Tuesday, October 7, 2025

खोपोलीतील लोकसेविकेंचा सत्कार निमित्त 'नागरी सामाजिक विकास संस्थेच्या' वतीने महिला स्नेहसंमेलन व कोजागिरी, महाभोंडला उस्तवाचे आयोजन.

 

खालापुर/सुधीर देशमुख: - महिलाच्या प्रगतीसाठी कार्यरत जिल्ह्यातील अग्रगण्य अश्या 'नागरी सामाजिक विकास संस्थे ' ने नवरात्री आणि कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने महिलांसाठी एक आगळावेगळा, उत्साही आणि सांस्कृतिक कार्यक्रम — “महिला स्नेहसंमेलन व महाभोंडला उत्सव” — अतिशय रंगतदार वातावरणात पार पडला.या कार्यक्रमात खोपोली शहरातील दोन मान्यवर राणरागिणी लोकसेविकेंचा सन्मान ही करण्यात आला. खोपोली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पी.एस.आय. पूजा चव्हाण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, खोपोली (शासकीय रुग्णालय) येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी सौ. डॉ. संगीता वानखेडे यांचा संस्थेच्या वतीने विशेष सन्मान संस्थेच्या अध्यक्षा सौ. वर्षा राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. 

समाजसेवा, शिस्त आणि समर्पित कार्यातून या दोन्ही मान्यवर स्त्रिया शहरातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असताना यांचे विचार ऐकण्यासाठी अनेक महिला उत्सुक होत्या. महिलांनी आरोग्य संभाळून नेहमी सकारात्मक विचार घेऊन काम केल्यास घराला, समाजाला व देशाला पुढे शकते असं विचार डॉ संगीता वानखेडे यांनी तर महिलासाठी वेगवेगळया शासकीय योजना सहित शासकीय नोकऱ्या मध्ये ही खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे असे मार्गदर्शन सहाय्यक पॉलिस निरीक्षक पूजा चव्हाण उपस्थिताना केले.

शासकीय रुग्णालयात व पोलीस स्टेशन मध्ये नेहमीच महिलांसह सर्वांनाच आपुलकीची वागणूक देऊन मनातील भीती घालवून रात्र दिवस सतत आदराने वागणूक देण्याचे काम दोन्ही लोकसेविका करतात त्यामुळे अश्या लोकसेविकेंचा ही सन्मान समाजाने करावा ह्या हेतूने हा सन्मान सोहळा आयोजित केला असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्षा सौ वर्षा राजेश मोरे यांनी केले.

या कार्यक्रमात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा पदवाटप सोहळा सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण व डॉ संगीता वानखेडे यांच्या हस्ते सौ. शारदा दळवी, परवीन शेख, सौ. ज्योती भुजबळ, सौ. नंदिनी पालांडे, सौ. अनुराधा चौरे, सौ.योगिता खेडेकर, रिझवाना जमादार या महिलांना महत्वाची पदे वाटप करण्यात आली.

यावेळी पारंपरिक भोंडला, कोजागिरी निमित्त विविध मनोरंजक खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांनी सभागृहात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यामध्ये इनरव्हिल क्लब खोपोली च्या महिलांनी सहभाग घेतला तर अनेक मान्यवर महिलांनी आवर्जून हजेरी लावली.

विशेष म्हणजे, या कार्यक्रमात अनेक सामाजिक संस्थांच्या महिलांनी सहभाग घेतला, तर नागरी सामाजिक विकास संस्थेच्या सर्वच सदस्यांनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमाची सुरुवात सन्मानमूर्ती लोकसेविकेंच्या हस्ते राष्ट्र माता जिजामाता व महिलांच्या प्रणेत्या सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दिप प्रज्वलन करून केले गेले प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्योती भुजबळ यांनी केले तर शेवटी आभार सौ. सुप्रिया देशमुख यांनी मांडले. कार्यक्रमाचे आयोजन खोपोली नगर परिषदेच्या मोगलवाडी येथील कृत्रिम तलावाच्या सभागृहात आयोजित केला गेला.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. वर्षा राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. त्यांच्या नेतृत्वामुळे आणि सदस्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home