Posts

Showing posts from April, 2026

खोपोलीत 2 एप्रिल रोजी भव्य आदिवासी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

Image
  कर्ज काढून लग्न करू नका; सामुदायिक विवाहाचा पर्याय निवडा – सहज सेवा फाउंडेशनचा संदेश खोपोली/प्रतिनिधी :- आर्थिक अडचणींमुळे लग्नासाठी कर्जबाजारी होणाऱ्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने 2 एप्रिल 2026 रोजी श्रीराम मंगल कार्यालय, खोपोली येथे भव्य आदिवासी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. “कर्ज काढून लग्न करू नका, सामुदायिक विवाहाचा पर्याय निवडा” असा महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सहज सेवा फाउंडेशन गेल्या 11 वर्षांपासून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. 2016 पासून आजारी व्यक्तींना अल्पकाळासाठी वैद्यकीय उपकरणे सेवा, 1 जानेवारी 2019 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, खोपोली येथे रुग्णांना मोफत जेवण, 2020 पासून ‘सहज स्वर्ग रथ’ व शवपेटी सेवा, तसेच आदिवासी पाड्यांवर जनजागृती, शाळा व महाविद्यालयांमध्ये लैंगिक शिक्षण आणि सायबर क्राइमविषयी मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. याशिवाय ‘झाडाखालची शाळा’, पाताळगंगा नदी पूजन, तसेच खोपोली नगरपालिकेच्या हद्दीत कन्या जन्म देणाऱ्या मातांचा सन्मान यांसारख्या उपक्रमांची राज्य...

गाव बदलायचं असेल तर सरपंच डोकेबाज पाहिजे – भास्करराव पेरे पाटील....

Image
  माळशिरस / अनिल पवार : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मौजे शिंदेवाडी येथे आयोजित प्रेरणादायी व्याख्यानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी पाटोदा गावाचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या व्याख्यानाचा उद्देश पाटोदा गावाच्या विकासाचा आदर्श समोर ठेवून शिंदेवाडीच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणे हा होता. आपल्या प्रभावी आणि साध्या शैलीतील भाषणात पेरे पाटील यांनी सांगितले की, गावविकासासाठी केवळ निधी नव्हे, तर योग्य नियोजन, पारदर्शकता आणि प्रामाणिक नेतृत्व अधिक महत्त्वाचे असते. यावेळी त्यांनी पाटोदा गावात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यात स्वच्छता मोहीम, पाणी व्यवस्थापन, शिक्षण व डिजिटल सुविधा, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, वृक्षारोपण तसेच अतिक्रमण निर्मूलन यांसारख्या कामांचा समावेश होता. “सरपंचाकडे प्रामाणिक इच्छाशक्ती असेल, तर गावाचे चित्र बदलू शकते,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. तसेच ग्रामविकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करत, “गाव हा आपला परिवार आहे आणि त्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे,” असेही त्यांनी ...

वणवे गावात श्री हनुमान जन्मोत्सव व पालखी सोहळा संपन्न...

Image
  खालापूर/ सुधीर माने :- खालापूर तालुक्यातील वणवे हे अत्यंत धार्मिक व शिस्तप्रिय गाव आहे. या गावात सालाबादप्रमाणे श्री भैरवनाथ मंदिर, वनवे येथे २ एप्रिल २०२६ रोजी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे ४ ते ६ या वेळेत काकड आरती ग्रामस्थ वणवे, निंबोडे व खालापूर येथील भाविकांनी ह.भ.प. मनेश जोगवाडे, उद्धव घोलप, पुंडलिक पारठे, राजू पारठे व इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत केली. त्यानंतर सकाळी ६ ते ७ या वेळेत जन्मोत्सव, अभिषेक व कलशपूजन खालापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष किशोर एकनाथ पवार व सौ. किशोरी किशोर पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुधीर माने, सदस्य गजानन मोरे तसेच ग्रामस्थ रामचंद्र जाधव उपस्थित होते. त्यानंतर सकाळी १० ते ११ या वेळेत श्री सत्यनारायणाची महापूजा सौ. किशोरी किशोर पवार यांच्या हस्ते संपन्न झाली. दुपारी ४ ते ५ या वेळेत ग्रामस्थ मंडळ वणवे व पारंपरिक भजन मंडळींनी हरिपाठ सादर केला. संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत श्रींच्या पालखीचे प्रस्थान करण्यात आले. गावातील मान्यवर, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थि...