प्रबुद्ध सामाजिक मंच खोणी म्हाडा कॉलनी येथे ६९ वा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न...
खालापुर/सुधीर देशमुख :- ठाणे जिल्ह्यातील,व कल्याण तालुक्यातील मौजे खोणी येथे प्रबुद्ध सामाजिक मंच खोणी यांच्या माध्यमातून ६९ वा धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रसंगी समाज प्रबोधन करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य माननीय कसबे गुरुजी यांनी बोद्धधम्म या विषयावर खूप छान असे मार्गदर्शन केले.
आजच्या गोड सोहळ्यासाठी विशेषतः ६९ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने वाकोडे साहेबांनी,अतिशय सुंदर खीर बनवून उपासक आणि उपासीका यांना वाटप केली शिवाय कार्यक्रमाची शोभा वाढवली.शिवाय राजेश भोसले साहेब यांनी विनामूल्य पुस्तके वाटप केली.तसेच,प्रबुद्ध सामाजिक मंच्याच्या सर्व बांधवांनी मोलाचे सहकार्य व योगदानाबद्दल संघटनेने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home