मावळा संघटनेचा शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा ...

 


 खालापुर कर्जत/सुधीर देशमुख :- शिरवणे गावात मावळा संघटनेच्या वतीने शिवजयंती उत्सव पर्व ७ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या विशेष सोहळ्यासाठी अखंड संघर्ष प्रतिष्ठान, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ तसेच मुंबई मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यंदाच्या उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरली ती संघटनेने आयोजित केलेली वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेमुळे कार्यक्रमाला वैचारिक अधिष्ठान लाभले.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक स्पर्धकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रभावी विचार मांडले. त्यांच्या ओजस्वी भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली आणि कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

संपूर्ण उत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन आणि व्यवस्थापन पाहून उपस्थित नागरिकांनी मावळा संघटनेच्या कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले.

शिवजयंती उत्सव केवळ जल्लोषापुरता मर्यादित न राहता तो विचारांचा वारसा पुढे नेणारा ठरावा, हा संघटनेचा हेतू यानिमित्ताने अधोरेखित झाला. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या मावळा संघटनेच्या सर्व सदस्यांचे, अखंड संघर्ष प्रतिष्ठानच्या सहकाऱ्यांचे तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.“प्रत्येकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.


Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी