सुविधा नसल्याने कामानिमित्त शासकीय कार्यालयात येणारे नागरिक आणि शासकीय अधिकारी यांची वाहन खालापुरातील हमरस्त्यावर तसेच नागरिकांच्या घरासमोर उभे राहत असल्याने मोठी गैरसोय होते. 


विविध साथीचे आजार पावसाळ्यात डोकवर काढतात तरी देखील कुठेही धूर फवारणी होताना दिसत नाही. सर्व समस्याची जंत्री घेऊन खालापुरातील सामाजिक कार्यकर्त्या क्षमा आठवले, योगेश जाधव ,गणेश पारंगे ,दीपक जगताप ,मनोज कळमकर,सचिन पारठे ,गणेश साळुंखे ,श्री पाष्टे सह नागरिकांनी या समस्यातून मार्ग काढण्यासाठी मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी खालापूरात वास्तव्य करावे असे लेखी निवेदन दिले. मुख्याधिकारी यांच्या अनुपस्थित कार्यालयीन अधिकारी जितेंद्र यादव यांच्याकडे निवेदन दिले. यादव यांनी मुख्याधिकारी कर्जत येथे बैठकीसाठी असल्याचे सांगून लवकरात नागरिकां सोबत बैठक लावण्यात आश्वासन दिले आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home