अन्यायाविरुद्ध लेखणीचा वार करणारा निर्भीड युवा पत्रकार - नरेश शिवाजी जाधव
आज पत्रकार नरेश शिवाजी जाधव यांचा वाढदिवस. डशिंग व्यक्तिमत्त्व, स्पष्ट भूमिका, प्रामाणिक पत्रकारिता आणि अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लेखणी उचलणारा आवाज अशी ओळख नरेश जाधव यांनी निर्माण केली आहे. कर्जत - खालापूर तालुका तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यात एक अनुभवी, स्वाभिमानी आणि जनतेचा पत्रकार म्हणून त्यांचा लौकिक आहे.
* सर्वसामान्यांचा आवाज बनलेली लेखणी :- गेल्या 8 ते 10 वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत नरेश जाधव यांनी
शेतकरी, कामगार, आदिवासी, महिला, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक ज्वलंत समस्या सातत्याने मांडल्या. प्रशासनातील दिरंगाई, भ्रष्टाचार, अन्याय, दुर्लक्ष आणि लोकशाही मूल्यांवरील आघात याविरोधात त्यांनी भीडभाड न ठेवता लेखणी चालवली.
त्यांच्या बातम्यांमुळे अनेक प्रकरणे चर्चेत आली, अनेकांना न्याय मिळाला, तर काही वेळा प्रशासनालाही कारवाई करावी लागली.
* डशिंग पण संयमी, आक्रमक पण जबाबदार :- नरेश जाधव यांची पत्रकारिता केवळ बातमीपुरती मर्यादित नसून ती सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारी आहे. डशिंग शैली असली तरी तथ्यांशी तडजोड नाही,
आक्रमक प्रश्न असले तरी जबाबदारीची जाणीव कायम,
आणि लोकप्रियतेपेक्षा सत्याला प्राधान्य हीच त्यांची पत्रकारितेची खरी ओळख आहे.
* स्वाभिमानी पत्रकारितेचा आदर्श :- कोणत्याही दबावाला न झुकता, सत्तेच्या जवळीकांपेक्षा जनतेच्या विश्वासाला महत्त्व देत स्वाभिमान जपणारी पत्रकारिता करणे, हे नरेश जाधव यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांची लेखणी ही “सत्तेचा आरसा दाखवणारी आणि पीडितांचा आधार बनणारी” अशीच राहिली आहे.
* युवकांसाठी प्रेरणास्थान :- आजच्या काळात जिथे पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, तिथे नरेश जाधव यांची वाटचाल तरुण पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. प्रामाणिकपणा, सातत्य, अभ्यास आणि जनतेशी नातं या मूल्यांवर उभी असलेली त्यांची पत्रकारिता पुढील पिढीसाठी दिशादर्शक आहे.
* वाढदिवसानिमित्त शुभेच्छा :-
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी
आरोग्य, यश, निर्भीड लेखणी आणि जनतेचा अखंड विश्वास
लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.
अन्यायाविरुद्धचा हा आवाज असाच बुलंद राहो…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नरेश काका...!
- मानसी गणेश कांबळे (संपादक - माय कोकण न्यूज 24 वेब पोर्टल / निवासी संपादक - दै. कोकण प्रदेश न्यूज) मो. 8805396850.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home