धाकटी पंढरीत दीपोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.....

 


खोपोली /मानसी कांबळे :- धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैष्णवांची नगरी येथील तीर्थक्षेत्र श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संत संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात आज दीपोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विठ्ठलनामाचा गजर करत दीपोत्सवात सहभाग नोंदवला. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.दीपोत्सवानिमित्त नगरसेवक हरीश काळे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. 

तसेच यावेळी प्रमुख पाहुणे खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपकजी शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक नगराध्यक्ष सुनिल पाटील यांची उपस्थिती लाभली. नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी दिपोत्सवा निमित्त वारकरी मंडळींना शुभेच्छा दिल्या व कमेटीचे कौतुक केले.

यावेळी त्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत अशा धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वंदनीय, आदरणीय व पूजनीय ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली), देहू यांच्या सुश्राव्य हरिकीर्तनाचा लाभ भाविकांना मिळाला. त्यांच्या प्रभावी आणि भावस्पर्शी कीर्तनातून भक्ती, नामस्मरण आणि संत परंपरेचे महत्त्व यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

कीर्तनादरम्यान उपस्थित भाविकांनी हरिनामाचा गजर करत वातावरण अधिक भक्तिमय केले. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविक मोठ्या संख्येने यात सहभागी होत आहेत.

दीपोत्सव आणि हरिकीर्तनाच्या या सोहळ्यामुळे मंदिर परिसरात भक्तीभाव आणि आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. धाकटी पंढरी अध्यक्ष अनंत पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी