Monday, June 30, 2025

नको अमली पदार्थांची नशा,आयुष्याची होईल दूर्दशा!

 


खोपोली पोलीस ठाणे तर्फे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त खोपोलीतील जनजागरूकता भव्य रॅलीचे आयोजन ...


5 MAH GIRLS BN NCC व जनता विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला रॅलीत सहभागी...


खोपोली/प्रतिनिधी:- जागतिक अंमली पदार्थांच्या गैरवापर आणि अवैध तस्करीविरुद्ध दिनाचे औचित्य साधून खोपोली पोलीस ठाणे '5 MAH GIRLS BN NCC MUMBAI-A खोपोली पोलीस स्टेशन च्या PSI पूजा मॅम, महिला दक्षता सदस्य इशिका शेलार व डॉ ठाकूर वानखेडे, कॅप्टन शितल कृष्णा गायकवाड यांच्या मदतीने खोपोली शहरातील जनजागृतीसाठी भव्य रॅली काढण्यात आली व विशेष कार्यशाळा व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीत NCC च्या 40 मुली,तेसच जनता विद्यालय शाळेची 200 मुले,मुली विद्यार्थ्यां, पोलीस, सह सहभागींनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांबाबत मूलभूत माहिती देण्यात आली.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विरोधात शपथही देण्यात आली.मार्गदर्शनात अंमली पदार्थ म्हणजे काय?, त्याचे प्रकार कोणते?, सेवनामुळे होणारे शरीरावर व मनावर परिणाम, अशी परिस्थिती टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी तसेच सायबरक्राइम व शारीरिक , मानसिक , सामाजिक आरोग्य तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या वाढत्या धोक्यांच्या या मुद्यांवर मार्गदर्शन करीत NCC मुलींसोबत चर्चा करण्यात आली.तेसच युवा पिढी चांगल्या पद्धतीने पुढे जावी यासाठी देखील त्यांचं मार्गदर्शन राहतं आपण या ठिकाणी काही पोस्टर केलेले आहेत अतिशय चांगल्या केले आहेत खरंतर सिलेक्ट करताना आमचं कन्फ्युजन झालं की नेमकं कुठलं करावं नुसतं चित्रीकरण महत्त्वाचं नाही तर त्या पाठीमागे थॉट प्रोसेस काय आहे तुम्ही काय विचार करून या ठिकाणी चित्रित केले आहे तेही महत्त्वाचं होतं.आपण नशा करणार नाही याचीही शपथ घेतली आहे बरेचसे कॉलेजेस मध्ये देखील याची शपथ घेण्यात आली आहे.नुसती शपथ घेऊन चालणार नाही तर त्याची अंमलबजावणी आपल्याला करावी लागणार आहे. आपल्या घरातील आपले भाऊ आतील घरातील व्यक्ती असतील ते जर वेगळ्या प्रकारचा नशा करत असतील त्यांना रोखणेही आपली जबाबदारी आहे असे सांगतडी वाय एस पी विक्रम कदम व psi पूजा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.


धकधकीच्या काळात तणावापासून आराम मिळण्यासाठी लोकांनी सिगरेट, दारू अन्य अमली पदार्थांचे सेवन करण्यास सुरुवात केली. यांच्या सेवनाने लोकांना आनंद मिळू लागल्याने मोठ्या प्रमाणात त्यांचे सेवन वाढले. तरुणाईही या पदार्थांचे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात सेवन करु लागली आहे. कमी वयोगटातील मुलांमध्ये अमली पदार्थांचे व्यसन वाढत चाले आहे. अंमली पदार्थांचे व्यसन हा एक असा आजार आहे जो तरुण पिढीवर सतत परिणाम करत आहे आणि त्यांना अनेक प्रकारे आजारी बनवत आहे. तरुणांचा मोठा वर्ग दारू, सिगारेट, तंबाखू, अंमली पदार्थ यांसारख्या विषारी पदार्थांच्या आहारी जात आहे. ज्यांच्याकडे खायलाही पैसे नाहीत, अशी मुलं नशा कशी करतात, असा प्रश्न लोकांना पडतो. आज जगभरात अमली पदार्थांच्या व्यसनाविरुद्ध जनजागृती होत आहे. त्यातून लोकांना होणाऱ्या हानींची जाणीव करून देण्याचे प्रयत्न सर्वत्र चालू आहेत.आपल्या शहरात ही जनजागृती होण्याचे उद्देश डोळ्या समोर ठेऊन या भव्य रॅलीचे व कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले.कार्यक्रम पाहणाऱ्या सर्वांनी या कार्यक्रमाचे खूप कौतुक केले आणि तो प्रभावी होता.अशी माहिती कॅप्टन शितल कृष्णा गायकवाड यांनी पत्रकारांना दिली.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोली पोलीस स्टेशनची PSI पूजा मॅडम, कॅप्टन शितल कृष्णा गायकवाड, महिला दक्षता सदस्य इशिका शेलार,डॉ ठाकूर, वानखडे मॅडम,5 MAH GIRLS BN NCC MUMBAI-A च्या नसावं चे विध्यार्थी,जनता विद्यालय शाळेची विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, June 13, 2025

सर्वांच्या ह्रदयाच्या देखभालीसाठी आरोग्य सहल

 



 माधवबाग व सहजसेवा फाउंडेशनचा उपक्रम 


खालापुर / मानसी कांबळे :- माधवबाग व सहजसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर सहलीचे 13 जून, शुक्रवार रोजी खालापूर येथील माधवबाग क्लिनिक येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आरोग्य शिबिरात जवळजवळ 30 महिला-पुरुषांशी सहभाग घेतला होता. निसर्गमय वातावरणात व वृक्षवेलीच्या सानिध्यात यावेळी मोफत शुगर, बीपी, ईसीजी, ट्रेस टेस्ट तसेच ह्रदय विकाराशी निगडीत तपासण्या करण्यात आल्या. यावेळी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉं. शेखर जांभळे आणि माधवबाग क्लिनिकचे को-ऑर्डिनेटर तुषार पाटील यांनी माधवबाग क्लिनिकविषयी माहिती दिली. माधवबाग हा दवाखाना नसून रुग्णाला अनुकूल वातावरणात आजारांवर लढण्याची शक्ती व सकारात्मक विचार देणारे स्थान आहे.

        

  माधवबाग हे फक्त मधुमेह, रक्तदाब, कॉलेस्टॉलची काळजी नाही करीत तर आपल्याला हृदयाची काळजी करते. संपूर्ण हृदय शुद्धीकरण थेरपी येथे केली जाते. विना शस्त्रकिया, आयुर्वेदिक उपचार, नो साईड इफेक्ट्स, वेदना शुन्य उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत. परंतु ज्या सर्वसामान्य लोकांना येथे तपासणी, उपचार शक्य होत नाहीत, त्यांच्यासाठी सहज सेवा फाउंडेशन व माधवबाग क्लिनिक संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवित असतात आणि तसेच डॉं. शेखर जांभळे, निलम पाटील संयोजन करीत आरोग्य उपक्रम, आरोग्य सहल आयोजित करीत असतात. येथे आलेला प्रत्येक व्यक्ती येथील निसर्गरम्य अनुकुल वातावरण अनुभवत असतात.



यावेळी डॉं. शेखर जांभळे, नीलम पाटील, तुषार पाटील, संतोष गायकर आणि सर्व माधव बाग टीम यांनी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपुलकीने विचारपूस करीत नाश्ता व जेवणाची उत्तम सोय केली होती. तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी या आरोग्य सहलीमध्ये पत्रकार फिरोज पिंजारी, सुधीर माने, सुधीर देशमुख, मानसी कांबळे आदी सहभागी झाले होते.