"कुंटूर सर्कलमधील OBC महिला राखीव जागेसाठी काँग्रेसकडून न्याय मिळावा — धनगर समाजाच्या युवा नेत्याची मागणी"
सामाजिक कार्यातून जनतेचा विश्वास संपादन केलेल्या संजय पाटील चोंडे यांच्याकडे परिसराची नजर
नांदेड /जावेद अहमद :- शेळगाव छत्री येथील सुपुत्र तथा ग्रामपंचायत सदस्य श्री. संजय बालाजी पाटील चोंडे हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कुंटूर सर्कलमधील OBC महिला राखीव जागेसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार ठरत आहेत.
स्वर्गीय बालाजी पाटील चोंडे यांच्या पाऊलवार पाऊल ठेवून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करून परिसरात ठसा उमटवला आहे. धनगर समाजाच्या युवा नेतृत्वाचे प्रतीक म्हणून संजय पाटील चोंडे यांच्याकडे जनतेचा व कार्यकर्त्यांचा वाढता विश्वास पाहायला मिळत आहे.
स्थानिक पातळीवर विकासकामांबाबत त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे जनतेत त्यांची ओळख एक निष्कपट, प्रामाणिक आणि कार्यक्षम नेता म्हणून झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने कुंटूर सर्कलमधील OBC महिला राखीव जागेसाठी या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांतून होत आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home