गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती

 

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करावे. त्यानंतर तोरण लावावे, पूजा करावी, गुढी उभारावी, दान द्यावे, कडुनिंबाचा प्रसाद वाटावा, भूमी नांगरणे, सुखदायक कृत्ये करावीत.

अभ्यंगस्नान : देशकालकथन करून अभ्यंगस्नान करावे.

तोरण लावणे :आम्रपल्लवांची तोरणे सिद्ध करून प्रत्येक द्वाराशी लाल फुलांसहित बांधावी.

पूजा :नित्यकर्म देवपूजा करावी. ब्रह्मदेवाची पूजा करून होमहवन आणि ब्राह्मणसंतर्पण करावे.

गुढी उभारणे :सूर्योदयाच्या वेळी शास्त्रशुद्ध गुढी उभारावी. सूर्यास्ताच्या वेळी गुळाचा नैवेद्य दाखवून गुढी उतरवावी.

दान :याचकांना अनेक प्रकारची दाने द्यावीत.

कडुनिंबाचा प्रसाद :पंचांग श्रवणानंतर कडुनिंबाचा प्रसाद वाटावा.

भूमी नांगरणे :भूमीत नांगर धरावा.

सुखदायक कृत्ये :मंगल गीते, वाद्ये आणि पुण्य पुरुषांच्या कथा ऐकत हा दिवस आनंदाने घालवावा.

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाची प्रार्थना :

‘हे ईश्‍वरा, आज तुझ्याकडून येणारे शुभाशीर्वाद आणि ब्रह्मांडातून येणार्‍या सात्त्विक लहरी मला जास्तीतजास्त ग्रहण करता येऊ देत.

             सुधीर देशमुख

 पत्रकार/माहिती अधिकार कायदा कार्यकर्ता 

 खालापुर तालुका, जिल्हा रायगड


Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी