नेचर केअर सन्मान २०२६ : महिला शेतकऱ्यांचा गौरव

 


विटा/प्रतिनिधी :– सेंद्रिय शेती क्षेत्रात कार्यरत असलेल्या नेचर केअर फर्टिलायझर्स या अग्रगण्य संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘नेचर केअर सन्मान २०२६’ यंदा महिला शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आला आहे. महिला शेतकऱ्यांच्या कष्ट, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि कृषी क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

गेल्या २९ वर्षांपासून महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेशात सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार करणाऱ्या या संस्थेकडून २०२३ पासून राज्यस्तरीय पुरस्कार दिले जात आहेत. यापूर्वी देशी बियाणे संवर्धन, भरडधान्य उत्पादन आणि वृक्षसंवर्धन या क्षेत्रांतील कार्याचा गौरव करण्यात आला होता.

संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाचे वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा पुरस्कार महिला शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आला. महाराष्ट्र, गोवा आणि बेळगाव जिल्ह्यातून एकूण ७७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३० अर्जांची दुसऱ्या टप्प्यासाठी निवड करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष शेती पाहणी आणि मुलाखतीनंतर अंतिम ११ महिला शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.

पुरस्कार विजेत्या महिला शेतकरी  :- मुख्य पुरस्कारासाठी निवडलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी रु. ५१,०००, तर विभागून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी प्रत्येकी रु. २५,००० आणि उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी रु. २१,००० व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

मुख्य पुरस्कार विजेत्या: -ललिता राहुल सोनवणे (नाशिक), स्वाती नाना काळे (सोलापूर), रसिका अनिल फाटक (रायगड), लता अनिल पोहेकर (अमरावती), सीमा चंद्रकांत जाधव (पुणे), अश्विनी परशराम माळी (सांगली)

विभागून पुरस्कार:-सविता संदीप तेली (कोल्हापूर), नीलम वसंत रंदवे (सोलापूर), मनिषा भास्कर शिंदे (सोलापूर), आदिती अशोक थिटे (रायगड)

उत्तेजनार्थ पुरस्कार: -श्रीया मुकुंद इनामदार (बेळगाव)

निवड समितीत अॅग्रोनॉमिस्ट डॉ. आशिष वेले, ज्येष्ठ माध्यम तज्ञ अरुण नाईक आणि उद्योजिका कामाक्षी बर्वे यांचा समावेश होता. निवड करताना महिला शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष शेतीतील सहभाग, कष्ट, पीक नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, विक्री व्यवस्था तसेच सामाजिक प्रभाव या निकषांचा विचार करण्यात आला.

या पुरस्कारांचा भव्य वितरण सोहळा दि. १८ एप्रिल २०२६ रोजी विटा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या सुकन्या व सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ तसेच आमदार सुहास (भैय्या) बाबर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या सोहळ्यास नेचर केअर फर्टिलायझर्सचे अध्यक्ष जयंत (बाबा) बर्वे, कार्यकारी संचालक जयदेव बर्वे आणि निवड समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.


Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी