Saturday, November 29, 2025

पूरग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटप

            


देगलूर/जावेद अहमद :- आज दिनांक 28 /11 /2025 रोजी नाम फाउंडेशन व बीएसएफ संस्थेअंतर्गत पूरग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला मानवी हक्क अभियान मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र गवाले यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले त्यामध्ये पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शेतकरी महिलांना बियाणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला.


      त्यासोबतच क्रिसील फाउंडेशनच्या रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत चालणारा प्रकल्पाद्वारे देगलूर तालुका समन्वयक संगीता वाघमारे यांनी गावातील महिलांना आर्थिक साक्षरता याविषयी माहिती दिले विमा पेन्शन सुकन्या योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा, प्रधासनमंत्री जीवन ज्योती विमा, अटल पेन्शन, डिजिटल व्यवहार,नामांकन व रिकेवायसी तसेच बचत गुंतवणूक, आर डी एफ डी,आणि पीपीएफ योजना याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी असंख्य महिला असंख्य महिला, शेतकरी उपस्थित होते.

खोपोलीकरांच्या मनातील कोहिनूर कोण ?

 



* नगराध्यक्षपदावर कुणाची मोहोर बसेल ?

 सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर संताप, समस्यांचे डोंगर आणि मतदारांचा थेट सवाल - अजून किती वर्षे संधी द्यायची आणि खोपोलीचा सत्यानाश करून घ्यायचा ?


खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक केवळ काही दिवसांवर येऊन ठेपली असून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. जुन्या - नव्या उमेदवारांचा उत्साह, मोठ्या नेत्यांच्या सभा, आरोप - प्रतिआरोपांनी रंगणारा प्रचार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांच्या मनात निर्माण झालेले असंतोषाचे वादळ, या सर्वांमुळे खोपोलीची निवडणूक अधिकच रोचक झाली आहे.


या पार्श्वभूमीवर खोपोलीकरांचा थेट सवाल असा आहे की, “इतकी वर्षे सत्ता देऊन काय झाले ? आता पुन्हा त्यांनाच संधी द्यायची आणि खोपोलीचा सत्यानाश करून घ्यायचा का ? 


* खोपोलीकरांच्या डोळ्यांतला राग - उमेदवारांच्या दाव्यांना मूक विरोध ? :- प्रत्येक उमेदवार आपापली ताकद दाखवत आहे. एक संधी द्या, आम्ही विकास करतो...शहराचा विकास आमच्यामुळेच झाला, असे दावे करीत आहेत. तर दुसरीकडे मोठमोठ्या सभांमध्ये नेते एकमेकांवर टीका करीत राजकीय वातावरण तापवत आहेत. परंतु मतदारांचा प्रश्न मात्र सरळ आणि स्पष्ट आहे की, मग इतकी वर्षे खोपोलीची अवस्था बदलली का ?

* पाणीटंचाई ते रस्ते - खोपोलीकरांचे प्रश्न संपत नाहीत :- मतदारांनी मांडलेल्या प्रमुख समस्या अशा की, 


- पाणी समस्या :- 10 महिन्यांचा साठा करणारा तलाव नाही, शहरात पुरेशा पाणीसाठ्याची व्यवस्था नाही, पातळगंगा नदी वर्षभर वाहत असली तरी नागरिकांना पाणीटंचाई जाणवत असते. अनेक भागातील महिलांना बारमाही नदीच्या किनाऱ्यावर बसलेल्या खोपोली नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढावा लागत असतो, ही शोकांतिका नाही का ? 

- नव्या हॉस्पिटलमध्ये सुविधा नाहीत :- नूतन रुग्णालय असूनही एक्स-रे मशीन नाही, सिटीस्कॅन नाही, एमआरआय नाही, रक्त तपासणी प्रयोगशाळा नाही, आयसीयू पूर्ण नाही, एमडी / एमबीबीएस तज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे.

- सरकारी शाळांची बिकट अवस्था :- पायाभूत सुविधांचा अभाव, इमारतींची जीर्ण अवस्था आहे. शैक्षणिक दर्जा खावावला आहे. 

- भाजी मार्केटची अवस्था दयनीय :- मोडकी, ढासळलेली मार्केट इमारत नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.

- कोट्यवधी खर्चाचे रस्ते असूनही खड्ड्यांचा त्रास :- डांबरी आणि काँक्रीट रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे.

- स्ट्रीटलाइट असूनही काही भाग रात्री अंधारात :- वीज असेल, दिवे असतील… पण प्रकाश नाही!

- भूमिगत गटार असूनही सांडपाणी नद्येत :- कोट्यवधींच्या प्रकल्पानंतरही पातळगंगेत दूषित पाणी सोडले जात आहे.

- स्वच्छतेसाठी 12 कोटी वार्षिक खर्च - तरीही गल्लीबोळ अस्वच्छ :- कचऱ्याचे ढीग, मोकाट जनावरे, डास–माशांचा उपद्रव.

- वाहतूक कोंडीचा जीवघेणा प्रश्न :- खोपोली शिळफाटा येथे वर्षानुवर्षे कोंडी ; रुग्णवाहिका अडकणे नागरिकांचा जीव धोक्यात आहे. मतदारांचा सवाल आहे की, 10 वर्ष, 15 वर्ष नगरसेवक...महिने, दोन महिने, सहा महिने, एक वर्ष, पाच वर्ष नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष होते, तेव्हा या समस्यांवर कोणाचेही लक्ष गेले नाही का ?


* आधी काय केले, आता काय करणार ? :- अनेक वर्षांचे नगरसेवक, नगराध्यक्ष, नेते यांच्यावर नागरिकांचा थेट राग व्यक्त होत आहे. बापजाद्यांना संधी दिली, दिवे लावले का ? आता तुम्हाला संधी दिल्यावर काय होणार ? स्वतःच्या परिसराचा रस्ता सुधारू शकले नाहीत, शहराचा काय विकास करणार ? नागरिकांचा असा आरोप आहे की, मत मिळवण्यासाठी उमेदवार घराघरात येतात, पण मतदार समस्या घेऊन गेले की “नेते विकासकामात व्यस्त” असा बहाणा केला जातो.

* खोपोलीचा ‘कोहिनूर’ कोण ? मतदारच ठरवणार :- नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण दावेदारी करू लागले आहेत. परंतु खरा कोहिनूर कोण ? अनुभवी उमेदवार ?नवीन चेहरा ? किंवा संघटित पक्षयंत्रणेचा पाठिंबा मिळवणारा ? हे ठरविण्याचे काम आता खोपोलीकरांच्या हातात आहे.



* 3 डिसेंबरला मतपेटीतून उत्तर मिळणार :- सध्या खोपोलीत जनतेचा आक्रो, राजकीय पक्षांचे आरोप - प्रत्यारोप, विकासाच्या आश्वासनांची गर्दी अशी परिस्थिती आहे. मतदार मात्र शांतपणे सर्व पाहत आहेत. 3 डिसेंबरला खरे उत्तर मतपेटीतून बाहेर येईल व कोहिनूर कोण ठरणार आणि कुणाची वरात निघणार ? हे त्याच दिवशी समजेल.

रविवारी खोपोलीत महायुतीची शक्तीमेळावा सभा

 


नगराध्यक्षपदाच्या रणधुमाळीत कुलदीपक शेंडे यांच्या प्रचाराला वेग

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन ; शिवसेना, भाजप व आरपीआयचे दिग्गज नेते एकत्र - ‘धनुष्यबाण’ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर महायुतीतर्फे भव्य शक्तिप्रदर्शन जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून सभेसाठी शहरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. महायुतीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक रामदास शेंडे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली आहे.

या सभेचे प्रमुख मार्गदर्शक भाजप प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री रवींद्र चव्हाण असून खोपोली शहरातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


* महायुतीची निवडणूक मोहीम निर्णायक टप्प्यात :- या सभेत महायुतीचे दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. यामध्ये प्रमुख उपस्थिती मा.आ. रवींद्र चव्हाण (प्रदेशाध्यक्ष, भाजप), आमदार प्रसाद लाड, आमदार अप्पासाहेब गोगावले, आमदार श्रीधर पाटील, आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर तसेच शिवसेना, भाजप आणि आरपीआय (आठवले गट) यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमुळे खोपोलीतील महायुतीची निवडणूक मोहीम जोरदार गतीने पुढे सरकत असून ही सभा निवडणुकीच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.


* कुलदीपक शेंडे - विकासाभिमुख दृष्टिकोन असलेला महायुतीचा विश्वासू चेहरा :- खोपोलीचे सर्वांगीण रूपांतर करण्यासाठी महायुतीने कुलदीपक रामदास शेंडे यांच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यांच्या प्रचारातील मुख्य मुद्दे दर्जेदार पाणीपुरवठा सुधारणा, शहरातील पायाभूत सुविधांचा विकास, सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा, खोपोली - शिळफाटा वाहतूक कोंडी निवारण, स्वच्छतेची व्यापक मोहीम, तरुणांसाठी रोजगार संधींची निर्मिती या सर्व मुद्द्यांवर काम करण्याचे आश्वासन देत महायुती खोपोलीकरांत विश्वास बाळगून आहे.


रविवार, 30 नोव्हेंबर 2025, सायंकाळी 4 वाजता भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, खोपोली येथे शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी नागरिकांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


खोपोली नगर परिषद निवडणूक 2 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार आहे. यावेळी महायुतीने स्पष्ट आवाहन केले आहे की, नगराध्यक्ष पदासाठी कुलदीपक शेंडे यांना विजय मिळावा, यासाठी ‘धनुष्यबाण’ चिन्हावर मतदान करा, असे आवाहन शिवसेना खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील, भाजप खोपोली अध्यक्ष अजय इंगुळकर, आरपीआय (आठवले गट) अध्यक्ष नितीन वाघमारे यांनी केले आहे.


* खोपोलीच्या विकासासाठी सक्षम, मजबूत नेतृत्वाची गरज :- सभेच्या निमित्ताने महायुतीने नागरिकांसमोर घोषवाक्य ठेवले की, खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी स्थिर सत्ता आणि प्रामाणिक नेतृत्व अत्यावश्यक आहे. महायुती एकदिलाने खोपोलीच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहे.







Friday, November 28, 2025

“आरोग्यसमृद्धी प्रकल्पांतर्गत पौष्टिक रेसिपी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद"

 


खालापुर/प्रतिनिधी :-निरामय हेल्थ फाऊंडेशन व गोदरेज इंटरप्राइजेस ग्रुप यांच्या संयुक्त सहयोगाने आरोग्यसमृद्धी प्रकल्प अंतर्गत महिलांसाठी पोषणयुक्त पाककृती स्पर्धा / पौष्टिक रेसिपी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात एकूण 37 महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान महिलांनी आपल्या पोषणयुक्त पाककृतीची माहिती दिली. 


या कार्यक्रमास परीक्षक म्हणून डायजेशन म्हणून सौ अनामिका शर्मा व डॉ. जिज्ञासा पाटील उपस्थित होत्या. मार्गदर्शक म्हणून ग्रुप ग्रामपंचायत वडवळ चे सरपंच Dnyaneshwar सुतार, गोदरेज इंटरप्राइसेस ग्रुपचे सी. एस.आर. प्रमुख तानाजी चव्हाण, ग्रुप ग्राम पंचायतचे सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. तसेच निरामय हेल्थ फाउंडेशन चे प्रकल्प समन्वयक मंगेश भंडारे, स्वप्नील कदम हेल्थ वर्कर दर्शना मरागजे, साक्षी खामकर, पौर्णिमा गायकवाड, नेहा राजपुरकर, जागृती पवार, वैशाली बलकवडे तसेच ग्रुप ग्राम पंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

खोपोलीच्या विकासासाठी आघाडीची एकजूट !

 


उपमुख्यमंत्री अजित पवार : कार्यकर्त्यांनी मतभेद न ठेवता सुनील पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा !

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून, आज डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भव्य जाहीर सभा पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे), शेतकरी कामगार पक्ष आणि सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टी यांच्या संयुक्त परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉं. सुनील गोटीराम पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती.

 

सभेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह आघाडीतील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


* खोपोलीच्या विकासासाठी ही निवडणूक निर्णायक :- सभेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, खोपोली शहराचा सातत्याने आणि नियोजनबद्ध विकास करणे हेच परिवर्तन विकास आघाडीचे एकमेव उद्दिष्ट आहे. शहर वेगाने वाढत आहे, त्यामुळे मूलभूत सुविधाही तितक्याच मजबूत असल्या पाहिजेत. हे चित्र बदलण्यासाठी सुनील पाटील आणि त्यांच्या टीमला निवडून देणे अत्यावश्यक आहे.


ते पुढे म्हणाले की, सुनील पाटील सुशिक्षित आहेत, खोपोलीच्या गरजांची जाण त्यांना आहे. शहरातील रस्ते, कचरा व्यवस्थापन, जुन्या इमारतींची दुरावस्था हे प्रश्न तातडीने सोडविणे गरजेचे आहे. नवी मुंबई विमानतळापर्यंत येणाऱ्या मेट्रो सेवेला खोपोलीपर्यंत वाढविण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे, असेही ते म्हणाले.


अजित पवारांनी लाडकी बहिण योजना, केंद्र-राज्याच्या विविध विकास योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या सरकारच्या भूमिकेची माहितीही नागरिकांसमोर मांडली.


* खोपोलीत मेट्रो सेवा येण्यासाठी प्रयत्न सुरू :- खोपोलीच्या भौगोलिक सामर्थ्याचा उल्लेख करतांना अजित पवार म्हणाले की, खोपोलीला निसर्गसंपदा विपुल आहे. टाटा जलविद्युत प्रकल्पामुळे वीज व पाणी उपलब्ध आहे. मुंबई - पुणे एक्सप्रेस वे जवळ आहे. नवी मुंबईचा नवा विमानतळ फक्त 35 किमी अंतरावर आहे. लोकल सेवा उपलब्ध या सर्व सुविधांमध्ये मेट्रोची भर पडणे आवश्यक आहे. हा प्रकल्प खोपोलीच्या भावी विकासाला नवी गती देईल.


* शहराच्या मूलभूत सोयींमध्ये बदल करण्याचा निर्धार :- दरम्यान, अजित पवार यांनी शहरातील तातडीच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली. रस्त्यांची झालेली दुरावस्था दुरुस्त केली जाईल. कचरा व्यवस्थापनाची नवी पद्धत राबवली जाईल, जुन्या धोकादायक इमारतींचे ऑडिट अनिवार्य केले जाईल, अंडरग्राउंड ड्रेनेज प्रकल्पाचा विस्तार केला जाईल, शहरातील केबल वायर्स अंडरग्राउंड करण्याची योजना असून उद्योग-व्यवसायांना चालना देऊन रोजगार वाढविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

पवार म्हणाले, खोपोलीच्या पुढील 25 वर्षांचा पाया या निवडणुकीत घातला जाणार आहे.


या सभेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा प्रवक्ते भरत भगत, जेष्ठ नेते दत्तात्रेय मसुरकर यांनी देखील उपस्थित नागरिकांना सुनील पाटील व आघाडीतील सर्व उमेदवारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुनील तटकरे, सुधाकर घारे, भरतभाई भगत, दत्तात्रेय मसुरकर, नगरसेवक मंगेश दळवी, किशोर पानसरे, अंकीत साखरे, शेखर जांभळे, शेखर पिंगळे, संतोष बैलमारे, मनेश यादव, दिनेश जाधव, अश्विनीताई पाटील, वैशाली जाधव, अश्विनी पाटील, जैबुनिसा शेख, संतोष चौधरी यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते तसेच 1 ते 15 प्रभागातील सर्व परिवर्तन विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.







खोपोलीत आज अजित पवारांची जाहीर सभा

 


* परिवर्तन विकास आघाडीसाठी उमेदवारांना बळ

* डॉ. सुनील पाटील नगराध्यक्षपदासाठी सक्षम

* खोपोलीच्या विकासाला नव्या वाटा - संतोष चौधरी

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे), शेतकरी कामगार पक्ष व सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टी यांच्या संयुक्त परिवर्तन विकास आघाडीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉं. सुनील गोटीराम पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

ही सभा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर, रात्री 8 वाजता होणार आहे.

* खोपोलीला उभारी देण्यासाठी घड्याळाच्या बटणावर एकत्र या - संतोष चौधरी :- पोलिस मित्र संघटना, नवी दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष संतोष चौधरी यांनी परिवर्तन आघाडीच्या प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. त्यांनी खोपोलीकरांना आवाहन करताना म्हटले की, खोपोली नगर परिषदेत डॉं. सुनील पाटील यांच्या रुपाने सत्ता दिल्यास अर्थमंत्री अजित पवारांची ताकद त्यांच्यामागे भक्कमपणे उभी राहील.

नगराध्यक्ष म्हणून काम करताना डॉं. पाटील यांनी खोपोली शहराच्या विकासाला जणू आजारातून उठवले होते. मागील पाच - सात वर्षांत सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासकांनी शहराच्या विकासाला खोडा घातला. रायगड तसेच कोकणातील सर्वात श्रीमंत नगर परिषदेचा विकास रखडला आहे.


चौधरी यांनी पुढे सांगितले की, खोपोलीच्या विकासाची नवी वेळ आली आहे. शहर बदलण्यासाठी घड्याळाच्या निशाणीवर एकदिलाने मतदान करा. परिवर्तन विकास आघाडीतील सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी संतोष चौधरी यांनी स्वतःची ताकद, नेटवर्क व रणनिती पूर्ण क्षमतेने झोकून दिली आहे.


* डॉ. सुनील पाटील - अनुभवी नेतृत्वाने सज्ज :- नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीमुळे खोपोलीत पुन्हा एकदा विकासाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. डॉं. पाटील यांनी यापूर्वी केलेल्या विकासकामांमुळे त्यांची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि विकासाभिमुख दृष्टी अनेकांना आकर्षित करीत आहे.

Thursday, November 27, 2025

खोपोली नगराध्यक्षपदावर ‘बदलाची चाहूल’

 


अपक्ष उमेदवार किशोर साळुंके यांचा घराणेशाहीवर जोरदार प्रहार

 ‘कार्यक्षमता शून्य, घराणेशाही पूर्ण’ - सुज्ञ मतदारांचा जळजळीत सवाल

 क्रिकेट मैदानानंतर राजकारणातही विजयी षटकार ठोकण्याचा निर्धार

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्याच घराण्यातून नगराध्यक्ष पद भूषविणाऱ्या उमेदवारांवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “गेली अनेक वर्ष सत्ता दिली, तरी शहराचा विकास काहीच दिसला नाही… मग आता काय घंटा विकास करणार ?” असा रोखठोक प्रश्न मतदारांनी उपस्थित केला आहे.

अशा पार्श्वभूमीवर बहुजन यूथ पँथर पुरस्कृत अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किशोर साळुंके यांनी जोरदार प्रवेश करीत घराणेशाही विरुद्ध जनतेचा मुद्दा अधिक ठळकपणे मांडला आहे. क्रिकेटपटू, पत्रकार आणि युवा नेतृत्वाची ओळख असलेले साळुंके यांना ‘बॅट’ हे निवडणूक चिन्ह मिळाले असून, शहरात “राजकारणाच्या मैदानातही विजयी षटकार ठोकणार” अशी चर्चा रंगली आहे.


* गेल्या अनेक वर्षांचा शून्य विकास :- शहरातील मूलभूत सुविधांपासून रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, शैक्षणिक व आरोग्य सेवा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर शून्य

 काम केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नगराध्यक्ष पद “ठराविक घराण्याची जहागीर” झाल्याची भावना अधिक बळकट होत असून, अनेक रहिवाशांनी थेट प्रश्न विचारला आहे. वर्षानुवर्षे सत्ता मिळाली तरी शहराचा विकास का झाला नाही ? आता तरी काय विकास करणार ? याला उत्तर देताना साळुंके यांनी मतदारांना विश्वास देत म्हटले की, एकदा संधी द्या…मी शहराचा विकास झपाट्याने करून दाखवेन!


* क्रिकेट मैदानातून राजकीय मैदानात दमदार उडी :- किशोर साळुंके हे नाव खोपोलीत क्रिकेटमुळे विशेष ओळखले जाते. त्यांच्या नेतृत्वात अनेक सामने जिंकल्याचा अनुभव असल्यामुळेच त्यांना आता राजकारणातही 'नेतृत्व आणि दृष्टी' असल्याचा दावा समर्थकांकडून केला जात आहे.


त्यांचे समर्थक म्हणतात की, मैदानात सिक्सर ठोकून संघाला विजय मिळवून देणारा नेता… तोच आता शहर विकासाच्या पिचवरही विजयी धाव घेणार!


* जनतेत परिवर्तनाची उमेदीची लाट :- अपक्ष असूनही साळुंके यांना नागरिक, तरुण, व्यापारी आणि क्रीडा क्षेत्रातून मोठा पाठिंबा मिळताना दिसतो आहे. त्यांच्या प्रचारातील मुख्य घोषवाक्य लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. “संकल्प विकसित खोपोलीचा, निर्धार जनसामान्यांच्या प्रगतीचा”


* नगराध्यक्ष व नगरसेवक कामाचा असेल, तेव्हाच विकास :- साळुंके यांनी मतदारांना थेट आवाहन केले आहे की, खरा विकास हवा असेल, तर आपला नगराध्यक्ष कामाचा हवा...बॅट निशाणीवर समोरील बटन दाबा आणि मला प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.



 * परिषद सार्वत्रिक निवडणूक आता अधिक रोमांचक :- घराणेशाहीला कंटाळलेल्या जनतेसमोर आता “अपक्ष आणि काम करणारा उमेदवार” अशी नवी निवड उपलब्ध आहे. पुढील काही दिवसांत चित्र अधिक स्पष्ट होणार असले तरी, जनतेत बदलाची लाट स्पष्टपणे जाणवत असल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

आरटीआय माहिती रोखल्याचा आरोप!

 


अधिकारी व कर्मचार्‍यांवर विभागीय चौकशीची मागणी

एनएचएममधील कथित आर्थिक अनियमिततेच्या तपासातील कागदपत्रे जाणीवपूर्वक न पुरविल्याचा गंभीर आरोप

माहिती अधिकार अधिनियमाच्या उल्लंघनाबाबत दंडात्मक कार्यवाहीची देखील मागणी

अधिकारी व कर्मचार्‍यांवर विभागीय चौकशीची मागणी

 एनएचएममधील कथित आर्थिक अनियमिततेच्या तपासातील कागदपत्रे जाणीवपूर्वक न पुरविल्याचा गंभीर आरोप

माहिती अधिकार अधिनियमाच्या उल्लंघनाबाबत दंडात्मक कार्यवाहीची देखील मागणी


कर्जत / खलील सुर्वे :- एनएचएममध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या फिरती बिलांमध्ये झालेल्या कथित निधी अपहारासंदर्भातील माहिती मागितली असूनही, संबंधित अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर माहिती न देता कायद्याचा भंग केल्याचा गंभीर आरोप एका अर्जदाराने केला आहे. या प्रकरणी विभागीय चौकशीसह दंडात्मक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.


* आरटीआय अर्ज, अपील…तरीही माहिती गायब :- 13 ऑगस्ट 2025 रोजी अर्जदाराने माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 6 (1) अन्वये एनएचएममधील खर्च नोंदी व संबंधित कागदपत्रांच्या प्रती मागितल्या होत्या. कायद्यानुसार 30 दिवसांत माहिती देणे बंधनकारक असतानाही निर्धारित मुदत उलटून गेल्यावरही कोणतीही माहिती प्रदान करण्यात आलेली नाही.


त्यानंतर 26 सप्टेंबर 2025 रोजी प्रथम अपील दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांनी “आठ दिवसांत संपूर्ण माहिती दिली जाईल” असे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनालाही एक महिना उलटून गेला असून माहिती अजूनही उपलब्ध नाही.


* माहिती मुद्दाम रोखली जात असल्याचा गंभीर आरोप :- अर्जदाराने दिलेल्या निवेदनानुसार, अधिकाऱ्यांचे वर्तन गंभीर बाबी सूचित करते. माहिती हेतुपुरस्सर दडविण्यात येत आहे, RTI कायद्याचे उघड उल्लंघन होत आहे, नागरिकांच्या मूलभूत माहिती हक्काचा भंग होत आहे, शासकीय निधीतील संभाव्य अनियमितता झाकली जात असल्याची शक्यता असून कायदेशीर तरतुदींचा थेट भंग झाला आहे. 

अधिकार्‍यांनी माहिती अधिकार अधिनियम, 2005 कलम 7 (1) 30 दिवसांत माहिती न देणे, कलम 7(9) माहिती देण्यास अडथळा आणणे, कलम 18 RTI तक्रार करण्याचा अधिकार, कलम 20 (1) प्रति दिवस ₹250 दंड (कमाल ₹25,000), कलम 20 (2) शिस्तभंगाची कारवाई बंधनकारक आहे.


* महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम :- नागरिकांच्या हक्काचे जाणूनबुजून उल्लंघन - दंडनीय, सार्वजनिक खाते व शासकीय रक्कमांचे संरक्षण नियम, शासकीय आर्थिक नोंदी लपविणे - गंभीर गैरव्यवहार आहे.


* अर्जदाराच्या ठोस मागण्या :- RTI मधील संपूर्ण माहिती तात्काळ उपलब्ध करून द्यावी, माहिती रोखणाऱ्या अधिकाऱ्यांवर स्वतंत्र विभागीय चौकशी करण्यात यावी, डॉं. नितिन गुरव यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, RTI कलम 20 अन्वये दंडात्मक व शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू करावी.


अर्जदाराने निवेदनात नमूद केले आहे की, प्रकरण अत्यंत गंभीर असून शासकीय निधीतील कथित अनियमिततेची चौकशी अडथळ्यात येऊ नये. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून माहिती कायद्यानुसार उपलब्ध करावी.



खोपोली प्रभाग क्रमांक 10 महायुती प्रचार जोमात...

 


* 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना वाहिली आदरांजली.....

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 ची राजकीय रणधुमाळी तीव्र झाली असून प्रभाग क्रमांक 10 मधून उज्ज्वला प्रमोद महाडिक यांच्या प्रचाराला नागरीक सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे उमेदवारांनी सांगितले. स्थानिक महिला मंडळ, मित्र परिवार, तरुणाई आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे या प्रभागात प्रचाराला चांगलाच वेग आला आहे.


* तीनही उमेदवारांना नागरिकांचा पाठिंबा :- खोपोली नगरपालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय या महायुतीच्या माध्यमातून लढवली जात आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार उज्ज्वला प्रमोद महाडिक, हरिश काळे, ॲंड. अनिता पवार हे आहेत. यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे महायुतीचे उमेदवार कुलदिपक शेंडे यांच्या प्रचाराचा ज्वर ही चढला आहे.

26 नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रचार रॅलीत शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नागरिक, महिला आणि युवक, युवती मोठया संख्येने उपस्थित होते. 



Wednesday, November 26, 2025

सगरोळी व सगरोळी परिसरातील विज ग्राहकाना जास्तीचे आलेले बिले आठ दिवसात कमी करुन देण्याच्या अश्वासन नंतर आदोलन माघार

 


बिलोली /प्रतिनिधी :- बिलोली तालुक्यातील सगरोळी व सगरोळी परिसरात जबरदस्तीने विद्युत विभाग स्मार्ट मिटर बसवले आहे सदरील स्मार्ट मिटर सुरुवातीच्या दोन महीने कमी रिडिंग पळत आहे दोन महीन्याच नंतर तेच मिटरचे रिडींग डबल होत आहे या मुळे विद्युत ग्राहकांच्या मनात स्मार्ट मिटर संबधात संशय आहे अनेक ग्राहकांना पच्चावन हजार,एकत्तीस हजार,आठ्ठावीस हजार बिले देण्यात आले. दोन फॅन दोन ब्लफ असलेल्या ग्राहकाला एवढे मोठी रक्कम असलेले बिले येत आहेत या मुळे आनेक विज ग्राहाक विद्युत विभागाच्या अधिकारी समोर रोष व्यक्त केले आहे. विज ग्राहकांचे मिटर तापसणी करुन जास्तीचे येत असलेले विज बिल आठ दिवसात कमी करुन देण्याच्या अश्वासना नंतर सगरोळी परिवर्तन समितीच्या वतीने चालु असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. 

या वेळी विश्वनाथ समन,शंकर महाजन,शिवकुमार बाबणे,प्रभु मुत्तेपोड,बाबु उस्केलवार,सुनिल खिरप्पावार,राजु बामने, शेख मुर्तृज,सचिन कल्लोड,आदिनाथ बाबणे,बाबु पिंजारी,बसस्वेश्वर मुगळे,पांडुरग इबीतवार,विजय शिंदे,वैभव भोसले, संजय पद्दमवार,कोडलांडे नागोराव सह शेकडो नागरीक उपस्थीत होते.यानंतर विज ग्राहकास विद्युत विभागाकडुन आर्थिक पिळवणुक न थाबवल्यास पुढील काळत या पेक्षाही तिव्र जनअंदोलन करण्याचा ईशारा सगरोळी परिवर्तन समीतीकडुन देण्यात आले आहे.

नांदेडमध्ये महिला नायब तहसीलदाराला रंगेहात अटक


रेशन दुकानदाराकडून 5,700 रुपयांची मागणी - लाचलुचपत विभागाचा सापळा

नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर अडचणीत

नांदेड / प्रतिनिधी :- सरकारी अधिकाऱ्यांचा लाखो रुपयांचा पगार असूनही लाच घेण्याचा मोह सुटत नाही, याची चित्तथरारक उदाहरण म्हणून नांदेडमधील एक प्रकरण समोर आले आहे. हदगाव तालुक्यातील महिला नायब तहसीलदार सुमन संभाजी कऱ्हाळे यांना अवघ्या 5,700 रुपयांच्या लाचेच्या व्यवहारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या घटनामुळे हदगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.


* रेशन योजनेतील ‘कमिशन’ म्हणून 20 टक्के रक्कम :- तक्रारदार हा हदगाव तालुक्यात रेशन दुकान चालवणारा दुकानदार आहे. त्याला चार महिन्यांचा धान्य पुरवठा झाला असून त्यातून 5,700 रुपयांचे कमिशन प्राप्त झाले होते. याशिवाय नोव्हेंबर महिन्याचे धान्य ई-पॉज मशीनवर अपलोड झाले नव्हते तसेच 27 नवीन लाभार्थ्यांची नावे अपलोड करणे आवश्यक होते. यासाठी तक्रारदार 18 नोव्हेंबर रोजी नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांच्या भेटीस गेले. तेव्हा त्यांनी चार महिन्यांच्या 57 हजार रुपयांवर 20% रक्कम म्हणजेच 11,400 रुपये लाच म्हणून मागणी केली. शेवटी तडजोडीअंती 10% म्हणजे 5,700 रुपयांवर व्यवहार ठरला. लाचेची रक्कम डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद आप्पाराव जाधव यांच्याकडे देण्यास सांगण्यात आली होती.


* लाचलुचपत विभागाचा सापळा :- तक्रारदाराने तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. शनिवारी विभागाने हदगाव तहसील कार्यालयात सापळा रचला. डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव याने स्वतःसाठी आणि नायब तहसीलदार कऱ्हाळे यांच्यासाठी लाच स्विकारली. पथकाने त्याला रंगेहात पकडले. लगेचच नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांनाही ताब्यात घेऊन अंगझडती करण्यात आली. यावेळी पोलिसांनी दोन मोबाईल फोन जप्त केले. नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांना अटक करण्यात आली असून डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव याला वैद्यकीय कारणास्तव नोटीसवर सोडण्यात आल्याचे समोर आले आहे.


* ‘लाच’ संस्कृतीवर सवाल :- सरकारी अधिकाऱ्यांनी रेशन योजनेतील गरीबांच्या अन्नधान्यावरच ‘कमिशन’ मागणे आणि तेही अवघ्या काही हजार रुपये घेण्यासाठी स्वतःचा मान, पद धोक्यात घालणे, यामुळे हदगाव तालुक्यात संतापाची भावना व्यक्त होत आहे. लाचलुचपत विभागाच्या या कारवाईमुळे प्रशासनातील भ्रष्टाचाराचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.


या प्रकरणातून पुन्हा स्पष्ट झाले की, कितीही मोठा पगार असला तरी लाचेच्या मोहात अडकणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या कमी होत नाही. प्रशासनातील अशा भ्रष्ट प्रवृत्तीवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरत आहे.



गुरुकुल ऑलिंपिक 2025 ची शानदार सुरुवात

रायगड जिल्ह्यातील 32 शाळांचा सहभाग


चौक / प्रतिनिधी :- श्री स्वामीनारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय शाळेत आयोजित ‘गुरुकुल ऑलिम्पिक २०२५’ या भव्य क्रीडा स्पर्धेला आज बुधवार दि. २६ नोव्हेंबर २०२५ ला सकाळी १०. ०० वा.शाळेचे संचालक परमपूज्य आदरणीय विश्वमंगलदास स्वामीजी आणि परमपूज्य ब्रम्हस्वरूपदास स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेचे प्राचार्य डॉ. हरिबाबू रेड्डी सर यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात सुरुवात झाली. उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून विशाल पवार सर (API), सुनील गायकवाड (माजी उपसरपंच), सुधीर माने (अध्यक्ष, न्यू जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र) व आबासाहेब मोरे सर, शिवाजी भासे, शाळेचे सर्व शिक्षकवर्ग आणि असंख्य विद्यार्थी वर्ग मोठ्या उपस्थित होते.

       या स्पर्धेमध्ये सुमारे ३२ शाळांनी सहभाग नोंदवला असून चार तालुक्यांतील शेकडो विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांत आपली प्रतिभा सादर करणार आहेत. स्पर्धा २६, २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी तीन दिवस सुरू राहणार असून विजेत्या खेळाडूंची पुढील नामांकन प्रक्रियेसाठी निवड केली जाणार आहे.

      उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सांगितले की, अशा स्पर्धांमुळे शारीरिक, मानसिक तसेच चारित्र्य विकासाला उत्तम दिशा मिळते. गुरुकुल संस्थेच्या उत्तम नियोजन व आयोजनाबद्दल मान्यवरांनी प्रशंसा व्यक्त केली.

      गुरुकुल ऑलिम्पिक २०२५ या स्पर्धेमुळे परिसरातील क्रीडा संस्कृतीला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tuesday, November 25, 2025

प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुजाता जारे यांचा प्रचार - नव्या नेतृत्वाची चाहूल

 


खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगूल वाजताच प्रभाग क्रमांक 1 मधील राजकारणाला नवा मोड मिळाला आहे. यंदा ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने अनेक अनुभवी नेत्यांसह नव्या उमेदवारांमध्येही चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभागामध्ये ठळकपणे उदयास आलेला नवा चेहरा म्हणजे सुजाता कैलास जारे.


राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुजाता जारे यांच्या प्रचाराला सुरुवात होताच प्रभाग क्रमांक 1 मध्ये बदलाची नवी हवा जाणवू लागली आहे.


* नवीन स्वप्न, नव्या विचारांची उमेदवार :- सुजाता जारे या शिक्षित, सामाजिक जाण असलेल्या नव्या पिढीतील उमेदवार आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळताच त्यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे.


जनसंपर्काच्या मोहिमेत लोकांकडून नव्या नेतृत्वाची अपेक्षा, तरुण विचारांना संधी, स्वच्छ व पारदर्शक कारभाराची मागणी...अशा भावना मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत. सुजाता जारे यांच्या प्रचारसभांमध्ये, पायदळ दौऱ्यांमध्ये आणि घरोघरी संपर्क मोहिमेत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


* प्रभाग क्रमांक 1 मध्ये परिवर्तनाची चाहूल :- सुभाषनगर, लौजी आणि वासरंग या भागांमध्ये सुजाता जारे यांच्या उमेदवारीची चांगलीच चर्चा आहे.

जनतेत नव्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्याची मानसिकता दिसत असून, प्रभाग 1 मध्ये परिवर्तनाची झुळूक जाणवत आहे. स्थानिक नागरिक सुजाता जारे यांच्या साधेपणा, लोकाभिमुख दृष्टिकोन, सामाजिक कार्यातील सातत्य या गुणांचे कौतुक करीत आहेत.






खोपोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये महायुती चा प्रचार जोमात

 



* शिवशक्ती - भीमशक्ती एकत्र, महायुती उमेदवारांना प्रतिसाद

* विकासाच्या वचननाम्यासह प्रचार रॅलींना मोठी गर्दी


खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 ची राजकीय रणधुमाळी तीव्र झाली असून प्रभाग क्रमांक 10 मधून उज्ज्वला प्रमोद महाडिक,हरिश काळे, ॲंड. अनिता पवार यांच्या प्रचाराला नागरीक सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे उमेदवारांनी सांगितले. स्थानिक महिला मंडळ, मित्र परिवार, तरुणाई आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे या प्रभागात प्रचाराला चांगलाच वेग आला आहे.


* विकासाचा ठोस वचननामा जाहीर - शिळफाटा नगरीत बदलाची हाक :- शिळफाटा आणि प्रभाग क्रमांक 10 चा विकास कसा असावा, कोणत्या सुविधा उभ्या रहाव्यात याचा सविस्तर वचननामा शिवसेना - आरपीआय महायुतीच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे. शिळफाटा नगरीत खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे, असे आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी प्रचार रॅलीत बोलताना सांगितले.


* तीनही उमेदवारांना नागरिकांचा पाठिंबा :- खोपोली नगरपालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय या महायुतीच्या माध्यमातून लढवली जात आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार उज्ज्वला प्रमोद महाडिक, हरिश काळे, ॲंड. अनिता पवार हे आहेत. यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे महायुतीचे उमेदवार कुलदिपक शेंडे यांच्या प्रचाराचा ज्वर ही चढला आहे.


* प्रमोद महाडिकांची भूमिका :- आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक म्हणाले की, महायुतीचे सर्व नेते एकदिलाने उभे आहेत. स्थानिक नागरिकांचा प्रेमळ पाठिंबा, संघटनाची ताकद आणि विकासाच्या आराखड्यामुळे नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चित विजयी ठरणार, याचा मला विश्वास आहे.


खोपोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये होत असलेला उत्साही प्रचार, उमेदवारांची सातत्यपूर्ण जनसंपर्क मोहिम आणि नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता महाडिक दांपत्यांच्या उमेदवारीने शहराचे लक्ष वेधले जात आहे.

खालापूर नगरपंचायतीचा घरपट्टी वाढीचा ठराव रद्द

 


नागरिकांच्या बैठकीत प्रशासनाचा निर्णय स्पष्ट

 नवीन कारवाईची प्रक्रिया लवकरच सुरू

 दोन दिवसांत अधिकृत जाहीर सूचना - तरीही पाच गावांतून सामाईक अर्ज सादर करण्याची नागरिकांची तयारी

खालापूर / प्रतिनिधी :- 24 नोव्हेंबर 2025 रोजी नगर पंचायत खालापूर कार्यालयात आयोजित नागरिकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत घरपट्टी कर वाढीबाबत मोठा निर्णय जाहीर करण्यात आला. या बैठकीस नगराध्यक्षा रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष संतोष जंगम, तसेच स्विकृत नगरसेविका शिवानी जंगम व सुप्रिया साळुंखे आदी उपस्थित होते.

 घरपट्टी वाढीचा ठराव रद्द :- बैठकीत झालेल्या चर्चेनंतर खालापूर नगरपंचायतीने घरपट्टी कर वाढीचा ठराव अधिकृतपणे रद्द केल्याची माहिती प्रशासनाने दिली. यामुळे या वाढीव कराच्या विरोधात करावयाच्या हरकती / आक्षेप सादर करण्याची आवश्यकता आता उरलेली नाही, हेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

 नवीन प्रक्रिया नव्याने :- घरपट्टीसंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने बैठकीत स्पष्ट केले. यासाठी आवश्यक तयारी सुरू असून, विषयाची सर्वसमावेशक व पारदर्शक हाताळणी करण्याचा प्रयत्न असल्याची हमीही देण्यात आली.

 दोन दिवसांत जारी होणार अधिकृत जाहीर सूचना :- खालापूर नगर पंचायत लवकरच पुढील दोन दिवसांत या संदर्भातील अधिकृत अधिसूचना (जाहीर सूचना) प्रसिद्ध करणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्याची प्रक्रिया औपचारिक स्वरूपात सुरू होईल.

 पाच गावांतून सामाईक अर्ज दाखल करण्याची नागरिकांची भूमिका कायम :- घरपट्टी ठराव रद्द जरी झाला असला, तरी पाच गावांतील नागरिकांनी एकत्रित सामाईक अर्ज नगरपंचायतीकडे सादर करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. प्रत्येक गावातून नागरिकांच्या सहीसह अर्ज तयार करून तो प्रशासनास देण्यात येणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

Monday, November 24, 2025

नेरळ पोलिस ठाणे हदीत बोरले गावच्या रोड लगत असलेल्या गोल्ब फँटासिया बांधकाम साईडवर चोरी

 


 आरोपीना नेरळ पोलिसांनी केले जेरबंद


कर्जत/नरेश जाधव  :-  नेरळ पोलीस ठाणे हद्दीत बोरले रोड लगत ग्लोब फँटासिया साईड मधे लोखंडी रॉड व सिमेंट गोणी चोरी झाल्या असल्या बाबत नेरळ पोलिस ठाणे येथे गु र. नंबर 207/2025 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

        

सदर गुन्ह्याचा नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो हवालदार वाघमारे, पोलिस शिपाई केकाण, बेंद्रे, वांगणेकर यांनी ग्लोब फँटाशिया साईड मधील सीसीटीव्ह फुटेज तपासले असता ते बंद स्थितीत होते. 


      त्यानंतर सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास व गोपनीय माहिती द्वारे तपास करून आरोपी, राकेश लक्ष्मण पारधी वय-30 वर्षे,तबारक हुसैन अब्दुल्ला खान वय-34 वर्षे, रवींद्र दत्ता कांबळे वय-28 वर्षे,अतिश रामचंद्र चहाड, वय-33 वर्षे यांना पोलीस ठाणे येथे आणून त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे कडे चौकशी केली असता त्यांनी सदरची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीत यांना न्यायालयात हजर केले असता 04 दिवस पोलीस कोठडी मिळाली असून. तपासामध्ये आरोपीत यांच्याकडून 30,000/- हजार रुपयाचे लोखंडी रॉड 103600/- रुपयाचे 370 सिमेंट च्या गोण्या व चोरी करण्यासाठी वापरलेले महिंद्रा कंपनीचा पिकअप जप्त करण्यात आलेला आहे.

           सदर गुन्ह्याचा तपासात मा. पोलिस अधीक्षक रायगड आंचल दलाल, अप्पर पोलिस अधीक्षक अभिजित शिवतारे व कर्जत चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

खोपोली नगरपरिषद निवडणुकीसाठी पोलिसांची कडक तयारी

 


दंगा काबू योजना व रूट मार्चच्या माध्यमातून निवडणुकीत कसून सज्जता

* खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉं. विशाल नेहुल यांचा पाहणी व सुरक्षा आढावा दौरा


खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 शांततामय, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा पोलिस प्रशासन या निवडणुकीत अधिक कठोर आणि सक्रिय भूमिकेत उतरले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉं. विशाल नेहुल व खोपोली पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी शहरातील सर्व प्रभागांना भेट देत निवडणूक यंत्रणेची सखोल पाहणी केली.


आजच्या पाहणीदरम्यान डॉं. विशाल नेहुल यांनी कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. “निष्पक्ष, निर्भय आणि दबावमुक्त निवडणूक हा पोलिस प्रशासनाचा स्पष्ट हेतू असून, कोणत्याही प्रकारची अनुचित हालचाल सहन केली जाणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला. विशेष दक्षता, वाढीव गस्त आणि संशयितांवर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.


2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षेतील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश डॉं. विशाल नेहुल यांनी दिले. मतदान केंद्रांची रचना, सीसीटीव्ही नियंत्रण, पोलिस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थापन, असामाजिक घटकांवरील कारवाई तसेच निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीनची सुरक्षा यांचा त्यांनी काटेकोर आढावा घेतला.


डॉं. विशाल नेहुल यांच्या सूचनांनुसार खोपोलीमध्ये पोलिस दलाने दंगा काबू योजना राबवून तसेच रूट मार्च काढून निवडणूकपूर्व वातावरणात कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची तयारी पूर्ण केली आहे. या कारवाईमुळे खोपोलीतील निवडणूक प्रक्रिया अधिक सक्षम, सतर्क आणि पोलिस नियंत्रणाखाली असल्याचे अधोरेखित झाले आहे.


या निवडणुकीत कुणालाही गैरप्रकार करण्याची संधी मिळणार नाही, असा ठाम संदेश पोलिस प्रशासनाने दिला आहे.

निवडणूक तयारीला वेग - दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा शुभारंभ

 


खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 : निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण 

खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि शिस्तबद्धता राखण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाला आज अधिकृत सुरुवात झाली. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खोपोली नगर परिषद निवडणूक कामकाजाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.


खालापूर येथील लायन्स क्लब सभागृह, गुडलक चौक, जुन्या मुंबई-पुणे महामार्ग, खोपोली येथे आयोजित या प्रशिक्षण सत्राला निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.


याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी (कर्जत) प्रकाश संकपाळ, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार खालापूर अभय चव्हाण तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा खोपोली नगर परिषद मुख्याधिकारी पंकज पाटील हे उपस्थित होते.


प्रशिक्षणाच्या माध्यमातून मतदान केंद्रांची जबाबदारी, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची हाताळणी, मतदान प्रक्रियेतील संवेदनशील मुद्दे, आचारसंहितेचे पालन, सुरक्षा उपाययोजना आणि दिव्यांग मतदारांसाठी करण्यात येणाऱ्या विशेष सुविधा याबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले.

निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना संबोधित करतांना सांगितले की, मतदान दिनाच्या प्रत्येक टप्प्यात अचूकता, शिस्त आणि पारदर्शकता राखणे ही सर्वाधिक प्राथमिकता असून प्रत्येक मतदान कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे व काटेकोरपणे पार पाडली पाहिजे.




या प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रियेतील सर्व संबंधित अधिकारी अधिक आत्मविश्वासाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने मतदानाची तयारी पूर्ण करू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.




खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 साठीचे हे प्रशिक्षण सत्र यशस्वी पार पडले असून, आगामी मतदान प्रक्रियेची सर्वांगीण तयारी अंतिम टप्प्यात आहे.

Saturday, November 22, 2025

खोपोली नगरपरिषदेच्या थेट उमेदवार कुलदीपक शेंडेसह महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या - उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आवाहन....

 


 खालापूर/ प्रतिनिधी :- खोपोली, कर्जत माथेरान यांच्या होऊ घातलेल्या नगरपरिषदांच्या निवडणूक आठ दिवसावर येऊन ठेपल्याने खोपोली लायन्स क्लब येथे शिवसेना भाजप व आर पी आय महायुतीचे महाप्रचार सभा 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पार पडली. 


 या सभेत प्रस्ताविक करताना भाजपा जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन करून ही निवडणूक महत्त्वाचे असून आपण त्याकडे चाणाक्ष वृत्तीने पाहिले पाहिजे. कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील या नगर परिषदेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कुलदीपक शेंडे असून त्याला नगराध्यक्ष बनवण्यासाठी तुम्ही आम्ही मेहनत घेऊन नियोजनबद्ध काम करून आपण केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोचवून त्याचे महत्त्व पटवून द्यायला पाहिजे. त्यानंतर मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले व रेल्वे सारख्या समस्या याबाबतीत केंद्रापर्यंत पाठपुरावा करीन असे सांगेतले यानंतर महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आमदार खासदार यांच्या कार्याबद्दल व त्यांनी केलेल्या विकास कामांचे माहिती देऊन खोपोली नगर परिषदेत थेठ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासह माहितीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आव्हान केले व त्यांच्या विजय उत्सवात मला आमंत्रण करा मी अवश्य येईल असे मार्गदर्शन केले.


 यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय जी सामंत, मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे संपर्कप्रमुख विजय पाटील माजी उपाध्यक्ष भाई शिंदे आरपीआय चे पदाधिकारी व शिवसेनेच्या रायगड महिला प्रमुख सुप्रिया साळुंखे शिवसेना भाजप व आरपीआयचे प्रमुख पदाधिकारी व महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे व इतर सर्व उमेदवार, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी व भाजपचे पदाधिकारी व आरपीआयचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या महाप्रचार सभेत उपस्थित होते.

 

महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदिपक शेंडे यांना निवडून आणणारच !

 


आमदार महेंद्र थोरवे यांना विजयाचा विश्वास 

* स्वत: उमेवाराच्या प्रचार रॅलीमध्ये शामिल  

* शिवसेना, भाजपा, आरपीआय महायुतीचे उमेदवार एकत्र मैदानात

* मागील पाच वर्षातील विकासकामांवर मतदारांचा विश्वास


खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगरपालिकेच्या 2 डिसेंबर 2025 ला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचार मोहीमेला वेग आला आहे. शिवसेना, भाजपा आणि आरपीआय महायुतीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीप शेंडे यांच्या समर्थनार्थ मोठा प्रचारदौरा राबविण्यात येत असून आमदार महेंद्र थोरवे स्वतः प्रचार रॅलीमध्ये सहभागी होऊन आपल्या उमेदवारांना पाठिंबा देत आहेत. रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक, शिवसैनिक आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 


याप्रसंगी आमदार थोरवे म्हणाले की, मागील पाच वर्षांत राज्य सरकारच्या माध्यमातून खोपोलीत महत्त्वाची विकासकामे झाली आहेत. विधानसभा निवडणुकीत खोपोलीकरांनी मला भरघोस पाठिंबा दिला होता. त्याच विश्वासावर 2 डिसेंबरला महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीप शेंडे आणि सर्व 1 ते 15 प्रभागातील उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, याचा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे.


कुलदीप शेंडे हे खोपोली शहरातील तरुण, ऊर्जावान आणि सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांना मिळालेला सामाजिक कार्याचा आणि राजकीय वारशाचा मजबूत पाया तसेच कुटुंबाची सेवाभावाची परंपरा त्यांना जनमानसात लोकप्रिय बनवते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. रॅलीत मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या सहभागामुळे महायुतीचा प्रचार अधिक जोमाने सुरू झाल्याचे दिसत आहे.

जागावाटपात फसवणूक झाली !

 


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा 

आरोप

* उमेदवारांसमोर राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने तणाव

* खोपोलीत परिवर्तन विकास आघाडीत बिघाडी

* अजित पवार गटाबाबत शिवसेना ठाकरे गटात नाराजी


खोपोली / केपी न्यूज ब्युरो :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 चे बिगुल वाजताच सर्व पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. अनेक ठिकाणी युती, आघाड्या आणि काही ठिकाणी स्वतंत्र लढती अशी विविध राजकीय समीकरणे तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची भूमिका असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यात आज मोठी दरी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.


* जागावाटपात आमची फसवणूक :- आज खोपोलीत शिवसेना (उद्धव) गटाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व तालुकाध्यक्ष एकनाथ पिंगळे यांनी खुलासा केला की, आम्ही 10 ते 12 जागा मागितल्या होत्या. राष्ट्रवादीने 10 ऐवजी 8, त्यानंतर 5 जागा देण्याची तयारी दाखवली. तरी सुद्धा ज्या 3 जागांवर तडजोड केली होती, त्या प्रभागातही त्यांनी स्वतःचे उमेदवार उभे केले. ही सरळ सरळ आमची फसवणूक व आघाडीतील विश्वासघात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे परिवर्तन विकास आघाडीतून एकसंध लढतीचे चित्र आता ढासळतांना दिसत आहे.


* आमच्या उमेदवारांसमोरच त्यांचे उमेदवार दाखल :- ठाकरे गटाने पत्रकार परिषदेत सांगितले की, परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे ठरल्यावरही राष्ट्रवादीकडून त्याच प्रभागात, त्याच जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले गेले. यामुळे निवडणुकीतील आघाडीची समीकरणे पूर्णपणे बदलली असून विरोधी मतांचे विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, संपर्क प्रमुख उमेश गावंड, शहर प्रमुख अंकुश पवाली आदी उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रवादीवर तीव्र शब्दांत निशाणा साधत सांगितले की, आघाडीत एकात्मता न राखता, आमच्या उमेदवारांसमोर उमेदवार उभे करणे हा राजकीय बेइमानीचा प्रकार आहे. खोपोलीकरांना स्पष्ट सांगतो की आम्ही फसवणूक सहन करणार नाही.


* आघाडीत बिघाडी - बदलणार राजकीय समीकरणे ? :- या वादामुळे परिवर्तन विकास आघाडी कमकुवत होण्याची शक्यता असून याचा विरोधकांना फायदा होण्याची शक्यता आहे. महायुतीसाठी ही मोठी राजकीय संधी आहे. शिवसेना (उद्धव) गट स्वतंत्र लढतीकडे झुकला तर समीकरणे ढवळून निघणार आहेत. खोपोली निवडणूक त्यामुळे अधिकच चुरशीची आणि रोचक होत आहे.


परिवर्तन विकास आघाडीतील बिघाडी ही केवळ जागावाटपाची नाही तर विश्वास आणि नेतृत्व सन्मानाचा प्रश्न बनली आहे. शिवसेना (उद्धव) गटाने घेतलेली भूमिका आणि राष्ट्रवादीवर केलेले आरोप निवडणूक रिंगणात आगामी दिवसांत मोठा बदल घडवू शकतात, अशी शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.



Friday, November 21, 2025

माघारीनंतरचे चित्र बदलले !

 



खोपोली नगराध्यक्ष निवडणूक : सुधाकर घारे यांचे गणित चुकले का ? सुनील पाटील - रा. काँ. समोर नव्या अडचणी

* उध्दवसेनेची स्वबळावरची लढत, काँग्रेसचा पंजा, आपचा प्रभाव आणि पत्रकार साळुंके - मतांचे ‘गणित’ पूर्णपणे ढवळून निघाले!

खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत माघारीनंतर आज निर्माण झालेले राजकीय वातावरण महायुतीच्या कुलदिपक शेंडे यांच्या बाजूने झुकतांना दिसत आहे. तर दुसरीकडे परिवर्तन विकास आघाडीचे डॉं. सुनील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासमोर नवे प्रश्न उभे राहत आहेत.

* उध्दवसेनेचे 8 ते 8.5 हजार “फ्लोटिंग” मते अनिश्चित :- शिवसेना (उध्दव ठाकरे) स्वबळावर मैदानात उतरली असून, त्यांची 8 ते साडे आठ हजार मते कुणाकडे वळणार, हे दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. या मतांचे काय होणार ? हे सर्वात मोठे कोडेच आहे.


* काँग्रेसचे तौफीक करजीकर ठाम :- काँग्रेसचे उमेदवार तौफीक करजीकर यांच्या पाठीमागे त्यांचि नातेवाईक वर्ग, अल्पसंख्याक समाजातील विश्वासू मतदार, त्यांचा मित्र परिवार आणि काँग्रेसच्या पारंपारिक ‘पंजा’ वारकऱ्यांची मते अंदाजे 5 ते 6 हजार आहेत. ही मते महायुतीला थांबविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला आवश्यक होती ; पण सुनील पाटील आणि एनसीपी नेतृत्व काँग्रेसची समजूत काढण्यात अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे.


* डॉं. रियाज पठाण यांच्या प्रवेशाने शहरातील समीकरणच बदलले :- आम आदमी पार्टी (AAP) चे नगराध्यक्ष उमेदवार डॉं. रियाज पठाण प्रभाग क्रमांक 9, 10 व 13, शिळफाटा, हाळ, भानवज, सुभाषनगर या भागांत चांगला प्रभाव पाडतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यांच्या मतांच्या ‘स्लाइस’मुळे एकूण 2 ते 3 हजार मतांवर थेट परिणाम होईल, अशी शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. 


* पत्रकार किशोर साळुंके यांचा प्रभाव :- पत्रकार किशोर साळुंके यांचा खोपोलीत स्वतःचा स्वतंत्र असा मतदारवर्ग आहे. त्यांच्या मैदानात उतरण्यामुळे 500 ते 1000 मते कोणत्या बाजूला जातील ? हा निर्णायक प्रश्न निर्माण झाला आहे.


* शेंडे विरुद्ध पाटील : थेट लढत झाल्यास सुनील पाटील आघाडीवर :- जर ही लढाई थेट आमने-सामने झाली असती तर परिवर्तन आघाडीचे डॉं. सुनील पाटील किंचित वरचढ होते, असा अंदाज सूत्रांकडून वर्तविला जात होता. पण आता काँग्रेस, आम आदमी पार्टी (AAP), पत्रकार साळुंके व उध्दव सेनेची स्वतंत्र लढत यामुळे विरोधी मतांचे तुकडे पडत आहेत, आणि त्याचा सरळ फायदा महायुतीचे कुलदिपक शेंडे यांना मिळतांना दिसत आहे.


* महायुतीचे वोट 'फिक्स' - शिवसेनेचा ‘किल्ला’ टिकणार ? :- महायुतीचा (शिंदे शिवसेना + भाजप + आरपीआय) मतदारवर्ग ठाम असल्याचे मानले जाते. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत खोपोलीत मोठी आघाडी घेतली होती. खोपोली शहराध्यक्ष संदीप काशिनाथ पाटील हे जरी महायुतीचे उमेदवार असले तरी, शिवसेनेचा बालेकिल्ला टिकवण्यासाठी ते रणनीती आखतांना दिसत आहेत.


* राष्ट्रवादीची गणिते चुकली ? फोडाफोडीत यश, पण रणनीतीत अपयश ? :- राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेतील अनेक नेते आपल्या गटात आणले. प्रचारप्रमुख डॉं. शेखर जांभळेंना रातोरात “राष्ट्रवादीमय” केले गेले, पक्ष प्रवेशाला गती दिली, तरीही रणनीती आखण्यात मोठी उणीव दिसली. आजच्या घडीला मतांचे गणित हातातून गेले, असे दिसत असून अंदाजे 10 ते 15 हजार मतांवर ‘टांगती तलवार’ निर्माण झाल्याचे राजकीय सूत्रांकडून बोलले जात आहे.


* सुनील पाटील यांना आंतरिक विरोध - ‘क्रॉस वोटिंग’ची भीती कायम :- नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सुनील पाटील यांचे नाव जाहीर झाल्यानंतर पक्षात अंतर्गत वाद दिसून आले होते. वरकरणी नाराजी शांत झाल्यासारखी वाटत असली तरी, क्रॉस वोटिंगची शक्यता नाकारता येत नाही. हेच सुनील पाटील यांच्यासाठी मोठे आव्हान आहे.


* पुढील 10 दिवस ठरविणार खोपोलीचे भविष्य :- उध्दव सेनेचे 8,000 + मते, काँग्रेसचा पंजा, AAP ची एन्ट्री, पत्रकार साळुंके यांची लढत यामुळे ही निवडणूक अधिकच तंग होत चालली आहे.


* 'गड आला पण सिंह गेला" अशी वेळ येणार का ? :- सुनील पाटील आणि सुनील तटकरे, सुधाकर घारे बिघडलेले गणित सुधारू शकतील का ? उध्दव सेना, काँग्रेस, आप आणि साळुंके यांच्या ‘फ्रॅक्चर्ड वोट्स’वर मात करू शकतील का ? हे आता 3 डिसेंबर 2025 रोजी स्पष्ट होईल. आगामी 10 दिवसांत सुनील पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणींवर कशी मात करते आणि 3 डिसेंबर रोजी विजयी गुलाल उधळते का ? नाही तर गड आला पण सिंह गेला, अशी गत तर होणार नाही ना ? याची खबरदारी सुनील पाटील घेणार का ? सुधाकर घारे व सुनील तटकरे सर्व आलबेल करण्यात यशस्वी होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.





माझी लढाई खोपोलीच्या विकासासाठी

 


* मी निवडून आलो तर माझा संकल्प, माझा वचननामा खोपोलीकरांसाठीच!

* अपक्ष उमेदवार किशोर साळुंके यांचे मतदारांना थेट आवाहन

* नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार किशोर साळुंके यांची लोकाभिमुख घोषणा

* क्रीडा, पायाभूत सुविधा, आरोग्य, सामाजिक सेवा आणि पारदर्शक प्रशासनाचे आश्वासन

* खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 - अपक्ष उमेदवाराचा दमदार वचननामा जाहीर


खोपोली / मानसी कांबळे :- नगर परिषद निवडणूक 2025 ची राजकीय रणधुमाळी रंगात आली असून, अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किशोर साळुंके यांनी खोपोलीकरांसाठी आपला व्यापक संकल्प व वचननामा जाहीर केला आहे. माझी लढाई कुणाविरुद्ध नाही, माझी लढाई खोपोलीच्या विकासासाठी आहे, अशा शब्दांत त्यांनी मतदारांना थेट आवाहन केले.


पत्रकार साळुंके यांनी मांडलेला वचननामा खोपोलीतील क्रीडा, आरोग्य, पायाभूत सुविधा, हातगाडीधारकांचे प्रश्न, अपंगांसाठी सुविधा, स्मारक उभारणी, कर सवलत आणि नागरिकाभिमुख प्रशासन अशा विविध विकासघटकांवर आधारित आहे.


* खोपोलीच्या विकासासाठी किशोर साळुंके यांचा जाहीर संकल्प :-

- खोपोलीकरांसाठी भव्य क्रीडांगण :- खोपोली शहरात विविध खेळाडूंना एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आधुनिक सुविधा असलेले भव्य क्रीडांगण उभारण्याचा मनोदय.

- हातगाडी धारकांना स्वतंत्र हॉकर्स झोन :- बाजारपेठेतील अडचणी दूर करून हातगाडीधारकांना सुरक्षित, कायदेशीर व व्यवस्थित जागेचे नियोजन.

- अपंगांसाठी विशेष “टपरी सेवा” :- खोपोलीतील दिव्यांग नागरिकांसाठी त्यांच्या गरजेनुसार सोयी उपलब्ध करून देणारी टपरी योजना.

- खोपोलीकरांसाठी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन :- खोनपा क्रिकेट चषक, खोनपा कुस्ती चषक, कबड्डी चषक यामुळे स्थानिक क्रीडाप्रेमींना प्रोत्साहन आणि तरुणांमध्ये स्पर्धात्मकता वाढवण्याचा उद्देश.

- मोफत पार्किंग सुविधा :- वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी मोफत पार्किंगची सोय.

- बाजारातील अतिक्रमण हटाव मोहीम :- नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि खुली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्धार.

- नगरपरिषदेच्या शाळांचे पुनर्वसन :- शैक्षणिक दर्जा वाढवणे, डिजिटल सुविधा, खेळाचे साहित्य, स्वच्छता व पायाभूत सोयींचा विकास.

- अद्ययावत दवाखान्यांची उभारणी :- खोपोलीकरांसाठी परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी आधुनिक दवाखाने.

- छत्रपती संभाजी महाराज व महात्मा फुले स्मारक उभारणी :- खोपोलीत ऐतिहासिक व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा भव्य स्मारक प्रकल्प.

- दर महिन्याला ‘जनता दरबार’ :- नागरिकांच्या समस्या थेट ऐकण्यासाठी निवडून आल्यानंतर प्रत्येक महिन्याला खुले जनसंपर्क बैठकीचे आयोजन.

- पाणी समस्येवर धरण बांधणीद्वारे कायमस्वरूपी उपाय :- खोपोलीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन.

- घरपट्टी व पाणीपट्टी करात ‘50% सवलत’ :- सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी अर्धी कर सवलतचा प्रस्ताव.

- पत्रकार भवनाची उभारणी व पत्रकारांसाठी निवास :- पत्रकारांच्या सुविधा वाढविण्यासाठी स्वतंत्र इमारत आणि निवासाची हमी.

- महिला बचत गटांसाठी स्टॉल उपलब्ध :- महिला सक्षमीकरणासाठी बाजारपेठेत व्यावसायिक स्टॉल्सचे वाटप.

- आकर्षक पर्यटन केंद्राची उभारणी :- खोपोली पर्यटन नकाशावर आणण्यासाठी स्वतंत्र पर्यटन केंद्र व आवश्यक सुविधा.

- बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांवर ‘छत्र उभारणी’ :- शहरातील ऐतिहासिक पुतळ्यांना भव्य छत्र, सौंदर्यीकरण व प्रकाशयोजना.


* हे आश्वासन नाही, खोपोलीकरांसाठी माझी जबाबदारी :- पत्रकार साळुंके यांनी मतदारांना आवाहन करीत सांगितले की, निवडून आलो तर माझा प्रत्येक निर्णय हा पक्षाच्या आदेशापेक्षा खोपोलीकरांच्या हितासाठी असेल. मी अपक्ष आहे, पण खोपोलीकरांचे कर्तव्यदक्ष सेवक म्हणून काम करणार आहे.

माघारीचा अंतिम दिवस संपला - अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली!

 

खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 : एकूण 159 पैकी 34 अर्ज मागे - नगराध्यक्ष पदासाठी आता 7, तर नगरसेवक पदासाठी 118 उमेदवार रिंगणात ; अनेक प्रभागांत मोठे राजकीय बदल

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद निवडणुकीसाठी आज माघारीचा अंतिम दिवस संपल्यानंतर उमेदवारीचे अंतिम स्वरूप जाहीर झाले आहे. एकूण 159 वैध अर्जांपैकी 8 अर्ज नगराध्यक्ष पदासाठी व 151 अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल झाले होते.


यापैकी नगराध्यक्ष पदासाठी 1 अर्ज मागे घेण्यात आला तर नगरसेवक पदासाठी 33 अर्ज मागे घेण्यात आले. यामुळे आता रिंगणात 7 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी व  15  प्रभागामध्ये 118 उमेदवार नगरसेवक पदासाठी उरले आहेत. माघारीनंतरचे हे बदल आगामी लढतीचे राजकीय गणित बदलणारे ठरत असून अनेक प्रभागात त्रिकोनी, चतु:कोनी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.


* नगराध्यक्ष पदासाठी माघार :- नासिर महेमुद मियां पटेल यांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेतला. यामुळे नगराध्यक्षपदासाठीची स्पर्धा आता आणखी तीव्र झाली आहे.


* प्रभागनिहाय नगरसेवक पदासाठी माघार घेतलेले अर्ज :- विविध प्रभागांतून 33 उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक विभागाने जाहीर केली आहे. 

- प्रभाग क्र. 1 अ सारिका राजू पिंगळे

- प्रभाग क्र. 2 ब शिवानी मंगेश दळवी, मोनाली गणेश पालांडे

- प्रभाग क्र. 4 ब शिल्पा स्वप्नील सुर्वे

- प्रभाग क्र. 5 अ विनया संतोष परदेशी

- प्रभाग क्र. 5 ब विशाल तुकाराम गायकवाड

- प्रभाग क्र. 6 अ तेजल शशिकांत पुरी, अश्विनी अरुण पुरी

- प्रभाग क्र. 6 ब मीर वजीद सय्यद, मदीना अशफाक पटेल

- प्रभाग क्र. 7 ब ज्योस्त्ना रवी रोकडे, नवीन राजू हांगे, मंगेश पांडुरंग मोरे

- प्रभाग क्र. 8 अ संदेश शंकर पाटील

- प्रभाग क्र. 8 ब वैशाली मंगेश शिंदे

- प्रभाग क्र. 9 ब संतोषी ज्ञानेश्वर म्हात्रे, रोहिणी हेमंत पाटील

- प्रभाग क्र. 10 ब अंकिता प्रविण महाडिक

- प्रभाग क्र. 10 क नासिर मेहमूदमियां पाटील

- प्रभाग क्र. 11 अ ज्योती रतिलाल जैन, सुलभा यशवंत गायकवाड, अनुजा दत्तात्रेय राक्षे

- प्रभाग क्र. 12 अ वैष्णवी देवेंद्र साखरे

- प्रभाग क्र. 12 ब अर्सला अबूबकर जलगावकर

- प्रभाग क्र. 13 अ स्नेहा सचिन किर्वे

- प्रभाग क्र. 13 ब रितु यशवंत सावंत

- प्रभाग क्र. 14 अ सचिन अनंत पाटील, सुनील जनार्दन नांदे


* माघारीनंतरचे राजकीय गणित बदलणार :- माघारी झाल्यानंतर अनेक प्रभागांत लढती सरळ होण्याऐवजी अधिक गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. काही प्रभागांत प्रमुख पक्षांना दिलासा मिळाला आहे, तर काही ठिकाणी स्वबळावर लढणारे उमेदवार अधिक मजबूत झाले आहेत. खोपोलीतील आगामी 2 डिसेंबरची निवडणूक त्यामुळे अधिक रोचक आणि तणावपूर्ण होण्याची चिन्हे आहेत.

मरखेल येथे वित्तीय साक्षरता कार्यक्रम

 


  देगलूर / जावेद अहमद :- भारतीय रिझर्व बॅंके अंतर्गत जनजागृती मोहीम कार्यक्रमांतर्गत मरखेल येथे आज वित्तीय साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये MSRLM चे लोंढे सर यानी व CRISIL फॉउंडेशच्या संगीता वाघमारे यांनी वित्तीय साकक्षरता व डिजिटल व्यवहार या बद्दल सविस्तर माहिती दिली. 


या वेळी कार्यक्रमांमध्ये एकूण सहभागी 45 जण बचत गटातील महिला उपस्थित होते. त्यामध्ये प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, अटल पेन्शन, राष्ट्रीय पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना, फोन पे व गुगल पे बँकिंग सेवा, ओटीपी बाबतची सजाकता इत्यादी सर्व आर्थिक व्यवहाराशी संबंधित बाबींवर उपस्थित लाभार्थ्यांना माहिती देण्यात आली.

Wednesday, November 19, 2025

मला एक संधी द्या, खोपोलीचा चेहरामोहरा बदलून दाखवेन!

 


महायुतीचे उमेदवार कुलदिपक शेंडे यांचे खोपोलीतील मतदारांना आवाहन : खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 

खोपोली / फिरोज पिंजारी :- नगर परिषद निवडणूक 2025 ची रणधुमाळी सुरू होताच महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदिपक शेंडे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत शहराच्या सर्वांगीण विकासाची हमी दिली आहे. 19 नोव्हेंबर रोजी धाकटी पंढरी येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊनच त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला.


 मी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो, तर खोपोलीचा भविष्यकाळ बदलून टाकेन :- मतदारांना थेट आवाहन करताना कुलदिपक शेंडे यांनी आपली रणनिती, भुमिका स्पष्ट केली.


- पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडवेन :- बारमाही वाहणारी पाताळगंगा नदी आहे, पण पाण्याचा साठा करण्यासाठी सुविधा नाहीत. मी निवडून आलो तर सर्वात पहिले पाणी साठवण प्रकल्प, जलशुद्धीकरण आणि वितरण व्यवस्था उभारण्यावर काम करणार आहे.


- पाताळगंगा नदी परिसराला पर्यटनाचा चेहरा देईन :- नदीच्या दोन्ही काठांवर मी चौपाटीसारखे सौंदर्यीकरण, लाइटिंग, वॉकवे, मनोरंजन क्षेत्र उभारून खोपोलीला पर्यटन नकाशावर आणणार आहे.


- शहरातील वाहतूक कोंडी दूर करेन :- विशेषतः शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक व इंदिरा चौक येथील वाहतूक कोंडीवर मी पक्के उपाय करेन. बाजारपेठ, दीपक हॉटेल, सागर प्लाझा, भाजी मार्केट परिसर येथे नियोजनबद्ध वाहतूक मार्ग तयार करणार आहे.


- रस्ते, पाणी, स्ट्रीट लाइट, आरोग्य आदी मूलभूत सुविधा मजबूत करेन :- नगर परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिक सुविधा उपलब्ध करून देईन. नवीन रस्ते, स्ट्रीट लाईट आणि स्वच्छता व्यवस्थेवर जोर देईन. शिक्षण, आरोग्य, वाहतूक या प्रत्येक क्षेत्रात खोपोलीकरांना दिलासा देणारे निर्णय घेईन.


- खोपोलीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवेन :- ही माझी महत्त्वाकांक्षा नाही, तर खोपोलीकरांसोबत केलेले वचन आहे. एक संधी द्या… शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवेन.


* विकासाची परंपरा पुढे नेऊ, महायुतीला विजयी करा :- कुलदिपक शेंडे म्हणाले की, खोपोलीकरांनी विधानसभा निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजय मिळवून दिला. तेव्हापासून शहरात कोट्यवधींचा निधी येऊन पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. आता नगर परिषद ही महायुतीच्या ताब्यात आली तर शहराचा विकास दुप्पट वेगाने होईल.


मला एक संधी द्या - खोपोलीला विकासाच्या रथावर आरूढ करतो, अशा शब्दांत कुलदिपक शेंडे यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. त्यांच्या मागे महायुतीचे सर्व नेते एकदिलाने उभे असून प्रचाराला उर्जा मिळाली आहे. आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदिपक शेंडे व महायुतीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत.



विठ्ठल दर्शनानंतर महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

 


खोपोली नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडेंचा विश्वास 

खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली - खालापूर परिसरातील लाखों भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या धाकटी पंढरी येथील विठ्ठलाच्या दर्शनाने खोपोली नगर परिषद निवडणुकीतील महायुतीच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात आज 19 नोव्हेंबरपासून झाली. विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन, नारळ फोडून उत्साहपूर्ण वातावरणात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले की, विठुरायाच्या कृपेने व मतदारांच्या पाठींब्याने या निवडणुकीत खोपोली नगर पालिकेवर महायुतीचा भगवा नक्कीच फडकेल. 


* भाजप - शिंदे गट - आरपीआय आणि मित्रपक्ष एकत्र मैदानात :- महायुतीच्या पॅनेलतर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे, प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार राजू दूमने व रजिया खान तसेच महायुतीचे विविध प्रभागातील उमेदवार व पदाधिकारी, शिवसेना खोपोली शहर प्रमुख तथा उमेदवार संदीप पाटील, हरिश काळे, अर्चना पाटील, रूपाली जाधव, प्रमोद महाडीक, दिलीप जाधव, अनिता पवार, वंदना सावंत, रेश्मा गायकवाड, अनिल मिंडे, मुस्कान सय्यद, अनिल सानप, प्राची कांबळे, मयूरी शेलार, श्रुती पोटे, मानसी काळोखे, उज्वला महाडीक यांच्यासह भाजप, शिवसेना (शिंदे गट), आरपीआय आणि मित्रपक्षांचे विविध नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी धाकटी पंढरी परिसर दणाणून गेला.


* दर्शनानंतर प्रभाग 9 मध्ये घरोघरी संपर्क मोहीम :- विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर महायुतीचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची भव्य संपर्क मोहीम सुरू झाली. या मोहिमेत साजगाव विठ्ठल मंदिर, साजगाव बौद्धवाडा, ताकई, बोंझर, आदोशी, शिळगाव, पटेल नगर मिळगाव वाडी या महत्वाच्या परिसरांचा समावेश होता. या संपूर्ण भागात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार राजू दूमने आणि रजिया खान यांनी मतदारांशी संवाद साधत आपली दृष्टी व नियोजन मांडले.


* कार्यकर्त्यांचा जोश - महायुतीचा आत्मविश्वास वाढला :- दर्शनाचे धार्मिक वातावरण, कार्यकर्त्यांचा दणदणीत उत्साह आणि प्रभागातील घरोघरी झालेल्या संवाद मोहिमेमुळे महायुतीचा आत्मविश्वास अधिक वृद्धिंगत झाल्याचे दिसून आले. खोपोली नगर परिषद निवडणुकीत महायुती पूर्ण शक्तीनिशी उतरत असून प्रचाराची गती आगामी दिवसांत आणखी वाढणार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त केली.

Tuesday, November 18, 2025

उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी दोन्ही पॅनेलची ताकद दाखवण्याची चुरस

 


शहरात उत्साह, रॅली आणि घोषणांचा जल्लोष

खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात अक्षरशः उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महायुती आणि आघाडी या दोन्ही पॅनेलने शक्तीप्रदर्शन करीत भव्य रॅली, मोटारींचे काफिले आणि घोषणा यामुळे संपूर्ण शहर दणाणून गेले.

दोन्ही बाजूंकडून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिल्याने निवडणूक रणधुमाळीला उधाण आले होते. सकाळपासूनच महायुतीच्या भाजप - शिवसेना शिंदे गट - आरपीआय पॅनेलने उमेदवारांसह महत्त्वाच्या पदाधिकारी, स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले.

दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, शेकाप आदी आघाडीतील पक्षांनी देखील तितक्याच ताकदीने अर्ज प्रक्रिया पार पाडत आपली एकजूट दाखवली. रॅलीतील बॅनर, ढोल-ताशे आणि कार्यकर्त्यांच्या गगनभेदी घोषणा यामुळे खोपोलीची निवडणूक रंगतदार बनली.

* दोन्ही पॅनेल आमनेसामने - जोरदार उत्साह, शेवटच्या दिवशी गर्दीचे उत्स्फूर्त दर्शन :- उमेदवारीसाठी शेवटचा दिवस असल्याने दोन्ही मोर्चे आपापल्या ताकदीने मैदानात उतरले. प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उमेदवारांना जोरदार पाठबळ देत रॅली अधिक प्रभावी केली.

नगर परिषद भवनासमोर दोन्ही पॅनेलच्या गर्दीमुळे पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. यावेळी कोणताही अनुशासनभंग होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. महायुती व आघाडी या दोन्ही गटांनी “खोपोलीच्या विकासाचे युग आता आम्हीच आणणार” असा दावा करीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.

* महायुतीच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर :- भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि मित्रपक्षांनी मिळून महायुतीचे पॅनेल जाहीर केले असून विविध प्रभागांतून मजबूत उमेदवारांना संधी दिली आहे.


* ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेसची एकजूट :- राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या पुढाकाराने आघाडीच्या महत्त्वाच्या पक्षांनी संयुक्त पॅनेल जाहीर केला. ठाकरे गट, काँग्रेस, शेकाप यांनी एकत्रितपणे विरोधी आघाडीची ताकद दाखवली.

* शेवटच्या दिवशी वातावरण तापले, शहर राजकीय रंगात रंगले :- भव्य रॅली, बॅनर, घोषणाबाजी, मोटरसायकल स्क्वॉड यामुळे खोपोली शहर पूर्णपणे निवडणूक मोडमध्ये शिरले. महिलांचा मोठा सहभाग, तरुणांची उपस्थिती आणि रस्त्यावरील उत्साह पाहता या निवडणुकीत चुरस वाढणार हे निश्चित झाले आहे. नेत्यांनी प्रत्येकी आपला विजय निश्चित असल्याचा दावा करीत प्रतिस्पर्ध्यांच्या ताकदीकडे कमी लेखले नाही. दोन्ही पॅनेलच्या शक्तीप्रदर्शनामुळे आगामी निवडणूक अधिक रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत.

* खोपोलीची लढत : प्रतिष्ठेची, विकासाची आणि राजकीय एकत्रीकरणाची :- या निवडणुकीत महायुती आणि आघाडी या दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची लढत सुरू असून एकूणच शहरातील राजकीय समीकरणे हादरवणारी ही निवडणूक ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

* महायुतीतील उमेदवारांची यादी :-

- (भाजप) प्रभाग 4 प्रतिभा रेटरेकर, प्रभाग 5 सोनिया रूपवते, प्रभाग 5 ब इंदरमल खंडेलवाल, प्रभाग 6 - संजय तन्ना, प्रभाग 7 सुजाता मोरे, प्रभाग 11 सानिया शेख, प्रभाग 11 ब विक्रम साबळे, प्रभाग 14 किशोर पाटील.

- शिवसेना (शिंदे गट) प्रभाग 1 अ संदीप पाटील, प्रभाग 1 ब श्रुती पोटे, प्रभाग 2 अ अमित फाळे, प्रभाग 2 ब- मानसी काळोखे, प्रभाग 3 अ प्राची कांबळे, प्रभाग 3 ब अनिल सानप, प्रभाग 4 अ माधवी रिठे, प्रभाग 6 अ मयूरी शेलार, प्रभाग 7 दिलीप जाधव, प्रभाग 8 रुपाली जाधव, प्रभाग 8 ब रुक्साना जळगावकर, प्रभाग 9 अ राजू दूमने, प्रभाग 9 ब रजिया खान, प्रभाग 10 अ अनिता पवार, प्रभाग 10 क हरीश काळे, प्रभाग 12 अ शबाना खान, प्रभाग 12 ब रॉबिन सॅम्युअल, प्रभाग 13 अ अविनाश किरवे, प्रभाग 13 ब वंदना सावंत, प्रभाग 14 रेश्मा गायकवाड, प्रभाग 15 अ जिनी सॅम्युअल, प्रभाग 15 ब संदीप पाटील.

- (आरपीआय) प्रभाग 10 ब उज्वला महाडीक  

* आघाडीतील उमेदवारांची यादी :-

- राष्ट्रवादी (अजित पवार) प्रभाग 1 अ मंगेश दळवी, प्रभाग 1 ब रेखा जारे, प्रभाग 2 अ चंद्रप्पा अनिवार, प्रभाग 2 ब उर्मिला देवकर, प्रभाग 3 अ किशोर पानसरे, प्रभाग 3 ब माधुरी तांबे, प्रभाग 4 अ वर्षा साळुंखे, प्रभाग 4 ब विनायक तेलवणे, प्रभाग 5 समीर मसुरकर, प्रभाग 5 ब- हर्षदा गायकवाड, प्रभाग 6 अ योगेश औटी, प्रभाग 6 ब कुंदा वझरकर, प्रभाग 7 अ प्रशांत शेंडे, प्रभाग 7 ब ऐश्वर्या खेडकर, प्रभाव 8 अ यश जाधव, 8 ब प्रिया फावडे, प्रभाग 10 अ मेघा वाडकर, प्रभाग 10 ब दर्शना आंग्रे, प्रभाग 10 क उबेद पटेल, प्रभाग 13 अ प्रमिला सुर्वे, प्रभाग 13 ब अनिल गायकवाड, प्रभाग 14 अ दत्तात्रेय मसुरकर, प्रभाग 14 ब प्रतिमा देशमुख, प्रभाग 15 अ गणेश राक्षे, प्रभाग 15 ब श्वेला आहिर.

- शिवसेना (ठाकरे गट) प्रभाग 2 संतोष देशमुख, प्रभाग 6 दिलीप पुरी, प्रभाग 8 गायत्री जाधव, प्रभाग 9 अंकीता शिथ, प्रभाग 10 सुरेखा खेडकर, प्रभाग 12 तन्वी रूपवते, प्रभाग 13 जयश्री चाळके व नितीन पवार, प्रभाग 14 - रोहिणी नायकुडे

- (शेतकरी कामगार पक्ष) प्रभाग 6 अरुण पुरी, प्रभाग 7 रवींद्र रोकडे, प्रभाग 9 तस्लिमा पाटील, प्रभाग 11 संतोष मालकर व शिल्पा मालकर, प्रभाग 12 अबू जळगावकर.



Monday, November 17, 2025

खोपोली प्रभाग क्रमांक 6 मधून मदिना अशफाक पटेल अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात

 


 खालापूर/ प्रतिनिधी :- खोपोली नगरपरिषदेच्या वॉर्ड क्रमांक 6 मधून आगामी निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून मदिना अशफाक पटेल या निवडणुकीच्या रिंगणात निवडून येण्याच्या जय्यत तयारीने प्रचाराच्या तयारीला सुरुवात केली. खोपोली वॉर्ड क्रमांक 6 मधून स्थानिक महिला मंडळ, मित्र परिवार, युवा मंच, नवतरुण मंडळ, व नागरिकांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे सध्या संपूर्ण वॉर्ड चे लक्ष लागले आहे.


खोपोली मध्ये जन्मलेल्या व लहानाच्या मोठया झालेल्या रफिक सय्यद परिवाराची मुलगी पुढे लग्न अशफाक पटेल यांच्याशी होऊन गेली अनेक वर्ष खोपोलीत राहत असून खोपोली करांच्या अनेक समस्या जाणत असून त्या सोडविण्यासाठी गेली अनेक वर्ष पती अशफाक पटेल यांच्या बरोबर सामाजिक कामामध्ये सक्रिय राहत अशफाक भाई पटेल युवा मंच व खिदमते खल्क सामाजिक संस्था मार्फत अनेक शैक्षणिक, संस्कृतीक, समाजाच्या उपयोगी असणारे कार्य, उद्योजक अशफाक भाई पटेल यांच्या मार्फत कार्यक्रम करत आले. स्थानिक नागरिकांमध्ये मदिना अशफाक पटेल यांचे व्यक्तिमहत्व साधे, सर्वसामावेशक, आणि सेवा भावी म्हणून ओळखले जाते.


निवडून आल्यास वॉर्ड 6 मधील मूलभूत सुविधा लोकांना देण्याचा प्रथम काम करणार. पाणी, रस्ते, प्रकाश योजना, नाले सफाई, पार्किंगची सुविधा, महिलांसाठी सुसज्य टॉयलेट, मुलांसाठी गार्डन, या सर्व विकास कामासाठी निवडणूक लढवून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक आठवड्यात लोकांना वेळ देणार . "एक मत मदिना अश्फाक पटेल साठी, "एक मत विकासासाठी" स्थानिक नागरिकांनी मदिना अशफाक पटेल यांच्या अपक्ष उमेदवारीचे स्वागत करताना यावेळेस आपल्या वॉर्डात महिला नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे. मदीना अशफाक पटेल ह्या नेहमी काम करणाऱ्या व सदैव लोकांच्या मध्ये उपलब्ध असणाऱ्या व्यक्ती आहेत असे मत जनतेने व्यक्त केले.


कोणतेही राजकारण नाही तर फक्त समाजकारण हे धोरण ठेवत खोपोली नगरपरिषद निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 6 हा विकास आणि पारदर्शकतेचि लढत म्हणून पाहिलं जात आहे.

खोपोलीत ‘स्वच्छ पर्याय’ मैदानात

 


* आम आदमी पार्टीचे नगराध्यक्ष व 11 नगरसेवकांचे अर्ज दाखल

* भ्रष्टाचारमुक्त खोपोली, पारदर्शक प्रशासन आणि मूलभूत सुविधांच्या हक्कासाठी 'आप'ची लढाई

* खोपोलीचा चेहरा बदलवू, एक संधी द्या - डॉं. रियाज पठाण

खोपोली / केपी न्यूज ब्युरो :- खोपोली नगर परिषदेचा रणसंग्राम आता आपल्या लढाई क्षेत्रात प्रवेश करीत आहे. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बलाढ्य शिवसेना - भाजप - आरपीआय महायुती व राष्ट्रवादी अजित पवार गट‌‌‌ - शिवसेना उध्दव ठाकरे - शेतकरी कामगार पक्ष यांच्या परिवर्तन विकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. उद्या छाननी आणि मग माघारीपर्यंत 'वेट अँड वॉच' अशी काहींची भुमिका असेल पण आम्ही कसे खोपोलीकरांचे लाडके आहोत...आम्हाला कसा मतदारांचा पाठींबा आहे...आम्ही कसे जिंकणार, आमच्यासोबतच कसे पदाधिकारी, कायकर्ते व नागरीक आहेत, हा दाखविण्याचा प्रयत्न करीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. दरम्यान, आम आदमी पार्टीने कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता खोपोलीच्या विकासाचा ध्यास घेत नगराध्यक्ष पदासाठी तसेच 11 नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. “प्रामाणिकता, पारदर्शकता आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी लढणारे राजकारण” अशी हाक देत 'आप'ने या निवडणुकीत खऱ्या अर्थाने स्वच्छ, नवा, प्रामाणिक पर्याय उभा केला आहे.


* खोपोलीच्या विकासाचा नवा आराखडा :- आम आदमी पार्टीने निवडणूक लढवत खोपोलीसाठी प्राधान्यक्रम जाहीर केले आहेत. भ्रष्टाचारमुक्त खोपोली, मूलभूत सुविधा : पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता तसेच जागतिक दर्जाचे शिक्षण आणि आरोग्य, 100% कचरा व्यवस्थापन व्यवस्था, बेकायदेशीर टेंडर, टक्केवारी राजकारणाविरोधात मोहीम, पाताळगंगा जलस्रोतावर आधारित कायमस्वरूपी जलव्यवस्था, वाहतूक कोंडी, शिळफाटा–गाजी बाबा दर्गा रस्ता समाधान आदी विषयांवर जिंकून आल्यावर काम करू, असा नवा विकास आराखडा 'आप'ने जाहीर केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी व शिवसेना शहराच्या विकासाबाबत न बोलता एकमेकांचे नेते, कार्यकर्ते पळविण्यात व्यस्त आहेत.


* सत्ता 20 - 25 वर्ष एका गटाकडे…तरी खोपोली मागेच का ? :- सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट‌‌‌ व शिवसेना शिंदे गट भाजपासह केंद्र व राज्यात सत्तेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अनेक वर्ष आमदार होता...आता शिवसेनेचा आमदार आहे, तरी खोपोलीतील अनेक मुलभूत प्रश्न 20-25 वर्षापासून सुटलेले नाहीत. 'आप'ने सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल करीत काही मुद्दे स्पष्टपणे मांडले. ते म्हणाले की, पावसाळ्यात तुफान पाऊस असताना देखील टाटा कंपनीने एक दिवस पाणी सोडणे बंद केले की पाणी टंचाई का ? कोट्यवधींचे टेंडर देऊनही शहर कचऱ्यात का बुडते ? नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वतःच्या घराचा रस्ताही करू शकले नाहीत, मग खोपोली काय बदलणार ? अल्पसंख्याक वस्त्यांना महामार्गांवरून आत येण्यासाठी रस्ताही नाही, 25 वर्षांच्या सत्तेत हेही शक्य नाही ? कब्रस्थान स्वच्छतेसाठीही नागरिकांना संघर्ष, हे विकासाचे मॉडेल ? स्मशानभूमी दुरुस्तीसाठी व स्वच्छतेसाठी वारंवार अर्जफाटे करावे लागतात? नगर परिषद शाळांची अवस्था अत्यंत हलाखीची आहे. नगरसेवक असतांना आपल्या प्रभागाचा विकास न साधू शकलेले, आता शहर विकासाच्या गप्पा मारत आहेत ? दोन्ही पक्षांना खोपोलीकरांनी अनेक वर्षे संधी दिलीपण विकास कोठेच दिसला नाही, असा घणाघात आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी केला आहे.


* डॉं. रियाज पठाण यांचे भाष्य : खोपोलीचा चेहरामोहरा बदलणार…बस एक संधी द्या :- नगराध्यक्ष पदाचे आम आदमी पार्टीचे उमेदवार डॉं. रियाज युसूफखान पठाण म्हणाले की, तीन वर्षांपासून खोपोलीच्या प्रत्येक समस्येवर फक्त आम्ही आवाज उठविला आणि कामे मार्गी लावली आहेत. ताकई रस्ता 'आप'च्या संघर्षाने झाला. इंदिरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गाजी बाबा दर्गाह चौक, गुलडक चौक यांना मोकळा श्वास 'आप'मुळे मिळाला. मुंबई - पुणे जुना महामार्ग रूंदीकरण, स्ट्रिट लाईटची आजची झगमगाट फक्त आणि फक्त 'आप'मुळे आहे. मिल्लतनगर, उमरजी पटेल नगर, शिळफाटा, लौजी, मुळगाव येथील समस्या 'आप'ने सोडविल्या... सत्ता नसतानाही 'आप'ने आंदोलन, मोर्चे, उपोषणाचा मार्ग अवलंबत विकास कामे करून घेतली...विरोधकांच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेल्या प्रभागातील समस्या आम आदमी पार्टीने सोडविल्या आहेत आणि ज्या प्रभागाचा विकास करता आला नाही, ते शहराचा विकास करायला निघाले आहेत. तरी खोपोलीकरांनी डोळे उघडून, सद्सद्धविवेक बुध्दीचा वापर करून आपल्या व आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम आदमी पार्टीला साथ द्यावी. आज नागरिकांना स्वच्छ राजकारणाचा पर्याय हवा आहे आणि आम्ही तो दिला आहे, तरी आम्हाला एक संधी द्या, आम्ही खोपोलीचा चेहरामोहरा बदलून टाकू, असे आवाहन डॉं. पठाण यांनी केले आहे.


* ग्यासुद्दीन खान : खोपोलीला जागतिक दर्जाचे शहर बनवू :- प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार तथा आम आदमी पार्टीचे खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले की, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शेकाप या सर्व पक्षांना खोपोलीकरांनी संधी दिली आहे. आता खोपोलीला नव्या विचारांची गरज आहे. आम्ही खोपोलीला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचा निर्धार आम्ही केला आहे, तरी आम आदमी पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉं. रियाज पठाण व इतर 11 उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन खान यांनी केले. 


* आम आदमी पार्टीचे उमेदवार :- नगराध्यक्ष पद डॉं. रियाज युसूफखान पठाण, नगरसेवक पद ग्यासुद्दीन खान (प्रभाग 1 ब), वैशाली वाघमारे (प्रभाग 10 ब), डॉं. रियाज पठाण (प्रभाग 10 क), अभिषेक परदेशी (प्रभाग 14 अ), नसरीन नासिर खान (प्रभाग 9 ब), शकीला जहीर अहमद शेख (प्रभाग 8 ब), मुमताज अल्ताफ मन्सुरी (प्रभाग 13 अ), रोशनी कैलास परदेशी (प्रभाग 10 अ), धर्मेंद्र चौहान (प्रभाग 7 ब), अर्चना राहुल बोरे (प्रभाग 2), मदिना अशपाक पटेल (प्रभाग 6) अशी आहेत. 


* खोपोलीतील राजकारणात ‘आप’चे आव्हान :- राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, आम आदमी पार्टीचने अर्ज दाखल केल्याने खोपोलीतील परंपरागत समीकरणांना मोठा धक्का बसू शकतो. विशेषतः अल्पसंख्याक बहुल प्रभागांमध्ये ‘आप’चे उमेदवार मजबूत आहेत.

कर्जतमध्ये महायुतीचे शक्तीशाली प्रदर्शन!

 


शिवसेना शिंदे - भाजप - आरपीआयचा दणदणीत शक्तिसागर 

 नगराध्यक्षपदासाठी डॉं. स्वाती लाड मैदानात

* युतीचे दिग्गज नेते, विशाल रॅली आणि गगनभेदी घोषणा - कर्जतचा रणसंग्राम तापला!

कर्जत / नरेश जाधव :- कर्जत नगर परिषद निवडणुकीत आज महायुतीने ‘शक्ती प्रदर्शन म्हणजे नक्की कसे असते’ याचा थरारक प्रत्यय शहराला दिला. शिवसेना शिंदे गट, भाजप आणि आरपीआय या तिन्ही पक्षांनी एकत्रित दमदार ताकद दाखवत नगराध्यक्ष तसेच 21 प्रभागांसाठी संभाव्य उमेदवारांची विजयी मिरवणूक काढत कर्जतचे राजकीय वातावरण अक्षरशः दणाणून सोडले.


* धापया महाराजांच्या दर्शनाने प्रारंभ :- रॅलीची सुरुवात शहराचे ग्रामदैवत श्री धापया महाराजांच्या मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉं. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांना महायुतीच्या नेत्यांनी पुष्पहार अर्पण करीत विजय संकल्प व्यक्त केला. ढोल-ताशांचा कडकडाट, बॅनर - पोस्टरची रेलचेल, मोटारसायकली - जीप - कारांच्या लांबलचक फौजा आणि उत्साहात नाचणारे कार्यकर्ते असा अभूतपूर्व जल्लोष करीत रॅली अर्ज दाखल केंद्रावर दाखल झाली.


या शक्ती प्रदर्शनाने कर्जतच्या राजकीय नकाशावर युतीची पकड अधोरेखित केली आहे. याप्रसंगी महायुतीचे प्रमुख नेते आमदार प्रशांत ठाकूर, आमदार चित्रा वाघ, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, विधानसभा संपर्क प्रमुख किरण ठाकरे, माजी उपसभापती मनोहर थोरवे, वसंत भोईर, अतुल बडगुजर, शरद लाड (माजी नगराध्यक्ष), राजेश लाड, रजनी गायकवाड, राहुल डाळिंबकर (माजी उपाध्यक्ष), दीपक बेहेरे, रमेश मुंढे, अरविंद मोरे, लालधारी पाल आदींची उपस्थिती महायुतीच्या अंतर्गत एकजूट आणि आत्मविश्वासाचे द्योतक ठरली.


* नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून ‘स्मार्ट फेस’ - डॉं. स्वाती अक्षय लाड :- आजच्या शक्ती प्रदर्शनातील सर्वात मोठा ‘राजकीय ट्विस्ट’ म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी भाजपने डॉं. स्वाती अक्षय लाड यांच्या नावाची घोषणा केली व त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या उच्चशिक्षित, तल्लख, जनसामान्यांशी सहज संवाद साधणाऱ्या, माजी आमदार सुरेश लाड यांच्या सुनबाई आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला राजकीय वजन आणि प्रादेशिक स्विकारार्हता दोन्ही मिळत आहे. भाजपने त्यांना ‘आश्वासक आणि विजयी चेहरा’ म्हणून ज्या पद्धतीने पुढे केले, त्यातून युतीचा आत्मविश्वास स्पष्ट दिसून आला.


* विरोधकांच्या शोला दिलेले प्रत्युत्तर :- अलीकडेच परिवर्तन विकास आघाडीने घेतलेल्या शक्ती प्रदर्शनाला महायुतीने आज दणक्यात उत्तर दिले. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, विरोधकांची ताकद पाहून नव्हे… तर युतीची खरी घनता दाखविण्यासाठी हे प्रदर्शन होते. आमदारांपासून ते छोटे–मोठे पदाधिकारी, अगदी कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी एकजुटीने सहभाग घेतल्याने "कर्जतमध्ये यावेळी महायुतीची हवा जोरात आहे,” अशी चर्चा शहरात रंगली आहे.


* कर्जतचा रणांगण रंगतदार :- नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण होताच कर्जतचा निवडणुकीचा पट फारच रोचक बनला आहे. काही प्रश्नांभोवती आता सगळे राजकारण गरम झाले आहे. परिवर्तन विकास आघाडीचे अंतिम पत्ते काय असतील ? महायुती शहरात कितपत वाढत आहे ? अल्पसंख्याक - दलित प्रभागांमध्ये कोण वरचढ ? स्विंग मतदार कोणाकडे झुकतात ? उशिरा अर्ज भरलेल्या उमेदवारांचे समीकरण काय ? कोणती नवी गठबंधने किंवा राजकीय धक्के समोर येतात ? सध्या संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीच्या पुढील टप्प्याकडे लागले आहे.


* कर्जत निवडणूक ‘हाय व्होल्टेज’ :- आजच्या महायुतीच्या दमदार शक्ती प्रदर्शनाने कर्जत नगर परिषदेचा राजकीय पट पूर्णपणे हलवून टाकला आहे. आगामी काही दिवसांत प्रचारयुद्ध, आरोप - प्रत्यारोप, सभांमधील गर्दी आणि घराघरातील तळागाळचा संपर्क या सर्वांचा मिलाफ कर्जतचा पुढील नगराध्यक्ष आणि सत्ताधारी गट ठरवणार आहे.