Friday, June 13, 2025

सर्वांच्या ह्रदयाच्या देखभालीसाठी आरोग्य सहल

 



 माधवबाग व सहजसेवा फाउंडेशनचा उपक्रम 


खालापुर / मानसी कांबळे :- माधवबाग व सहजसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर सहलीचे 13 जून, शुक्रवार रोजी खालापूर येथील माधवबाग क्लिनिक येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आरोग्य शिबिरात जवळजवळ 30 महिला-पुरुषांशी सहभाग घेतला होता. निसर्गमय वातावरणात व वृक्षवेलीच्या सानिध्यात यावेळी मोफत शुगर, बीपी, ईसीजी, ट्रेस टेस्ट तसेच ह्रदय विकाराशी निगडीत तपासण्या करण्यात आल्या. यावेळी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉं. शेखर जांभळे आणि माधवबाग क्लिनिकचे को-ऑर्डिनेटर तुषार पाटील यांनी माधवबाग क्लिनिकविषयी माहिती दिली. माधवबाग हा दवाखाना नसून रुग्णाला अनुकूल वातावरणात आजारांवर लढण्याची शक्ती व सकारात्मक विचार देणारे स्थान आहे.

        

  माधवबाग हे फक्त मधुमेह, रक्तदाब, कॉलेस्टॉलची काळजी नाही करीत तर आपल्याला हृदयाची काळजी करते. संपूर्ण हृदय शुद्धीकरण थेरपी येथे केली जाते. विना शस्त्रकिया, आयुर्वेदिक उपचार, नो साईड इफेक्ट्स, वेदना शुन्य उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत. परंतु ज्या सर्वसामान्य लोकांना येथे तपासणी, उपचार शक्य होत नाहीत, त्यांच्यासाठी सहज सेवा फाउंडेशन व माधवबाग क्लिनिक संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवित असतात आणि तसेच डॉं. शेखर जांभळे, निलम पाटील संयोजन करीत आरोग्य उपक्रम, आरोग्य सहल आयोजित करीत असतात. येथे आलेला प्रत्येक व्यक्ती येथील निसर्गरम्य अनुकुल वातावरण अनुभवत असतात.



यावेळी डॉं. शेखर जांभळे, नीलम पाटील, तुषार पाटील, संतोष गायकर आणि सर्व माधव बाग टीम यांनी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपुलकीने विचारपूस करीत नाश्ता व जेवणाची उत्तम सोय केली होती. तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी या आरोग्य सहलीमध्ये पत्रकार फिरोज पिंजारी, सुधीर माने, सुधीर देशमुख, मानसी कांबळे आदी सहभागी झाले होते.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home