छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाबाबत ५ मार्च रोजी पत्रकार परिषद

 


कर्जत/ नरेश जाधव :- माननीय महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच माननीय सहसचिव, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा – १) संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी कर्जत येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.


उपविभागीय अधिकारी कर्जत श्री. प्रकाश संकपाळ यांनी कर्जत व खालापूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांसाठी दिनांक ०५ मार्च २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. ही पत्रकार परिषद प्रशासकीय भवन, कर्जत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात पार पडणार आहे.


या परिषदेत अभियानाचे स्वरूप, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या महसुली सेवा, अर्ज निपटारा प्रक्रिया तसेच अभियानातून अपेक्षित फलित याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. विशेषतः महसुली दाखले, ७/१२ उतारे, नोंदी दुरुस्ती, विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन आदी सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यावर भर राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कर्जत व खालापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहून माहिती घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी