खालापूर नगरपंचायतीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
खालापूर/ सुधीर माने : खालापूर नगरपंचायतीच्या वतीने तालुक्यातील महिलांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.दि. १७ मार्च २०२६ रोजी पहिल्या दिवशी महिलांमधील कला व संस्कृती गुणांना वाव देण्यासाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन सायंकाळी ४ ते ६ या वेळेत करण्यात आले. या स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग घेऊन आकर्षक रांगोळ्या साकारल्या.
त्यानंतर दि. १८ मार्च २०२६ रोजीच्या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, माता रमाई आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष किशोर पवार, मुख्याधिकारी कोमल कराळे, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, बांधकाम सभापती मीनल कबले, उपसभापती मीना वाघमारे तसेच नगरसेविका उज्वला निधी, लता लोते, सुनिता पाटील, डॉ. जाधव, तालुका महिला डॉक्टर इंगोले मॅडम, विनिता आठवले, क्षमा आठवले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी “स्त्रीने स्त्रीची अडचण न बनता तिच्या जीवनाला दिशा देण्याचे काम करावे,” असे मार्गदर्शन केले. त्यानंतर विनिता आठवले यांनी ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवानी जंगम, इंगोले मॅडम व नगराध्यक्षांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करून विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे :
पाककला स्पर्धा :
१) सुरेखा मोरे
२) आशा भानुशाली
३) नमिता चौधरी
संगीत खुर्ची :
१) रेखा गायकवाड
२) कल्याणी गायकवाड
लकी ड्रॉ :
१) गौतमी पवार
पोस्टर स्पर्धा :
प्रथम – काव्या खंडागळे
द्वितीय – रुद्र चव्हाण
तृतीय – श्रुती भालेराव
जी.जे.एम हायस्कूल (पोस्टर स्पर्धा) :
प्रथम – कार्तिकी दिसले
द्वितीय – दिव्या फराट
तृतीय – आर्या गोळे
वरील स्पर्धकांनी स्पर्धामध्ये सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Comments
Post a Comment