मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचा 'धडाकेबाज' निर्णय
खालापूर/प्रतिनिधी :- राजकारण, समाजकारण आणि संघटनात्मक वाटचालीत खळबळ माजवणारा आणि इतिहासाचे पानच बदलणारा निर्णय नुकताच मराठा क्रांती स्वराज्य संघटनेने घेतला आहे. आतापर्यंत केवळ मराठा समाजापुरती मर्यादित असलेली ही संघटना आता सर्व हिंदू जातींसाठी खुले दरवाजे उघडतेय — आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अनेक जातीय संघटनांच्या भुवया उंचावल्यात!
होय, हा निर्णय सामान्य नाही, तर संघटनेच्या मूळ 'मराठा' ओळखीच्या चौकटीच पार फोडणारा असला तरी मराठा समाजहित जोपासले जाणार आहेच. देशातील अनेक राज्यात अनेक मराठी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत त्यांच्या आग्रही विनंती व मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या इशाऱ्यावर झालेले नाही, तर थेट संघटनेच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव कदम (सूरत), सरचिटणीस प्रदीप मोरे (बडोदा) आणि राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यांनी साकारलेला परिवर्तनाचा एल्गार आहे.
या निर्णयानंतर आता अठरा पगड जाती, बारा बलुतेदार आणि अन्य मागासवर्गीय हिंदू जातींनाही या संघटनेत सहभागी होता येणार आहे. फक्त सहभागीच नाही, तर त्यांच्याकडे कुवतीप्रमाणे जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत — ही क्रांती आहे!
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अनेकजण आपली पोळी भाजून घेतात. पण मराठा क्रांती स्वराज्य संघटनेने हा निर्णय घेत करताना महाराजांचे आदर्श केवळ स्मरणात नाहीत, तर कृतीत उतरवलेत. "मावळ्यांनी घडवलेला राजा, आणि राजाने घडवलेले मावळे" हा विचार आता प्रत्यक्ष संघटनात्मक कार्यात दिसू लागला आहे.
संघटनेचा हा निर्णय काही जातीय ठेकेदारांच्या झोतात बसलेला नाही. ज्यांनी आपापल्या जातीच्या नावावर समाजाला विभागून मते गोळा केली, त्यांना हे पेलवणार नाही हे स्पष्ट आहे. पण ही वेळ आहे एकत्र येऊन समाजाच्या प्रबोधनाची आणि नवभारताच्या बांधणीसाठी खऱ्या अर्थाने काम करण्याची.
या ऐतिहासिक निर्णयामुळे संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण झाला आहे. संघटना आता एका नव्या रूपात, नव्या विचारसरणीने आणि व्यापक सामाजिक उद्दिष्टांसह उभी राहतेय. जातीभेदाच्या भिंती भेदून सर्व समाजासाठी समान संधी देण्याचा निर्धार आता संघटनेने केला आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home