नवोदय प्रवेश परीक्षेत अटकळी शाळेचा घवघवीत यश...

 

शाहिस्ता गौस सय्यद प्रथम

नांदेड प्रतिनिधी/जावेद अहमद :- नुकताच नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, तालुक्यातील अटकळी येथील पी. एम. श्री जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील एकूण ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये शाहिस्ता गौस सय्यद (प्रथम), गंगासागर दिलीप पोलकमवाड, आर्या विकास भालेराव, प्रविण सुरेश मुर्के, काशिनाथ मोहन झुरुडवाड, साफिया जुबेर शेख आणि ऋतुजा संदीप जाधव यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटला आहे. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक तसेच शिक्षकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच, विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या पालकांचे व कुटुंबीयांचेही महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी