Saturday, July 5, 2025

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी

 


वणवे अंबरनाथ गोंदाव येथील भाविकांनी लावली वारीला हजेरी 


कोल्हापूर प्रतिनिधी :- भेटी लागी जीवा लागलीसे आस महाराष्ट्रात आषाढी वारी ला भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते यामध्ये महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून अनेक भाविक येत असतात यामध्ये गावातील न्यूज जर्न लिस्ट असोसिएशन चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधिर गोविंद माने, ह.भ.प.संतोष जानु पारठे,पांडुरंग बाळाजी जाधव,अंबरनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय बोबंले,गागोदे येथील ह.भ.प.चिंतामणी झिपर पाठारे यांनी देखील 4 जुलै ते 7 जुलै पर्यंत खाजगी वाहनातून या वारीला सालाबाद प्रमाणे सुरुवात करून पहाटे पाच वाजता चंद्रभागे स्नान करून प्रदक्षिणा केली. 


यावेळी श्री विठ्ठल रखुमाई चे दर्शन घेऊन आपल्या भेटी लागे जीवा लागलीसे आस, हा हेतू पुर्ण करत भक्तिमय वातावरणात या वारीत सहभाग नोंदवून आपला मार्गक्रम यशस्वी करण्याचा संकल्प केला आणि चंद्रभागेवर स्नान करून पहाटे येणाऱ्या वासुदेवाच दर्शन घेतले.  त्यांच्याकडून आपल्या आई-वडिलांचा उद्धार होईल असं कवन करून घेतले त्यांच्यासोबत छायाचित्र देखील घेऊन त्यांनी या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.


वासुदेव म्हटलं की पहाटे त्याच्यात गाणं त्यामध्ये अभंग स्नान व ते प्रसन्न वातावरण करून भाविकांचं मनोबल वाढवण्याचा काम करत असतो यांच्या या वारीत पहाटेचा काकड आरती भोपाळी गाऊन विठ्ठलाचा नामस्मरण करत प्रसन्न वातावरण करत असतात, दररोज हरिपाठ प्रवचन कीर्तन अशा प्रकारचे कार्यक्रम करून वारीमध्ये नवचैतन्य आणण्याचं काम हे वारकरी करत असतात आपला संसार पूर्ण विसरून पांडुरंगाच्या नामस्मरणात मागणं मागत असतो की बळीराजा वरचा संकट दूर कर सर्वांना सद्बुद्धी सदाचार व आरोग्य लाभण्यासाठी प्रार्थना करत असतात.


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home