के.एम.सी. कॉलेज, खोपोली येथे एनसीसी डे उत्साहात साजरा

 


विविध राष्ट्रीय कॅम्पमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्सचा विशेष सन्मान

खोपोली/खलील सुर्वे :- के. एम. सी कॉलेज खोपोली येथे एनसीसी डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रम सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत महाविद्यालयाच्या परिसरात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एएनओ डॉ. कॅप्टन शीतल कृष्णा गायकवाड मॅडम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून के एम सी कॉलेजचे अध्यक्ष दिलीप पोरवाल, भास्करजी लांडगे साहेब संचालक के. टी. एस. पी मंडळ, उपविभागीय अधिकारी, कर्जत-रायगड,( प्रांत कार्यालय ) प्रकाश संकपाळ सर,खोपोली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी (Co) डॉ. पंकज पाटील सर, एपीआय नितीन मोहिते, पूजा मॅडम, शिवानीताई जंगम, प्रिया मॅडम, उल्हासराव देशमुख, फॉरेस्टर दळवी तसेच नागरगोजे सर उपस्थित होते. याशिवाय महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. तसेच विविध पत्रकार देखील कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला एनसीसी कॅडेट्सची शिस्तबद्ध परेड सादर करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी राष्ट्रप्रेम, शिस्त आणि नेतृत्वगुणांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

यानंतर पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. विविध राष्ट्रीय कॅम्पमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्सचा विशेष सन्मान करण्यात आला.

सार्जंट क्रुष्णाई महाडिक यांनी तामिळनाडू येथे झालेल्या EBSB कॅम्पमध्ये सहभाग घेतला. त्यांनी फायरिंग स्पर्धेत सुवर्णपदक तसेच नृत्य स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.

एलसीपीएल संजना जोशी यांनी नागपूर येथे झालेल्या EBSB-2 कॅम्पमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि ड्रिल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

एलसीपीएल आर्या धुमाळ यांनी नागपूर येथे झालेल्या ALC कॅम्पमध्ये सहभाग घेतला. या कॅम्पमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. तसेच या कॅम्पमध्ये त्यांना आर्टिलरी व संरक्षणाशी संबंधित तांत्रिक बाबींबाबत प्रशिक्षण व माहिती मिळाली.

तसेच एलसीपीएल मयुरी जाधव, कॅडेट अस्मिता रिंगे आणि कॅडेट श्रेया गुरव यांनी आसाम येथे झालेल्या YAMS कॅम्पमध्ये सहभाग घेतला. या कॅम्पमध्ये त्यांनी पॅराशूट राईडचा अनुभव घेतला आणि विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत २ सुवर्णपदके व १ रौप्यपदक मिळवले.

याशिवाय इतरही अनेक कॅडेट्सनी विविध एनसीसी स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. उपस्थित पाहुण्यांनी कॅडेट्सचे कौतुक करत त्यांना भविष्यात अधिक यश मिळवण्यासाठी प्रेरणा दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कॅडेट्सनी राष्ट्रीय एकता, शिस्त आणि देशसेवा या एनसीसीच्या मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि देशभक्तीच्या भावनेने संपन्न झाला.

एनसीसी ही एक युवा संघटना आहे. स्वातंत्र्यानंतर एक वर्षानंतर १९४८ मध्ये ती अस्तित्वात आली. विद्यार्थी त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयात स्वेच्छेने या संघटनेत सामील होऊ शकतात. तथापि, त्यांना हे माहित असले पाहिजे की एनसीसी ही सैन्याच्या समतुल्य नाही. तर सैन्यात सामील होण्याचे एक पाऊल आहे. ही संघटना प्रामुख्याने युवा विकासासाठी सज्ज आहे. विद्यार्थ्यांना जीवन कौशल्ये, एकतेचे महत्त्व आणि इतर महत्त्वाची नीतिमत्ता आणि मूल्ये शिकवण्याचे उद्दिष्ट आहे. ते कॅडेटचे व्यक्तिमत्व पुनर्निर्मित करते आणि त्याला आपल्या देशाचा कायदा पाळणारा नागरिक बनवते.

एनसीसीची उद्दिष्टे:-

- भारतातील नवीनतम सामाजिक-आर्थिक परिस्थितीत अपेक्षित असलेल्या आवश्यकता पूर्ण करणे.

- मोठ्या संख्येने तरुण नागरिकांमध्ये चारित्र्य, शिस्त, सोबती, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, निःस्वार्थ सेवांचे आदर्श आणि साहसी भावना विकसित करणे.

- जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विविध नेतृत्वगुण असलेल्या प्रशिक्षित, संघटित आणि प्रेरित तरुणांचा समूह तयार करणे आणि त्यांनी निवडलेल्या करिअरची पर्वा न करता राष्ट्राची सेवा करणे.

- भारतातील मोठ्या संख्येने तरुणांना सशस्त्र दलात सामील होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी अनुकूल वातावरण प्रदान करणे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी