नांदेडमध्ये ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; चुलीवर स्वयंपाक करून प्रशासनाला दिले निवेदन...

 

नांदेड /जावेद अहमद : - देशभरात वाढत चाललेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ या राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने चुलीवर स्वयंपाक करून तयार केलेले अन्न जिल्हाधिकाऱ्यांना सादर करत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

सध्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्याने नागरिकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे. या परिस्थितीबद्दल केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. गॅस सिलेंडरचा नियमित आणि सुरळीत पुरवठा व्हावा, ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश भोसीकर, शंकर महाजन (जिल्हाध्यक्ष दक्षिण), राज आटकोरे (जिल्हाध्यक्ष उत्तर), रवि नागोराव पंडित (जिल्हा महासचिव दक्षिण), दीपक मगर (जिल्हा महासचिव उत्तर), माजी जिल्हाध्यक्षा दैवशाला पांचाळ, नगरसेवक राहुल सोनसळे, आकाश जोंधळे, शेख बिलाल, राजश्री राक्षसमारे, कुलदीप राक्षसमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.

याशिवाय विठ्ठल गायकवाड (महानगर अध्यक्ष), संजय टिके (जिल्हा संघटक), दीपक कसबे, विनायक गजभारे, रंगनाथ गजले, अॅड. जयपाल ढवळे (कायदेशीर सल्लागार) तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही सहभाग लक्षणीय होता.

या आंदोलनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी