अकरावी कॉलेज ऍडमिशनचा गोंधळ,विद्यार्थ्यांचा भवितव्य अंधारात.....
शासनाचा ऑनलाईन ऍडमिशनचा सावळा गोंधळ
खालापुर/सुधीर देशमुख :- दहावीचा निकाल 13 मे रोजी लागला व दहावीचे विद्यार्थी 11 वी कॉलेजला जाणार हे स्वप्न बघत आपल्या पुढील भविष्याचे स्वप्न रंगवत असताना त्यांचा शिक्षणाचा गोंधळ राज्य शासनाने ऑनलाईन ॲडमिशनच्या माध्यमातून करून ठेवला.आज 2 महिने उलटुन सुद्धा मुलांचे ऍडमिशन झाले नाहीत व अकरावीचे कॉलेज सुद्धा सुरू झाले नाहीत. शिक्षक,मुख्याध्यापक, पालक,विद्यार्थी असे सगळेच वैतागले आहेत. विशेष करून विद्यार्थी हे नैराश्याची मानसिकता झाली आहे.
प्रत्येक वेळेस पालक मुलांबरोबर कॉलेज मध्ये येतात आपल्या मुलांसाठी पालक आपली सर्व कामे बाजूला ठेवून त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी कामावर दांडी मारतात किंवा कामावर उशिरा जातात.भर पावसा पाण्यात मुलांना घेऊन महाविद्यालयात येतात व बोर्डावर पुढील तारीख बघून व लिस्ट मध्ये आपल्या मुलांचा नाव नाही हे पाहून कॉलेज मध्ये शिक्षक, प्राध्यापक,प्राचार्य यांना प्रश्न विचारतात. त्यांच्या त्याच त्याच प्रश्नांना उत्तरे देत आता वैतागलेल्या अवस्थेत शिक्षक व पालकांमध्ये बाचाबाची व मनस्ताप वाढत चालले आहे. हा सर्व प्रकार शासनाच्या नवीन ऑनलाईन धोरणामुळे व त्यातील त्रुटी यांचा सावळा गोंधळ उडाला आहे. शासनाने लवकरात लवकर विद्यार्थ्यांचा ऍडमिशनचा जो घोळ घातला आहे तो व्यवस्थित करून लवकरात लवकर मुलांचे ऍडमिशन करावे. अशी प्रतिक्रिया पालक आणि विद्यार्थ्यांकडून येत आहेत.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home