Tuesday, October 7, 2025

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मा.नेहा भोसले मॅडम खालापुर पंचायत समिती कार्यालय

 

खालापुर/सुधीर देशमुख :- आज दिनांक ०७.१०.२०२५ रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मा.नेहा भोसले मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली खालापूर येथे आढावा सभा घेण्यात आली सदर आढावा सभेचे प्रास्ताविक मा.गटविकास अधिकारी श्री.संदीप कराड सर यांनी केले त्यानंतर मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मा.नेहा भोसले मॅडम यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान बाबत ७ घटकांवर सखोल मार्गदर्शन केले व ग्रामपंचायत निहाय विविध विषयांचा आढावा घेतला तसेच मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री.तनपुरे साहेब यांनी देखील मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान बाबत मार्गदर्शन केले तसेच मा.प्रकल्प संचालक DRDA मा.प्रियदर्शनी मोरे मॅडम यांनी पंतप्रधान आवास योजना,MSRLM, PM जन मन बाबत आढावा घेतला तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता मा.शुभांगी नाखले मॅडम यांनी स्वच्छ भारत अभियान बाबत आढावा घेतला व मार्गदर्शन केले आणि ग्रामपंचायत शिरवली चे सरपंच मा. श्री. महेश पाटील यांनी ग्रामपंचायत शिरवली अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मध्ये केलेल्या कामाचा पीपीटीमध्ये कामाची मांडणी केली व पुढील नियोजन सांगितले.

 सदर वेळी उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा, शाखा अभियंता, कक्ष अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, CDPO, कृषि अधिकारी,विस्तार अधिकारी ( पंचायत ) विस्तार अधिकारी (आरोग्य) विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home