इनरव्हील क्लबचा उपक्रम: साडी वॉकेथॉनमधून महिला सक्षमीकरणाला चालना .....

 


 खोपोली /सुधीर माने :- आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन निमित्त इनरव्हील क्लब खोपोली तर्फे “सारी वॉकेथॉन” हा उपक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.

हा कार्यक्रम परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रम येथे पार पडला. या उपक्रमात सुमारे ३५ महिलांनी सहभाग घेतला. सर्व महिलांनी विविध प्रकारच्या आकर्षक साड्या परिधान करून उत्साहाने साडी वॉकेथॉनमध्ये भाग घेतला. या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश महिला सक्षमीकरण आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांचा महिला दिनानिमित्त आश्रमातर्फे शाल देऊन सत्कार करण्यात आला.

त्यानंतर अत्यंत गरजू अशा १० विधवा महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. या महिला धुणी-भांडी करणे तसेच भाजीपाला विक्री करून स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रत्येक महिलेला साडी, रोख १० हजार रुपये तसेच क्लबतर्फे सव्वादोन किलो साखर देण्यात आली. यामधील साडी आणि रोख रक्कम आश्रमातर्फे इनरव्हीलच्या माजी अध्यक्षा रुबी मॅडम यांनी प्रायोजित केली.

या कार्यक्रमासाठी गगनगिरी आश्रमाचे सर्वेसर्वा आशिषभाई वझीर, त्यांच्या पत्नी सौ. रूबी वझीर, श्री व सौ. पाटणकर, श्री मानेजी तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा दीना शहा, सेक्रेटरी मधुमिता पाटील, व्हाइस प्रेसिडेंट राजश्री मुंदडा, आयपीपी जयश्री कलोशी, ट्रेझरर दीपिका कोठारी, एडिटर एकता भदोरिया आणि क्लबचे इतर सदस्य तसेच विविध संस्थांमधील महिला सदस्य असे एकूण सुमारे ४० जण उपस्थित होते. हा कार्यक्रम उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत पार पडला.


Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी