विकास सहयोग प्रतिष्ठाण व टाटा स्टील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खालापूर तालुक्यात SMC प्रशिक्षण संपन्न ...
खालापूर/सुधीर देशमुख :- ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी हद्दीतील तांबाटी कम्युनिटी हॉल येथे शाळा व्यवस्थापन समिती (SMC) सदस्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी TSF चे Assistant Manager अनंत सर, विकास सहयोग प्रतिष्ठाणचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर अविनाश दोंदे, लर्निंग कोऑर्डिनेटर संतोष गायकवाड, GPCM कांचन सावंत व सुविधा साखरे, LEP स्टाफ, तसेच SMC सदस्य, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. एकूण 47 जणांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला.
प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शाळेच्या विकासात SMC सदस्यांची भूमिका अधिक प्रभावी करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांना प्रेरित करणे हा होता.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, शैक्षणिक दर्जा उंचावणे, शाळेत सुरक्षित व आनंददायी वातावरण निर्माण करणे तसेच पालकांचा सहभाग वाढवणे या मुद्द्यांवर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणानंतर SMC सदस्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून आला. सदस्यांनी शाळेच्या विकासासाठी सक्रिय सहभाग नोंदवण्याची तयारी दर्शवली. तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षणामुळे SMC सदस्यांचा आत्मविश्वास वाढला असून, भविष्यात शाळेच्या प्रगतीसाठी ते अधिक जबाबदारीने काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


Comments
Post a Comment