इनरव्हील क्लब खोपोली तर्फे महिला दिन उत्साहात साजरा


खालापुर /सुधीर माने :- जागतिक महिला दिनानिमित्त इनरव्हील क्लब खोपोलीच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता महालक्ष्मी मंदिर, काटरंग येथील मैदानात 18 वर्षांवरील महिलांसाठी स्पोर्ट्स फिएस्टा (खेळ उत्सव) आयोजित करण्यात आला होता.

या स्पोर्ट्स फिएस्टाचे उद्घाटन महालक्ष्मी मंदिर काटरंगच्या प्रमुख व्यवस्थापक करुणा येरूणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन क्लबच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

स्पोर्ट्स इन्चार्ज व्हाईस प्रेसिडेंट राजश्री मुंदडा आणि पास्ट प्रेसिडेंट सरिका यांनी विविध प्रकारचे खेळ आयोजित केले होते. उपस्थित सर्व महिलांनी या खेळांचा मनमुराद आनंद घेतला. क्लबच्या सर्व सदस्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन उत्तम सहकार्य केले.

या स्पोर्ट्स फिएस्टामध्ये खोपोली परिसरातील सुमारे 40 ते 45 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजेत्यांना क्लबच्या वतीने गोल्ड व सिल्वर मेडल, चॉकलेट आणि रुमाल देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान सरप्राइज गेम्स तसेच प्रश्नोत्तरांचे सत्रही घेण्यात आले आणि विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

जागतिक महिला दिनानिमित्त इनरव्हील क्लबतर्फे दरवर्षी एका कर्तृत्ववान महिलेचा सत्कार केला जातो. यंदा हा सन्मान सौ. धनश्री गौडा (कोंडुस्कर) यांना देण्यात आला. त्या जनता ज्युनियर कॉलेजमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून कार्यरत आहेत. “वंडरफुल स्पोर्ट्स वुमन” म्हणून त्यांना ट्रॉफी, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लबच्या सुमारे 30 सदस्यांची उपस्थिती होती. अध्यक्ष दीना शहा, सेक्रेटरी मधुमिता पाटील, उपाध्यक्ष राजश्री मुंदडा, खजिनदार दीपिका कोठारी तसेच इतर सदस्य उपस्थित होत्या. नागरी सामाजिक विकास संस्था अध्यक्ष वर्षा मोरे या त्यांच्या संपूर्ण टीमसह उपस्थित होत्या. तसेच इतर अनेक महिलांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी