रसायनी-मोहपाडा येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

 

खालापूर/मानसी कांबळे :- भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ इंडिया यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला 2026 चा पुरस्कार वितरण सोहळा रसायनी येथील मोहपाडा येथे उत्साहात पार पडला.

22 मार्च रोजी देशभरात साजरा करण्यात आलेल्या या उपक्रमाचा पुढील भाग म्हणून, काही मान्यवरांना नेपाळ येथे उपस्थित राहता न आल्यामुळे राम नवमीच्या औचित्य साधून 26 मार्च रोजी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय संघटक गोरखजी साठे, सल्लागार एन. एम. वाघमारे, अध्यक्ष प्रकाश गायकवाड, पत्रकार प्रशांत खराडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन, मेणबत्ती प्रज्वलन आणि बुद्ध वंदनाने करण्यात आली.

या सोहळ्यात विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’ मायाताई अच्युत शिरसाट यांना प्रदान करण्यात आला. ‘माता सावित्रीबाई फुले पुरस्कार’ रंजना गायकवाड यांना देण्यात आला.

खालापूर येथील ‘साप्ताहिक खालापूर वार्ता’ व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने यांना ‘छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यांनी पत्रकारितेद्वारे समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडत गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

तसेच अकोट येथील माणिक पारसवाल यांना ‘संत तुकडोजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार’, तर राजनंदाने दयानंद यांना ‘माता रमाई आंबेडकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

याशिवाय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार’ प्रकाश गायकवाड, राहुल जाधव, गौतम सोनवणे, अजित कडलक, दिलीप निकम, सुरेश प्यारे, सुनील निखाडे आणि मिलिंद तेलगूरे यांना प्रदान करण्यात आला. शिळफाटा येथील शंकर कोंडले यांना ‘लहू वस्ताद साळवे पुरस्कार 2026’ देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी रसायनी, मोहपाडा, चांभारले, अकोट, अकोला, बारामती, रायगड आदी ठिकाणांहून मोठ्या संख्येने पुरस्कारार्थी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनील निखाडे यांनी केले.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या सन्मानाने प्रेरणादायी ठरलेल्या या सोहळ्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी