Friday, January 30, 2026

अद्भुत नेतृत्वाचा ठायीचा विश्रांतीचा काळ सुरू झाला...

  


 खालापुर कर्जत/सुधीर देशमुख :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि प्रभावशाली नेते अजित पवार यांचा आज विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याचा दुःखद वृत्त समोर आले आहे. राजकारणातील त्यांच्या दूरदृष्टी, प्रगल्भता आणि निर्भीड नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या लोकशाहीत त्यांनी स्वतःची वेगळी आणि ठळक ओळख निर्माण केली होती. कठीण निर्णय घेताना कधीच मागे हटणार नाही अशी त्यांची जिद्द लोकांना नेहमीच प्रेरणा देत आली. आज त्यांचा शून्य जेवढा भरुन निघणार नाही, तेवढाच हा समाजासाठी मोठा धक्का आहे.


लोकहितासाठी त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची निष्ठा आणि प्रामाणिक सेवा आणी सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी कायम तत्पर असणारा नेता हरपला आहे. प्रत्येक वेळी मुख्यमंत्री पद थोडक्यात नीसटुन ते उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत रहायचे,पण काम मुख्यमंत्री असल्यासारखेच करायचे,कारण ते नेहमी म्हणायचे मी कामाचाच माणुस आहे.करोना कालावधी मधे मंत्रालयात दिसणारा नेता,नेहमी कार्यकर्त्या साठी झटला.शेवटच्या क्षणी पण फाईली व अर्जाची पेपर सर्व ठिकाणी जमीनीवर पसरले होते .


कर्तव्यनिष्ठा, निर्णयक्षमता आणि विकासाची दूरदृष्टी यांचा आदर्श म्हणजे अजित पवार. आजरोजी बारामती चे शिल्पकार , भाग्यविधाते,राजे,अश्या विविध अलंकारीक उपाधी ने ज्यांना संबोधित करताना कंठ दाटुन येतात.त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home