कला-सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सुरेश साठे यांना राज्यस्तरीय ‘ज्ञानदीप गौरव पुरस्कार’

 

खालापूर /सुधीर माने — ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, नाशिक यांच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात राज्यस्तरीय “छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार २०२६” उत्साहपूर्ण वातावरणात प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात खोपोली (ता. खालापूर, जि. रायगड) येथील लोककलावंत, अभिनेते व लावणी सम्राट सुरेश शहाजी साठे यांना कला व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

सुरेश साठे यांनी अनेक वर्षांपासून पारंपरिक लावणी, लोककला आणि भारुड यांचे प्रभावी सादरीकरण करत सांस्कृतिक परंपरांचे जतन व प्रसार करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. स्त्री व पुरुष दोन्ही प्रकारच्या भूमिका समर्थपणे साकारत त्यांनी लोककलेला नवी ओळख मिळवून दिली आहे.

या कार्यक्रमास शिवव्याख्याते प्रा. सचिन देवरे पाटील, निसर्गोपचार तज्ञ डॉ. रावसाहेब घोडेराव, संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठवले, सचिव मिलिंद कळवणकर, आयटकचे राज्य सचिव राजू देसले, संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सुरेश साठे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, फ्रेम, गोल्ड मेडल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. हा सोहळा २४ मार्च २०२६ रोजी गांजमाळ येथील रोटरी क्लब सभागृह, नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी