मिर्झा यहया बेग 'हाफिज-ए-कुरान' पदवीने सन्मानित

 


देगलूर /जावेद अहमद :- देगलूर येथील मिर्झा खदीर बेग यांचे सुपुत्र मिर्झा यहया बेग यांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी अत्यंत कठीण मानली जाणारी 'हाफिज-ए-कुरान' ही पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

मिर्झा यहया बेग यांनी २०२३ मध्ये हैदराबाद येथील नामांकित धार्मिक संस्था 'अशरकुल उलूम' येथे प्रवेश घेतला होता. अत्यंत चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी केवळ तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत हफीज ए कुराण ची पदवी प्राप्त केली.

बिलोली येथे मुस्लिम समाजाच्या वतीने एका सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिर्झा यहया बेग यांचा शाल, पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने हाजी मंसुर खान, फैजोदिन कुरेशी, फारुकी सर, सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज, जावेद सर आणि मिर्झा खदीर बेग यांचा समावेश होता. उपस्थित सर्व मान्यवरांनी यहया बेग यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कमी वयात मिळवलेल्या या यशामुळे मिर्झा यहया बेग यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी