Sunday, August 10, 2025

कुर्ला डाक कार्यालयात रक्षाबंधनातून एकतेचा संदेश

 

कुर्ला /प्रतिनिधी :- रक्षाबंधन हा केवळ भाव-बहिणींचा सण नसून, तो प्रेम, स्नेह, जिव्हाळा आणि विश्वासाचा धागा आहे. हाच सण यंदा कुर्ला डाक कार्यालयात एक आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. शनिवार दि.९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचे औचित्य साधत कार्यालयातील महिला डाक कर्मचारी तथा हिरकणी पुरस्कार प्राप्त शेख सलिमाबी चाँदसाब यांनी कार्यालयात कार्यरत कर्मचारी वर्गास मनगटी राखी बांधून या भावा बहिणीच्या उत्तुंग भावगर्भ रक्षाबंधनातून एकतेचा संदेश दिला आहे. या अनोख्या रक्षाबंधन उपक्रमाने दाखवून दिले की — प्रेम आणि आपुलकीच्या धाग्याने प्रत्येक मन जोडता येते, मग तो कोणताही असो.

भावा बहिणीचे निखळ प्रेम अबाधित असणारा हा राखी पौर्णिमेचा सण सबंध राज्यभर व भारतभर गणला जातो. प्रत्येक घराघरांत या सणाला अनन्यसाधारण असे महत्त्व राहिले आहे. याच सणानिमित्त मुंबई शहरातील डाक विभागात कार्यरत असताना थोडीसी उसंत घेऊन महिला कर्मचारी शेख सलिमाबी चाँदसाब यांनी तेथील कर्मचारी वर्गास राखी बांधून एकतेचा, एकात्मतेचा सबंध राज्यभर संदेश दिला आहे. जीवनाच्या वळणावर आपल्या कुटुंबापासून दूर गेलेले आणि अनेकदा सण-उत्सवाच्या आनंदापासून वंचित राहतात परंतु असे उपक्रम हे सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहेत. यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home