आ. महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत महसूल सप्ताह साजरा
आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा गौरव
कर्जत प्रशासकीय भवनात अधिकाऱ्यांची उपस्थिती
महसूल विभाग सामान्य लोक आणि शासन यांच्यातील महत्वाचा दुवा - आ. थोरवे
कर्जत / नरेश जाधव :- दरवर्षी १ ऑगस्टला राज्यभर महसूल दिन साजरा केला जात असतो. त्याच अनुषंगाने शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025 रोजी कर्जत-खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जतच्या प्रशासकीय भवनात महसूल दिन साजरा करण्यात आला तसेच महसूल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ. थोरवे यांच्या हस्ते महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट उपविभागीय अधिकारी म्हणून कर्जतचे प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ यांची निवड झाली आहे. उत्कृष्ट सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कृष्णा पालवे तर विभागीय स्तरावर उत्कृष्ट मंडलाधिकारी म्हणून संतोष जांभळे यांचा सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट महसूल सेवक आरती निधी आणि कर्जत महसूल सेवक अशोक भगत यांना सुद्धा याप्रसंगी गौरविण्यात आले.
महसूल विभाग हा सामान्य जनतेला सेवा देण्यात अग्रेसर असून त्यांची मेहनत कौतुकास्पद आहे. शासनाने आणलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुद्धा याच विभागातून होत असते, त्यामुळे सामान्य लोक आणि शासन यांच्यातला महत्वाचा दुवा महसूल विभाग आहे. महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने शासनाने अभिप्रेत केलेल्या योजना राबविण्याची मुख्य जबाबदारी आता महसूल विभागावर आहे. तसेच सामान्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण आणि शासकीय जागेवरची अतिक्रमणे नियमित करणे यासारख्या महायुती सरकारच्या 'न भूतो न भविष्यती' योजना या महत्वाच्या ठरतील, अशी अपेक्षा आ. महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रातांधिकारी प्रकाश संकपाळ, कर्जत तहसिलदार धनंजय जाधव, खालापूर तहसिलदार अभय चव्हाण, कर्जत निवासी नायब तहसिलदार सचिन राऊत, खालापूर निवासी नायब तहसीलदार मिलिंद तिऱ्हेकर, रायगड हॉस्पिटलचे डॉं. धनाशी चव्हाण, सहाय्यक महसूल अधिकारी दिनकर गोल्हर , डी. बी. कांबळे, अशोक सुसलाहे, मंडळ अधिकारी वैशाली पाटील, भरत बाळू सावंत, महसूल सेवक सुनील गायकवाड, सुनील सोनावणे, सोपान पाटील, संकेत मोरे, अरुण हातमोडे, नरेश भोसले, महसूल सहाय्यक तेजल उंबरे, वैभव जाधव, नरसिंह सावंत, सारंग राठोड, सिंधू शिंदे, तलाठी ग्राम महसूल अधिकारी निलेश पवार, पार्वती वाघ, कल्याणी खाडे, अभिजित हिवरकर, जयश्री मोरे, अक्षय गावडे, बाळाराम आढाव, मनोहर वाघ, रोशन सईकर आदी उपस्थित होते.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home