Saturday, August 2, 2025

आमदार महेंद्र थोरवे यांची भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला भेट

 


 कर्जत / प्रतिनिधी :- विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चुरशीच्या लढाईमध्ये विजयी झाल्यानंतर कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आज भारतीय जनता पक्षाचे कार्यालयाला भेट दिली. माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी त्यांचे स्वागत केले 1990 ते 2025 या सर्व काळामध्ये युतीमध्ये शिवसेनेचा उमेदवार असल्यामुळे भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी निवडणुकी करता विजयामध्ये कायमच महत्त्वाचा वाटा उचलला. याची आठवण करून देत माननीय आमदार सुरेश भाऊ लाड यांचे सह दीपक बेहेरे,रमेश मुंडे, सुनील गोगटे, यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महायुती म्हणून भारतीय जनता पक्षाला योग्य ते सहकार्य आमदारांकडून व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

 त्यात विविध प्रकारचे निधी उदाहरणार्थ आमदार निधी, खासदार निधी, डोंगरी विकास निधी, 25 15, आदिवासी विकास, बजेट, जिल्हा नियोजन या सर्व कामांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य त्या विकास कामांचा हक्क मिळाला पाहिजे. तसेच विविध विकासकामे यांची उद्घाटने, वेगवेगळ्या शासकीय स्तरावरच्या बैठका, युतीमध्ये ठरलेल्या रेशोप्रमाणे शासकीय समित्यांमध्ये सहभाग,वेगळ्या शासकीय कामांमध्ये आमदारांचे सहकार्य अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

 युतीचा आमदार म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.माझी कमिटमेंट पाच वर्षे आहे. अशा प्रकारे वक्तव्य करून निवडणुकीकरता सर्वतोपरी मदत केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार मोहन यांनी आभार मानले.

 यावेळी माझी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी चाल आणि पुष्प उच्च देऊन आमदार महेंद्र थोरवे यांचा सत्कार केला.

या बैठकीस माननीय माजी आमदार सुरेश लाड तसेच जिल्हा सरचिटणीस दीपक जी बेहेरे , जिल्हा चिटणीस रमेश जी मुंडे, जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर, कर्जत शहर मंडल अध्यक्ष राजेश लाड, कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ, नेरळ शहर मंडल अध्यक्ष नरेश मसने (पप्पू शेठ) ,प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा सुनील गोगटे, उत्तर रायगड सोशल मीडिया प्रमुख गायत्री परांजपे,महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा स्नेहा ताई गोगटे,कर्जत तालुका मंडल माजी महिला मोर्चा अध्यक्षा नम्रता ताई कांदळगावकर, कर्जत मंडल चिटणीस वर्षा ताई सुर्वे,ज्येष्ठ नेते तानाजीराव चव्हाण, माजी नगरसेवक शरद भाऊ लाड, माजी नगरसेवक संकेत भासे, कर्जत शहर प्रमुख विजय जीनगरे, कर्जत मंडळ उपाध्यक्षा सरस्वती चौधरी, कर्जत मंडल उपाध्यक्षा रजनी ताई गायकवाड, कर्जत शहर महिला प्रमुख शर्वरी कांबळे, कर्जत मंडल उपाध्यक्ष दिनेश भरकले, कर्जत मंडल उपाध्यक्ष शैलेश देशमुख, कर्जत शहर मंडल सरचिटणीस अतुल बडगुजर,कर्जत शहर मंडल सरचिटणीस वसंत महाडिक, कर्जत मंडल कोषाध्यक्ष दर्शन ठक्कर, कर्जत मंडल चिटणीस मिनेश मसने,मा. नगरसेवक बलवंत(बैजू) घुमरे,सुषमा ढाकणे. किशोर ठाकरे, देविदास बडेकर,मंदार जाधव,जनार्दन म्हसकर तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home