Saturday, August 2, 2025

फिरोज पिंजारी यांची डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपमुख्य पर्यवेक्षकपदी नियुक्ती

 


मुंबई / प्रतिनिधी :- दै. कोकण प्रदेश न्यूजचे मुख्य संपादक तथा न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांची आज मानवी हक्क, अधिकार व मुल्यांसाठी लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटना डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपमुख्य पर्यवेक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेचे डायरेक्टर दानिश खान यांनी सदर नियुक्ती केली असून पत्रकार फिरोज पिंजारी यांच्यावर महाराष्ट्रात संघटन बांधणीची जबाबदारी देण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या सूचनांनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील रिक्त पदे भरण्यासह संस्थेच्या नियमांनुसार सर्व काम करतील आणि प्रदेशाच्या संपूर्ण टीमचे पर्यवेक्षण करतील, असे नियुक्ती करतांना डायरेक्टर दानिश खान यांनी सांगितले. 

दरम्यान, नव नियुक्त महाराष्ट्र राज्य उपमुख्य पर्यवेक्षक फिरोज पिंजारी म्हणाले की, डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या तत्वानुसार मी राज्यात संघटनेची बांधणी करेल. तसेच संघटनेने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्ण कसोशीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहिल असेही पत्रकार फिरोज पिंजारी यांनी सांगितले. या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home