वणवे गावात श्री हनुमान जन्मोत्सव व पालखी सोहळा संपन्न...

 

खालापूर/ सुधीर माने :- खालापूर तालुक्यातील वणवे हे अत्यंत धार्मिक व शिस्तप्रिय गाव आहे. या गावात सालाबादप्रमाणे श्री भैरवनाथ मंदिर, वनवे येथे २ एप्रिल २०२६ रोजी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पहाटे ४ ते ६ या वेळेत काकड आरती ग्रामस्थ वणवे, निंबोडे व खालापूर येथील भाविकांनी ह.भ.प. मनेश जोगवाडे, उद्धव घोलप, पुंडलिक पारठे, राजू पारठे व इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत केली. त्यानंतर सकाळी ६ ते ७ या वेळेत जन्मोत्सव, अभिषेक व कलशपूजन खालापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष किशोर एकनाथ पवार व सौ. किशोरी किशोर पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुधीर माने, सदस्य गजानन मोरे तसेच ग्रामस्थ रामचंद्र जाधव उपस्थित होते.


त्यानंतर सकाळी १० ते ११ या वेळेत श्री सत्यनारायणाची महापूजा सौ. किशोरी किशोर पवार यांच्या हस्ते संपन्न झाली. दुपारी ४ ते ५ या वेळेत ग्रामस्थ मंडळ वणवे व पारंपरिक भजन मंडळींनी हरिपाठ सादर केला.

संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत श्रींच्या पालखीचे प्रस्थान करण्यात आले. गावातील मान्यवर, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपूर्ण गावातून पालखीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. या वेळी भक्तिमय वातावरण, फटाक्यांची आतषबाजी तसेच महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. भजन व नामस्मरणात भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. तसेच फुगडीसारख्या पारंपरिक कार्यक्रमांनी सोहळ्याची शोभा वाढवली.

रात्री ८ ते ९ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या प्रसादाचे अन्नदाते खालापूरचे उपनगराध्यक्ष किशोर एकनाथ पवार होते.

या कार्यक्रमासाठी पालखी सजावट राजेंद्र जाधव, रामचंद्र घोलप व नरेश उतेकर यांनी केली. तसेच युवकांनी संपूर्ण गावात सुंदर रांगोळ्या साकारल्या.

एकदिवसीय हा कार्यक्रम अत्यंत जल्लोषात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.



Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी